Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था स्वायत्त संस्था या स्वतंत्रपणे काम करत असतात. माझ्यावर देखील अनेक वेळा कारवाई झाली; परंतु त्यातून समोर काहीच आले नाही. रोहितवर झालेल्या कारवाईवरून त्याने मांडलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला तो इतका मोठा नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार मोशी येथे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामती अॅग्रो कंपनीवरील ईडीच्या छाप्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आठ दिवसांपूर्वी दिल्लीला कोण गेले होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून विचारले असता अजित पवार म्हणाले, कोण, कधी आणि कुठे गेला होता, याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा संख्या वाढताना असतांना आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. त्यात कोरोनच्या नव्या व्हेरिएंट JN.1मुळे देखील धोका वाढला आहे. त्यात मुंबईत मागील वर्षभरातील पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत एका ५२ वर्षीय व्यक्तीचा ५ जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. मुंबईत शेवटचा कोविड मृत्यू ९ ऑगस्ट २०२३ रोजी झाला होता. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पाच दिवस ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची तक्रार होती. रुग्णालयात दाखल करण्याच्या २४ तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात ६ जानेवारी रोजी कोरोनाच्या १५४ नव्या रुग्णांची भर पडलीय. १७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील लोंढवे गावात एका हॉटेलमध्ये दि.६ रोजी सायंकाळी पाणी मागण्याच्या कारणावरून दोघांनी हॉटेल मालक, वेटरसह चार जणांवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात हॉटेल मालक मनोहर काशीनाथ पाटील, पवन संतोष धनगर, योगेश पाटील, काळू भिल अशी जखमींची नावे आहेत.चौघांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात मनोहर पाटील याला पोटावर वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोंढवे येथील सर्वज्ञ हॉटेलमध्ये जानवे येथील अजय मंगल पारधी व जगन्नाथ शामराव पारधी हे दोघे जेवायला गेले होते. पाणी मागण्यावरून त्यांचा वेटरशी वाद झाला आणि दोघांनी चाकूने वार सुरू केला. ही भानगड आवरायला आलेल्या मालकावर…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय तरुणीला एकाने जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला तर त्यानंतर पिडीतेला किनगाव येथे घेवून जात अत्याचार करीत तेथेच सोडून दिले. याठिकाणी तरुणी एकटीच असल्याने दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असतासंना संशयित गफूर गबू तडवी याने दि. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पिडीतेचा घरात शिरला. त्याने पिडीतेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सात वर्षांपूर्वी एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केल्यानंतरही पुन्हा दहशत निर्माण करत गुन्हे करणाऱ्या आकाश भास्कर विश्वे (३४, रा. भगवा चौक सुप्रीम कॉलनी) याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून पुन्हा हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी काढले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आकाश विश्वे याची प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर २०१४ पासून आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे २०१६ मध्ये एक वर्षाकरिता हद्दपार केले होते. तरीदेखील त्याने दहशत निर्माण करत गुन्हे करणे सुरूच ठेवले. म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी देत दोन वर्षांसाठी हद्दपार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवत भुसावळ रेल्वे विभागातील २९ वर्षीय तरुणाला ऑनलाइन तब्बल ६५ हजार ५०९ रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार रविवार, दि. ३१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी भुसावळ शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गजानन महाराजनगर परिसरातील सलमान खान कायमखानी (वय २९) हा रेल्वे विभागात नोकरीला असून त्याला रविवारी दुपारी १२ वाजता अनोळखी दोन मोबाइल क्रमांकांवरून फोन आला. बँकेतील कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याची बतावणी केली. तसेच क्रेडिट कार्डसाठीचे चार्जेस ९ हजार ९९९ रुपये परत करायचे आहे, असे सांगून एक लिंक पाठवली आणि…

Read More

अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरातून अनेक अल्पवयीन मुलीचे अपहरण होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच अकोला शहरातील महाकाली कॉलनीमध्ये एका साडे चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी बारा तासांच्या आत चिमुकलीचा शोध घेत अपहरणकर्त्या महिलेला अटक केली आहे. मिलेल्ल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनीमध्ये राहणारे मालाकार कुटुंब कामानिमित्त अकोल्यात आले होते. दि.५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास त्यांची साडेचार वर्षांची गुड्डी ही खेळत खेळत टिळक मारुती मंदिराकडे गेली. त्याच वेळी एक लाल साडी घातलेली महिला त्या ठिकाणी आली व लहान मुलीला…

Read More

नशिराबाद : प्रतिनिधी येथील साई मंदिराचा तिसरा वर्धापन दिवस शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने पाच हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी भेट देऊन साई बाबांचे दर्शन घेतले. नशिराबादमधील ग्रामस्थांना निरोगी, सुखी आयुष्य लाभु दे असे साकडे त्यांनी साईबाबांना घातले. यावेळी विकासभाऊ पाटील, विकास भाऊ धनगर, चेतन बऱ्हाटे, सुपडू चौधरी, भुषण कोल्हे, नितीन बेंडवाल, प्रदीप साळी, आबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मंदिर प्रतिष्ठानाच्या वतीने प्रतापराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदाराच्या चांगलचं अंगलट आलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं होतं. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उचलण्याची हिंम्मत होतीच कशी, असा सवाल विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. गृहमंत्री याची दखल घेणार का?…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मध्यप्रदेशातून जळगावात एमबीएचे शिक्षणासाठी आलेल्या सौरभ विकास कोल्हे (वय २३, मूळ रा. दाभियाखेडा, मध्यप्रदेश, ह.मु. गंधर्व कॉलनी) या तरुणाने मित्रांसोबत राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील दाभियाखेडा येथील रहिवासी असलेला सौरभ कोल्हे याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर तो एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी मध्यप्रदेशातून जळगावात आला होता. जळगावातील गंधर्व कॉलनीमध्ये एका भाडेतत्वावरील खोलीमध्ये राहून एमबीएच्या शिक्षणासाठी तयारी करत होता. गुरुवारी संध्याकाळी सर्व मित्र खोलीबाहेर बसलेले असताना सौरभ खोलीत गेला. त्याने मागील…

Read More