Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला, तर दोघांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना नववर्षाच्या दिवशी १ रोजी रात्री सव्वाबारा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या महितिन्सुअर, जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरातील रहिवासी यश रघुनाथ तपकिरे याच्या तक्रारीनुसार, शहरातील उंट मोहल्ला भागातील हॉटेल रुचीमध्ये दोघे संशयित जेवणासाठी आल्यानंतर त्यांना जेवण झाल्यानंतर बिल मागितल्याचा राग आला. या रागाताच यश यास एकाने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, तर दुसऱ्याने यश व महेश जाधव तसेच जसवंतसिंग राजपूत यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देत सोबत आणलेल्या चाकूने जसवंत…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिलेला अश्लील बोलून विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१३ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका संशयित आरोपी महिलेच्या घराजवळील ओट्यावर येवून महिलेस पैश्याचे आमिष देत चुकीचे कृत्य कर असा दम दिला व शिवीगाळ करीत महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सचिन पाटील हे करीत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात यंदाच्या वर्षी लोकसभासह विधान सभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी राजकारण तापविले आहे. यासंदर्भात तिनही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी काळातील महायुतीच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दादा भुसे व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जाण्याचा आमचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलो आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार आहे. हा विश्वास आम्हाला आहे. असे सुनील तटकरे म्हणाले. तर येणाऱ्या 14 जानेवारी पासून राज्यभरात आमचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असून नुकतेच पुणे शहरात देखील गुन्हेगारी वाढत आहे. नुकतेच एका बापाने जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोलीत घडली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोलीत वडिलांकडून अक्षदा फकीरा दुपारगुडे या मुलीवर धारधार शस्त्राने वार केला आहे. जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोके, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जन्मदात्या बापाने…

Read More

धुळे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील आदिवासी प्रकल्प विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापिकेने चार हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निवृत्ती शिक्षकाचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या पटांगणात निवृत्त शिक्षक राजेंद्र चौधरी (वय ५८, रा. आनंदनगर, दोंडाईचा) यांचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. गटविम्याच्या रकमेचे देयक बिल शिंदखेडा उपकोशागार कार्यालयात सादर करावयाचे होते. तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी ठरली होती. दरम्यान १ जानेवारीला लाचलुचपत विभागाचे…

Read More

 पाचोरा : प्रतिनिधी  शहरात एका २३ वर्षीय तरुणीवर विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एका परिसरात २३ वर्षीय तरुणी धुनी भांडी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असते. दि.२२ एप्रिल रोजी तरुणी कामाला जात असतांना याच परिसरातील एक संशयित आरोपी तरुण या तरुणीचा पाठलाग करून तिला म्हणाला कि, तु जर माझ्या सोबत लग्न नाही केले तर तुला चाकू खोचून मारून टाकेल अशी धमकी देखील दिली तर त्यानंतर दि.३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा तरुण पुन्हा तरुणी कामावरून घरी जात असतांना तरुण या ठिकाणी दुचाकीवर आला असता तरुणीचा हात पकडून तु…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत असून पुढील काही दिवसात हवामानात बदल होताना पाहायला मिळणार आहे. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन…

Read More

सांगली : वृत्तसंस्था शहरातील एका नामांकित शिक्षणसंस्थेत सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत चाळे करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. शिक्षकाने चाळे केल्याची माहिती घाबरलेल्या विद्यार्थिनीने मैत्रिणींना दिली. त्यावेळी अन्य काही विद्यार्थिनींनीही आपल्यासोबतही सरांनी असेच कृत्य केल्याचे सांगितले. ही बाब पालकांपर्यंत पोहोचली. त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना माहिती दिली. त्यानंतर सावंत पालकांसह शाळेत गेले. मुख्याध्यापक, संस्थाचालक व संबंधित शिक्षक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. शिक्षकाकडे सखोल विचारणा केली असता, त्याने प्रथम कानावर हात ठेवले; पण विद्यार्थिनींपुढे तोंड बंद ठेवले. त्यानंतर संतप्त पालक व मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. शिक्षकाने माफी मागण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

Read More

पंढरपूर : वृत्तसंस्था शहरात सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता हे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्यामुळे भरलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली आणि जेथून पारण्याची वरात निघायची तेथून वरपित्याची अंत्ययात्रा निघाली. पंढरपूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सुभाष देवमारे (५८) यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील सुभाष देवमारे यांच्या मुलगा अमित देवमारे या तरुणाचा मंगळवार, २ जानेवारी रोजी दुपारी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. डीजेच्या दणदणाटामध्ये नरदेवाची हळदीची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव वेगावे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी मानराज पार्क परिसरातील चौफुलीजवळ घडली, या अपघातात पूनम प्रभाकर जाधव (वय ३८, रा. खोटेनगर) या दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगर परिसरात पूनम जाधव या वास्तव्यास असून रविवारी त्यांच्या (एमएच १९, डीव्ही १५२७) क्रमांकाच्या दुचाकीने वाघनगर येथे जात होत्या, मानराज पार्क चौफुलीजवळ आलेल्या असताना दुचाकीला भरधाव ट्रकने (एमएच १८, एए ६६५५) धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा पाय फॅवर होण्यासह दोन्ही हातांना व डोक्याला मार लागला, या प्रकरणी पूनम जाधव यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More