चाळीसगाव : प्रतीनिधी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाशी लग्न करून देण्याची मागणी करणाऱ्या मुलीला अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला, मात्र त्यानंतरही पळून जाणाऱ्या मुलीसह तरुणाला पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यातील तामसवाडी येथून अटक केली आहे. पळून गेल्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण आण्णा मोरे (१९, रा. तामसवाडी, ता. चाळीसगाव) याला ७ जानेवारी रोजी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून त्याला सोमवार, ८ जानेवारी रोजी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील एक १६ वर्षीय मुलगी व तामसवाडी येथील लक्ष्मण मोरे यांचे प्रेम जुळले होते. त्यामुळे मुलीने तिच्या वडिलांकडे लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला, त्या वेळी…
Author: editor desk
धुळे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतानी नुकतेच धुळे तालुक्यातील नवे भदाणे फाट्यावर रविवारी पहाटे ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकला. यात ट्रक महामार्गावर उलटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. शमीम छोटे खान (वय ४४, उत्तर प्रदेश) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी सुदैवाने रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते. नाही तर मोठी दुर्घटना घडली असती. सीजी ०४ एमझेड ८२०५ क्रमांकाचा ट्रक धुळ्याकडून साक्रीच्या दिशेने वेगाने जात होता. नवे भदाणे फाटाजवळील हॉटेल बाळसखासमोर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकाची भिंत तोडून उलटला. यात ट्रक बराच अंतर घसरत गेला.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन अनेक प्लान आखीत कारवाई करीत आहे. पण सध्या पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करण्याचे काम करतात. मात्र, हेच पोलीस जर भक्षक बनले तर? अशीच एक धक्कादायक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलिस अधीक्षक अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. या महिला पोलिसांनी केलेल्या आरोपांवर खळबळ माजली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार या संबंधातून या महिला शिपाई गर्भवती राहिल्याने त्यांना जबरदस्तीने गर्भपात देखील करायला भाग पाडण्यात आलं. यासोबतच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील कोट्यावधी लोक सोशल मिडीयाच्या अनेक ठिकाणी नेहमीच व्यस्त असतात त्यातील इन्स्टाग्राम हे सर्वाधिक लोकांच्या पसतीस उतरले आहे. पण याच एका कारणाने चक्क एका पत्नीने परिवाराच्या मदतीने पतीचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना रविवारी ७ जानेवारी रोजी बिहारमधील बेगुसराय याठिकाणी घडली आहे. आरोपी महिलेला इंस्टाग्राम रील्स बनवण्याची आवड होती. मात्र तिच्या पतीला ही गोष्ट आवडत नव्हती. पतीने विरोध केला आणि तिला रील बनवण्यापासून रोखले. यावरुन महिलेचा राग अनावर झाला आणि तिने नातेवाईकांच्या मदतीने पतीची हत्या केली. महेश्वर कुमार असे मृताचे व्यक्तीचे नाव असून तो कोलकाता येथे मजुरीचा काम करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच…
कोल्हापूर : वृत्तसंस्था ‘पैसे काय मागतोस, मी कोण आहे तुला माहिती नाही काय?’ असे धमकावत चार वर्ष फुकट बिर्याणी खाणाऱ्या गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री ताराराणी चौक परिसरातून अटक केली. आकाश आनंद भोसले (३०, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. फेरीवाले आणि व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मोहीम या कारवाईने सुरू झाली. गेल्या चार वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दमदाटी करून आकाश भोसले हा त्यांच्याकडून फुकट खाद्यपदार्थ उकळत होता. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास व्यवसाय करू देणार नाही, असेही तो धमकावत होता. पोलिसांनी शनिवारी फेरीवाले आणि व्यावसायिकांची बैठक घेऊन गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले.…
जळगाव : प्रतिनिधी शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. याप्रकरणी वसीम खान कय्युब खान (वय २५) या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुभाष चौकातील मंदिराजवळ १३ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत भिक मागत होती. त्यावेळी संशयित वसीम खान कय्युब खान हा मुलील (एमएच १९ ईएच ५४३१) दुचाकीवरुन जळगाव ते भुसावळ मार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील एका शेतात घेऊन गेला आणि त्याठिकाणी वसीम खान याने मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्या वेळी त्यांनी शनिपेठ…
जळगाव : प्रतिनिधी शहरात कामनिमित्त बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवल्याची घटना समता नगरात घडली होती. चोरी करणाऱ्या प्रकाश श्रावण सुरवाडे (वय १८) व दीपक सुभाष भांडारकर (वय २१, दोघ रा. समतानगर) या संशयितांना अवघ्या तीन तासात रामानंद नगर पोलिसांनी जेरबंद केले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरमधील रहिवासी प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय ४०) या शनिवारी कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ७१ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्टया असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल…
जळगाव : प्रतिनिधी चालकाला पैसे खाली पडल्याचे सांगत त्याचे लक्ष विचलित करून कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप लहान मुलाच्या मदतीने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवार, ५ जानेवारी रोजी रात्री दाणाबाजारातील एका सुका मेव्याच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी शनिवार, ६ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्राने नवीन दुकान सुरू केले म्हणून दर्शन ईश्वर चोरडिया (२४, रा. नवीन बसस्थानक जवळ) हे तेथे भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लॅपटॉपची बॅग चालकाच्या बाजूच्या सीटवर ठेवली व दुकानात गेले. कारजवळ तीनजण आले व बसस्थानक कोठे आहे, असे कारमध्ये बसलेल्या चालकाला विचारले. त्याने पत्ता सांगितला व त्याचवेळी तुमचे पैसे…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील श्रीहरीनगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून दहा लाखांची रोकड लांबवली. ही घटना भरदिवसा रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. भुसावळ शहरातील श्रीहरीनगरातील श्रीसत्य अपार्टमेंट समोरील घरमालक मुकेशकुमार कुमावत (वय ४५) हे साइटवर मार्बल फिटिंगच्या कामाला गेले होते. तर दुपारी त्यांच्या पत्नी भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. चोरट्याने ही संधी साधत दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व हॉलमध्ये ठेवलेल्या पलंगातील तब्बल दहा लाखांची रोकड घेऊन पोबरा केला. अर्ध्या तासाने कुमावत यांच्या पत्नी घरी परतल्यावर चोरीचा उलगडा झाला. सुदैवाने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने सुरक्षित राहिले. दरम्यान, माहिती मिळताच बाजारपेठ…
वर्धा : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात पोलीस विभाग अनेक तरुणांना नाशेपासून रोखत असतांना नुकतेच एक खळबळजनक घटना राज्यात उघडकीस आली आहे. अमली पदार्थाची विक्री करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात. वर्धामधील हिंगणघाट येथे एकाने गांजा या अंमलीपदार्थची झाडे चक्क घराच्या छतावर लावलीत. झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला अटक केलीये. तसेच गांजाची दोन ते अडीच फूट उंचीची ४२ झाडं जप्त केलीत. हिंगणघाट पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून आकीब (३१) रा. जगन्नाथ वॉर्ड हिंगणघाट, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आकीब याने घराच्या छतावर गांजा अमली पदार्थाचे हिरवे, ओले अशी दोन ते…

