भुसावळ : प्रतिनिधी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या स्कॅनिंग मशीनमध्ये सामान स्कॅन करण्यास सांगितल्याचा राग आल्याने बिहारच्या प्रवाशाने कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना १३ रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात राजकुमार प्रसाद खेदू प्रसाद (३५, रा. महनाकुली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ तास प्रवाशांची वर्दळ असलेल्या भुसावळ रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर नेहमीप्रमाणे ऑपरेटर म्हणून आरपीएफ हवालदार प्रकाश विठोबा तुरकाने (५८) (रा. आरपीएफ बॅरेक) हे स्कॅनर मशीनवर १३ रोजी कर्तव्यावर असताना आरोपी राजकुमार प्रसाद यास सामान स्कॅन मशीनमध्ये तपासणी करण्याचे सांगितले असता याचा त्याला राग आला व त्याने प्रकाश तुरकाने…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रामानंद नगरातील नंदनवन कॉलनी परिसरात आईने मुलीच्या हातून मोबाइल घेत तिला अभ्यास करण्याचे सांगताच संतप्त झालेल्या १२ वर्षीय मुलीने थेट गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यात पद्मश्री ऊर्फ परी भरत पाटील या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत शिक्षक भरत पाटील हे वास्तव्यास असून त्यांची १२ वर्षांची मुलगी पद्मश्री ही मोबाइल खेळत असताना आईने तिच्याजवळील मोबाइल घेत अभ्यास करण्यास सांगितले. याचा राग आल्याने पद्मश्री हिने दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील झोक्याच्या कडीला ओढणीच्या साहाय्याने गळफास…
राजस्थान : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात प्रेम प्रकरणातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच राजस्थानमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीसोबत झालेल्या वादातून प्रियकराने तरुणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलिसांना घटनेची माहीती मिळताच अवघ्या ६ तासांत या घटनेचा छडा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील आसिंद गावात बुधवारी (ता.१०) रोजी ही धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांना घटनेची माहीती मिळताच तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने अवघ्या ६ तासांत या घटनेचा छडा लावला. या घटनेत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासोबत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या केलेल्या चौकशीत हत्या केलेल्याचे कारण समजून पोलिसांनी धक्का बसला. मयत…
लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच लातुरमधील उदगीर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असून नराधमांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय. सदर घटनेमुळे उदगीर हादरून गेलंय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुमठा येथे एका १४ वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना १३ जानेवारी रोज शनिवारी १२ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव आहे. आपल्या मुलाचा कोणीतरी खून केलाय असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतोष १० जानेवारी रोजी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात नांदायला येत नाही म्हणून पती-पत्नीत वाद होऊन पती अजिता हमीद तडवी (३१, रा. तांबापुरा) याने पत्नी शहनाज तडवी (२२, रा. तांबापुरा) यांना मारहाण करीत मानेवर विळ्याने वार केला. ही घटना १२ जानेवारी रोजी हरिविठ्ठलनगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तडवी दाम्पत्यामध्ये वाद असल्याने पत्नी शहनाज या माहेरी निघून गेल्या- त्यांना घेण्यासाठी अजित तडवी गेला असता, तेथे वाद झाला. त्यावेळी तुम्ही दारू सोडली व कामधंदा केला तर मी सोबत येईल, असे सांगितले. त्याचे वाईट वाटून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच विळ्याने मानेवर वार करून जखमी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात विक्रीसाठी तंबाखू पानमसाला साठवून ठेवलेल्या किराणा दुकान व गोदामावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत दोन लाख ४४ हजार ६८६ रुपयांचा तंबाखू पानमसाला जप्त केला. ही कारवाई १२ जानेवारी रोजी करण्यात आली. साठवणूक करणारे रमेश जेठानंद चेतवाणी, दीपक रमेश चेतवाणी व सीमरन रमेश चेतवाणी (रा. कंवरनगर) हे फरार झाले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीत एका गोदामासह किराणा दुकानात तंबाखू-पानमसाला असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, सचिन विसपुते यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर दुकान व गोदामात जाऊन पाहणी केली.…
जळगाव : प्रतिनिधी विचार वारसा फाउंडेशन आयोजित 12 जानेवारी निमित्त राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगांव येथील रक्तपेढीसाठी विचार वारसा फाउंडेशन कडून रक्त संकलन करून देण्यात. आले तसेच संध्याकाळी ०६:०० वाजता जळगाव शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रात असलेल्या महिला सत्कार विचार वाचा फाउंडेशन च्या महिलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरिता कोल्हे, पल्लवी देशमुख, शोभा चौधरी, सुमित्रा सोनवणे, आशा अंभोरे, मंगला मराठे, शकुंतला सोले, अलकनंदा देशमुख, संगीता राजपूत, सुरेखा निकम,भारती जाधव,रिता वाघ, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर अभिषेक पाटील, रवि देशमुख…
फैजपूर : प्रतिनिधी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आढळून एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दि. १२ रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. हा अपघात भुसावळ – पाडळसा रोडवर घडला. या अपघातात राजेंद्र कडू बाविस्कर (वय ४७) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचे डिझेल संपल्याने ट्रकचालक शेख शरीफ शेख सखावत (फैजपूर) ट्रकचे (क्र. आरजे ११ जीए ६३०२) तो रस्त्यातच उभा केला. यावेळी त्याने इंडिकेटर अथवा रिफ्लेक्टर ट्रकला लावले नव्हते. याच दरम्यान, राजेंद्र बाविस्कर भुसावळकडून पाडळसा येथे मोटारसायकलने येत असताना त्यांची मोटारसायकल ट्रकच्या मागील बाजूस आदळली. या अपघातात ते ठार झाले. याप्रकरणी पोलिसात माणिक रामा तायडे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगणे येथील एका ३० वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यांचा सात महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. संसाराची नवीनच सुरुवात झाली असताना काळाने असा क्रूर घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणे येथील अक्षय उर्फ निवृत्ती गजानन पाटील (वय ३०) हा मार्केटिंगचा व्यवसाय करणारा तरुण दि. ११ रोजी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतला असता त्याला अचानक हृदयाचा त्रास झाला. लगेचच उलटी होऊन तो खाली कोसळला. नातलगांनी रुग्णालयात आणले असता त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या तरुणाचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील फेकरी शिवारात रेल्वे प्रशिक्षण केंद्राजवळ शनिवारी दि.१३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. यात भावेश अनिल भालेराव (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाल असून त्याच्या डोक्यावर व गळ्यावर वार केले आहे. माहिती कळताच घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, शहरचे सहायक निरीक्षक अनिल मोरे यांनी धाव घेतली. मृतदेह ट्रामा सेंटरला हलविण्यात आला असता तेथे त्याच्या नातेवाइकांची गर्दी जमली होती. दरम्यान, एका आरोपीस रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुका पोलिसात रात्री उशिरापयर्यंत गुन्हा दाखल करणे सरु होते.

