Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील खडका रोडवरील हिरा हॉलजवळ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या वादातून खाद्यपदार्थ विक्रेता अजीम शेख (३५) यांच्यावर चाकू व लोखंडी रॉड मारून प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अजीम खान यांच्या फिर्यादीवरून काफील खान ऊर्फ बंटी शकील खान (३६), शादाब खान ऊर्फ गोलू (२६) यांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. रेहान शकील खान (२०) हा फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजीम शेख हे खाद्यपदार्थ विक्री करून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी त्यांचा लहान भाऊ रईसोद्दीन शेख व मित्र शाहरुख खाटीक व आरोपीचा भाऊ…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी घराबाहेर खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीला चॉकलेट देऊन तिला शेजारच्या घरात नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी अफरखान राऊत खान (२२, रा. मदिना मशिदीजवळ, चाळीसगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ रोजी दुपारी आरोपीने तिला चॉकलेट खाण्यास दिले. नंतर तिला १०० रुपये देऊन शेजारच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी या घटनेची फिर्याद दिली. त्यावरून त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीसह विवाहितेचा विनयभंगाच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच कुर्ला रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने दुसऱ्या महिलेवर विनयभंगाचा आरोप केला आहे. शुक्रवारी ट्रेनने प्रवास करताना ही घटना घडली आहे. शुक्रवारी धावत्या ट्रेनमध्ये एक महिला आणि महिला फेरीवाल्यांमध्ये भांडणे झाली. यात त्या दोघींची हाणामारीदेखील झाली. ट्रेनमधील प्रवाशांनी त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. धावत्या ट्रेनमध्ये या दोघींमधील भांडणे वाढली. यात एका महिलेच्या कुर्त्याची बटणे तोडली. त्यामुळे वाद आणखीच चिघळला. त्यानंतर हे प्रकरण कुर्ला जीआरपीपर्यंत गेले. याप्रकरणी महिलेने कुर्ला जीआरपीमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाविषयी अत्यंत बेताल वक्तव्य केल्यानंतर गेल्या दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे सोमवारी पोलिसांना शरण आले. दुपारी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, निलंबित निरीक्षक बकाले यांना जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बकाले यांना न्यायमूर्तींच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. आपल्या…

Read More

यावल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका तरुण पोलिसाच्या खुनाची बातमी ताजी असतांना यावल तालुक्यात देखील एका बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माझे लग्न करून द्या अशी मागणी करत करत असलेल्या वृद्ध वडिलांना स्वतःच्या मुलाने रागात येउन कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्न तानसिंग कोळी (वय-७३ रा. पिळोदा ता. यावल) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी व त्याची पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्यास असून ते नेहमीप्रमाणे रविवारी १४ जानेवारी रोजी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वसंतवाडी तालुका जळगाव येथील ३०५४ या लेखशीर्षतंर्गत सन २०२३-२०२४ या योजनेतंर्गगत प्रजिमा मार्ग क्र. शिरसोली ते वसंतवाडी रस्त्यापासुन वसंतवाडी ते विटनेर शिवरास्ता ग्रामीण मार्ग क्र.५०(इजिमा १०८) दापोरा शिरसोली लामांजन कु-हाडदे वसंतवाडी विटनेर रस्ता इजिमा १०८चे जलनिसारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.जळगांव ५०:०० लक्ष एवढ्या रकमेचे काम मंजूर झालेले आहे. या कामाचे भुमिपुजन सोहळा आज वसंतवाडी येथे जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील व जि.प.सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी जळगाव जिल्हा दूध संघाचे तज्ञ संचालक रमेश पाटील, जळगाव तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष पि .के .पाटील, जळगाव तालुका शिवसेना समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण,जळक्याचे लोकनियुक्त सरपंच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या काळचौकी परिसरातून एक भीषण आगीची बातमी समोर आली आहे. या परिसरातील मिंट कॉलनीमध्ये एकापाठोपाठ एक ८ गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यातच आज मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनी येथे ७ ते ८ घरगुती गँस सिलिंडरचे स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. सर्वत्र आरडाओरड आणि पळापळ सुरू आहे. काळाचौकी परिसर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना जीवे ठार मारण्याच्या धमकी नियमित येत असतांना आता नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ मुस्लीम व्यक्तींचे संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे. हे मुस्लीम तरुण उर्दूतून हे संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम रेंटवर घेणार असल्याचे नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीन सांगितलं…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावासह एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. हा प्रकार १२ जानेवारीला घडला. या प्रकरणी तालुका व एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात असताना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवीत फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी शनिवारी (दि.१३ जानेवारी) तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत. दुसरी घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुकानावरून बिस्कीट घेऊन येते असे सांगून गेलेल्या १६ वर्षीय…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलच्या मागे असलेल्या रेणुका जनरल स्टोअर्समधून मोटारसायकलवर आलेल्या दोन युवकांनी सिगारेट घेतली व सिगारेट घेत असतानाच दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व मंगळसूत्र मंगळसूत्र लांबविले. ही घटना शनिवारी १३ रोजी दुपारी घडली. या धूम स्टाईल केलेल्या चोरीमुळे महिला वर्गात खळबळ उडाली आहे. जामनेर रोडवर असलेल्या प्रीमियर हॉटेलच्या मागे रेणुका जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर लाल रंगाच्या मोटारसायकलवर दोन युवक आले. त्यांनी दुकानात असलेल्या विजया हरी सपकाळे (६२,रा. जामनेर रोड, भुसावळ) यांना सिगारेटची मागणी केली. सिगारेट घेतल्यावर दोघांपैकी एका भामट्याने महिलेच्या गळ्यात असलेली ६० हजारांची चेन व ३० हजारांचे मंगळसूत्र तोडत…

Read More