Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात रिक्षा चालकाला लुटल्या प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी !
    क्राईम

    जळगावात रिक्षा चालकाला लुटल्या प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी !

    editor deskBy editor deskDecember 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील गोपाळ एकनाथ शिंदे हे जळगाव शहरातील एका कंपनीमध्ये साहित्य पोहोचविण्यासाठी आलेले असतांना त्यांना मारहाण करून पैसे काढून नेल्याप्रकरणी राकेश भीमराव सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी) व त्याचा साथीदार गोपाळ रवींद्र पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

    मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी गोपाळ शिंदे हे त्यांच्या मालवाहू रिक्षाने औद्योगिक वसाहत परिसरात एका कंपनीमध्ये साहित्य पोहोचविण्यासाठी गेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांना मारहाण केली होती. तसेच त्यांच्या खिशातून बळजबरीने तीन हजार ५०० रुपये काढून घेतले होते.

    या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या सूचनेनुसार पो.उ.नि. नीलेश गोसावी, दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांपैकी राकेश सपकाळे याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.