Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीने केले प्रियकरासोबत धक्कादायक कृत्य : विवस्त्र आढळला मृतदेह !
    क्राईम

    प्रेयसीने केले प्रियकरासोबत धक्कादायक कृत्य : विवस्त्र आढळला मृतदेह !

    editor deskBy editor deskDecember 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना गेल्या काही वर्षापासून घडू लागल्या आहेत. अशीच एक थरारक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. गेल्या चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केलीय. आपल्या मुलाच्या मदतीने या महिलेने भेटीसाठी घरी आलेल्या प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर त्याला टेकडीवर फेकून दिलं.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या प्रियकराचं नाव आनंद साहेबराव वाहुळ (२७) रा. कबीरनगर, उस्मानपुरा) आहे. आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचं एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते. ते दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यामुळे आनंद हा मुंबईला निघून गेला होता. मात्र मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला. शहरात आल्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळा माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झालाय, त्याला हे कळेल, वाद वाढतील, असं या महिलेने त्याला सांगितलं. परंतु आनंद यासाठी तयार नव्हता. आनंद ऐकत नसल्याचं पाहून या महिलेने त्याची हत्या करण्याचा कट केला. या महिलेने तिचा मुलगा व इतर तीन आरोपींच्या मदतीने १३ डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करत त्याला बेदम मारहाण केली.

    गंभीर अवस्थेत त्याला दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे आनंदचा मृत्यू झाला. साई टेकडी परिसरात सांयकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह आढळला. त्यांनी या प्रकरणाची माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. या घटनेचे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांचे पथक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेनदासाठी घाटीतील शवागृहात पाठवला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावचा तिढा सुटल्याचा दावा अन् रेश्मा काळे नॉट रिचेबल; महायुतीत खळबळ

    June 12, 2026

    कर्जमाफीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण; ४० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विनाअट लाभ, बँकिंग व्यवस्था टिकवण्यासाठीच एकमेव अट

    June 12, 2026

    सराफा दुकानात ग्राहक बनून प्रवेश; ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल लंपास!

    June 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.