जळगाव : प्रतिनिधी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ८१ हजार ७२० रुपये किमतीचा आठ किलोपेक्षा जास्त गांजा बेवारस स्थितीत आढळून आला. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) तो जप्त केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध मंगळवार, १६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी रात्री रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार विनोद साळवे, डी.एच. खैरनार हे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना फलाट क्रमांक दोनवर एक ट्रॉली बॅग, लाल व पिवळ्या रंगाची कापडी पिशवी बेवारस स्थितीत आढळून आली. आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, वैध मापन विभागाचे उपनियंत्रक बा. गं. जाधव, निरीक्षक चंद्रशेखर पालीवाल यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक भागात तुफान वाळू वाहतूक सुरु असल्याने एका ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. यात एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाचोरा येथील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात आकाश राजेंद्र पाटील (२६), अमोल अरुण चौधरी (३२) आणि दादाभाऊ महादू गाडेकर (३०, सर्व रा. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्राण येथील नदीपात्रात शुक्रवार दि. १२ रोजी रात्री एरंडोल प्रांत मनीष गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर सर्व गुन्हेगार फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने यापैकी तीन आरोपींना मंगळवारी पाचोरा येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना…
जळगाव : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी जाणार्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात करतार तोताराम पवार (वय ४८) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे करतार पवार आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास असून एमआयडीसीतील मकरा एजन्सी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. सोमवार १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने येत असताना कुसुंबा गावाच्या काही अंतरावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने करतार पवार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना नुकतेच ठाण्याच्या कळवा पूर्व या परिसरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेत एका व्यक्तीस गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. संदीप पुजारी असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्तीवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करीत आहेत. तसेच…
गडहिंग्लज : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलासह मुली देखील गळफास घेत आत्महत्या होण्याच्या घटना नियमित वाढत असतांना नुकतेच गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे एका शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. यात १७ वर्षीय श्रावणी प्रकाश गोरुले हिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सरंबळवाडी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश गोरुले त्यांची मुलगी श्रावणी हीदेखील त्याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. २०१९ पासून श्रावणीला डोकेदुखीचा त्रास होता. त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार सुरू होते. १ जानेवारीला सीटीस्कॅन व एमआरआय रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्या तरी तिची डोकेदुखी कमी…
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच वर्धा शहरात मामा-भाच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या घरगुती मुद्द्यांवरुन वाद होत होते. एक दिवस हा वाद विकोपाला गेला. भाच्याने चक्क मामाच्या डोक्यावर विटेने प्रहार करीत जबर मारहाण केलीय. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. प्रकाश देवराव मसराम असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात संशयित आरोपी खुशाल राजू तुमडाम (२५) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी खुशाल आणि मृतक प्रकाश हे दोघेही मामा-भाचे आहेत. हिंगणघाटच्या इंदिरानगर येथील एकाच घरात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक गुन्हेगारी घटना नेहमीच प्रेमप्रकरण तर पैश्याच्या वादातून होत असतात, अशीच एक धक्कादायक घटन उघडकीस आली आहे. सीवूड येथे झालेल्या बिल्डरच्या हत्येप्रकरणी एनआरआय पोलिसांनी मृत विकासकाची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. विकासकाचा विविध गुन्ह्यांत सहभाग असल्याने संपत्ती जप्त होण्याच्या भीतीने त्यांनी हत्या केल्याचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सीवूड सेक्टर ४४ येथील अमन डेव्हलपर्सचे मनोजकुमार सिंग (३९) यांची शनिवारी हत्या झाली होती. कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळला होता. मृत सिंग यांच्यावरही फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हत्येमागे आर्थिक वादाचे कारण आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या हत्येमागे…
चाळीसगाव : प्रतिनिधी क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दि. २१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. अटकेतील आरोपींमध्ये सौरभ अण्णा कोळी (३२), वसंत राजू बच्छाव (४०) व चित्रा ऊर्फ जयश्री कैलास मोरे (४२) यांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजता मयत शुभम आगोणे यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यातील फरार आरोपींमध्ये माजी नगरसेवक आनंदा चिंधा कोळी, सिद्धांत अण्णा कोळी, जय कैलास मोरे, पृथ्वी कुमावत यासह ३ ते ४ अनोळखी इसम (सर्व रा. चाळीसगाव) यांच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस खुनाचा गुन्हा दाखल…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील वेळोदे येथील रहिवासी संदीप प्रकाश पाटील (२६) या तरुणाचा मोहिदे गावातील शेतात वीजतारांचे काम करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. १५ रोजी सकाळी १०: ३० ते ११ वाजेदरम्यान घडली आहे. मयत संदीप हा गत तीन वर्षापासून ठेकेदारी पद्धतीने वीज मंडळाचे रोजंदारीने मजूर म्हणून काम करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोहिदे येथील शेतकरी सोपान बाबुराव पाटील यांच्या शेतातील खांबावरील विजेचे तार लोंबकळत होते. हे काम करत असताना विजेचा धक्का लागून संदीप पाटील हा गतप्राण झाला. तर सोबत काम करणारे समाधान रामकृष्ण पाटील (अनवर्दे), दिनेश विकास पाटील (गणपूर), ज्ञानेश्वर भगवान पाटील (अनवर्दे) हे जखमी झाले…

