मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून देशातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना जीवे ठार मारण्याच्या धमकी नियमित येत असतांना आता नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ मुस्लीम व्यक्तींचे संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे. हे मुस्लीम तरुण उर्दूतून हे संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम रेंटवर घेणार असल्याचे नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीन सांगितलं आहे. या माहितीनंतर मुंबई पोली सतर्क झाले असून कसून तपास करत आहेत.