जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावासह एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. हा प्रकार १२ जानेवारीला घडला. या प्रकरणी तालुका व एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात असताना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवीत फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी शनिवारी (दि.१३ जानेवारी) तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत. दुसरी घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुकानावरून बिस्कीट घेऊन येते असे सांगून गेलेल्या १६ वर्षीय मुलीला अज्ञाताने पळवून नेले. याविषयी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहेत