जळगाव : प्रतिनिधी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे सेवानिवृत्त विद्यार्थी प्रमोद ठोसर प्रथम तर एस.टी.संवर्गातून परवर लतिक तडवी (179) तिसऱ्या क्रमांकाने व विजयसिंह पाटील यांची जळगाव तलाठीपदी निवड झाल्याबद्दल त्याचा क्लासतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील, नारायण पाटील, उमेश सुर्यवंशी उपस्थित होते. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या शिक्षकांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन लाभल्याने हे यश प्राप्त करता आले असे उद्गार परवर तडवी याने सत्काराप्रसंगी काढले. मेहनत व कष्टाच्या बळावर रिक्षा चालकाचा मुलगा तलाठी होवू शकता असे गौरोद्गार वासुदेव पाटील यांनी काढले. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सर्व परिवाराकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात आले.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाची कार पार्किंगमध्ये उभी केलेली असताना तिच्यावर धारदार वस्तूने ओरखडल्याने कारचे नुकसान झाले आहे. यात कारवर धारदार वस्तूने अश्लील शब्दही लिहिले आहेत. हा प्रकार शुक्रवार, १५ मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेनगर परिसरातील निखिल दीपक अग्रवाल हे पत्नीसह शहरातील एका चित्रपट गृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची कार (एमएच १९, ईजी २३५५) पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री १०:१५ वाजता ते चित्रपट पाहून बाहेर आले असता, त्यांच्या चारचाकीच्या चहूबाजूने अज्ञात टवाळखोरांनी धारदार वस्तूने ओरखडे पाडले होते, तसेच अश्लील…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शांतीनगर परिसरातील शिक्षक कॉलनीत मारुती मंदिराच्या आवारात असलेल्या ट्रॉन्सफॉर्मरने पेट घेतल्याने या परिसरात पाच टीव्ही, चार फ्रीज, पाच एसी, ३० पेक्षा जास्त लाइट, पाण्याचे पंप, संगणक जळाले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे या भागातील रहिवाशांचे सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगरातील शिक्षक कॉलनी भागात असलेल्या मारुतीच्या मंदिराच्या आवारात वीज कंपनीची डीपी बसविली आहे. या डीपीवर मोठ्या प्रमाणावर झाडे आणि वेली वाढलेल्या आहे. डीपीवर वाढलेल्या वेलींमुळे तेथे शॉर्टसर्किट होताच डीपीने पेट घेतला. डीपीने पेट घेताच या भागातील अनेक घरांमध्ये सुरू असलेले टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, संगणक…
मेष : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. मित्र आणि नातेवाईक मदत करतील, त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी रहाल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे आपल्या महत्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळात ही भेटू शकतात परंतु, शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल. आज तुम्ही सर्वात दूर जाण्याच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीच आजपासून बिगुल वाजले असून लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज दि.१६ रोजी लोकसभेचे वेळापत्रक जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात २० मे ला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिलपासून, 7 मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान असेल तर ४ जूनला मतमोजणी होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी…
जळगाव : प्रतिनिधी एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण केले. अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात होत असताना शरद पवार साहेबांनी त्यांना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना उमेदवारी दिली. पक्ष वाढला नाही मात्र गटबाजी वाढली. आज खडसे विधानपरिषद सदस्य आहेत. ज्यांनी मतदान केले त्यापैकी २५ सदस्य आज अजित पवारांसोबत आहे. खडसेंमध्ये स्वाभिमान असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी पुन्हा निवडून यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच बारामती इच्छूक उमेदवार सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याविषयी काही उद्गार…
चाळीसगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जेष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, सुरेश तात्या सोनवणे, संजय भास्करराव पाटील, के.बी.साळुंखे, प्रेमचंद खिवसरा, सुरेशभाऊ स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, शेषरावबापू पाटील, जगनअप्पा महाजन, महिला मोर्चाच्या देवयानीताई ठाकरे, संगीताताई गवळी, मार्केट सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, संघटना पदाधिकारी प्रशांत पालवे, धनंजय मांडोळे, रमेश सोनवणे, प्रा.सुनील निकम सर, नितीनभाऊ पाटील, घृष्णेश्वर तात्या पाटील, शेतकी संघाचे अविनाशनाना चौधरी, विवेक चौधरी, अमोल चव्हाण, अमोल नानकर, गिरिष बरहाटे, युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, गोरख राठोड, मनोज…
जळगाव : प्रतिनिधी एप्रिल २०२३-२४ या कालवधीत तीन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या नियमीत शेतकऱ्यांना केवळ कर्जाची मुद्दल भरावी लागणार आहे. त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना चेअरमन संजय पवार यांनी सांगितले की, जिल्हा बँकेकडून एप्रिलमध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करावी लागते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची वसूली व्याजासह करावी असे आदेश दिले होते. मात्र या आदेशामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती. याबाबत नुकतीच नाशिक येथे सहकार मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील उमाळा ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी व घरपट्टीचे बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रूपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. संदीप चंद्रभान निकम रा. जामनेर असे अटक केलेल्या तत्कालीन ग्रामसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमाळा ग्रामपंचायतमध्ये १३ मार्च २०२३ ते ३ जुलै २०२३ च्या दरम्यानच्या काळात संशयित आरोपी संदीप चंद्रभान निकम हे ग्रामसेवक पदावर होता. त्यावेळी ग्रामसेवक पदावर असतांना पाणीपट्टी व घरपट्टीची बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात पंचायत समितीचे अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश इंगळे…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील जलचक्र बुद्रूक शिवारातील विहिरीत महिनाभरापूर्वी एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेमागील गूढ उकलण्यात जवळपास महिन्याने बोदवड पोलिसांना यश आले आहे. ही घटना खुनाची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकास अटकही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेत कुजल्यामुळे चेहरा नव्हता. हाडांच्या सांगाड्यात असलेल्या कपड्यांवरून तपास करीत पोलिसांनी हा तपास लावला आहे. गत महिन्यात १८ फेब्रुवारीला तालुक्यातील जलचक्र बु, शिवारात शंकर जयराम पाटील यांच्या शेतातील १०० फूट खोल कोरड्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तब्बल महिनाभर तपास सुरू ठेवला. मयत कुवरसिंग राजाराम बारेला (३५, रा. खामना, जि. बुऱ्हाणपूर, हल्ली मुक्काम जुनोना, ता. बोदवड) असल्याची ओळख पटवत…

