मेष विद्यार्थ्यांना आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आज कुटुंबियांसोबत चांगला वेळ जाईल. काही दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेल्या समस्येवर उपाय सापडेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ती आज पूर्ण होणार आहेत. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज योजना आखून एखादे काम कराल आणि मेहनतीचा संपूर्ण फायदा मिळेल. योजलेली सर्व कामं आज पूर्ण होतील. आज एखाद्या चांगल्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. उत्पन्न मिळवण्याच्या, कमाईच्या अनेक संधी मिळतील. मिथुन मन स्थिर नसल्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल, परंतु तुमच्या प्रियजनांच्या मदतीने तुम्हाला दिलासा मिळेल. कार्यालयात आज तुमचे काम लक्षणीय वाढू शकते. जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो. एखाद्यासोबत वादही होऊ…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण झाली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विवाहीत महिलेच्या हत्येने सध्या परिसरात खळबळजनक वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या अधिक महितीनुसार, नाशिकच्या तामसवाडी निफाड येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एक विवाहीत जोडपं येथे राहत होतं. महिलेचा पती कायम दारूच्या नशेत असायचा. पती सतत दारू पित असल्याने पत्नीचे आणि त्याचे नेहमी भांडण व्हायचे. काल देखील या दोघांमध्ये अशीच जोरदार भांडणे झाली. ही भांडणे इतकी विकोपाला गेली…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. ८१ वर्षीय बिग बी यांना शुक्रवारी सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. 2018 च्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात ॲक्शन सीन करताना त्यांना खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नव्हती मात्र त्यांना बॉडी डबल वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी हा सीन स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये कौन बनेगा करोडपती 14 च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस धातूच्या तुकड्याने कापली गेली होती. सेटवर स्नायूतून खूप रक्तस्त्राव झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अमिताभ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा उद्या, शनिवारी निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसह ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुका सात ते आठ टप्प्यांत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर पूर्ण आयोगाची बैठक झाली. ही बैठक जवळपास ४५ मिनिटे चालली. निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात…
जळगाव : प्रतिनिधी कुठल्या न कुठल्या कारणावरुन वाद घालणाऱ्यांकडून तिघांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. ही घटना दि. १२ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शासकीय कायटीआय शेजारी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय आयटीआय शेजारी बाली करण कातोळी (वय २९) या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १२ मार्च रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक शारदा मोरे यांनी त्यांच्या सासू व पुतण्या हा बाली कातोळी यांच्या सासू सोबत भांडण करीत होते. दरम्यान, त्यांचे पती हे भांडण का करत आहे अशी विचारणा केली असता, तिघांकडून महिलेस तिच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली.…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील चोरवड गावाजवळील मातोश्री हॉटेलसमोर रस्त्यावर अज्ञात वाहने कुऱ्हा पानाचे येथील युवकास धडक देत चिरडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १.४० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हापानाचे येथील सेंटींग काम करणारा सचिन श्रीराम सपकाळे (वय ३४) हा रस्त्याने पायी जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपगातात हा तरुण गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी महेंद्र शिवदास सपकाळे यांच्या फिर्यादिवरून अज्ञात वाहन चालकाविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, सचिन सपकाळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ बाळू…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होताच तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार मुंबईत आज सकाळी ६ वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव १०४.१५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा भाव ९२.१० रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९४.९२ रुपये आणि ८७.६२ रुपये प्रति लिटर इतके आहे. याआधी राज्य सरकारने जुलै २०२२ मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेलचे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून नजीक असलेल्या बांभोरी गावानजीक ज दि.१५ रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव डंपरने क्रूझरला दिलेल्या धडकेत जळगावातील तीन ठार तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील साई नगर परिसरातील शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणार्या डंपर ने क्रुझरला दिलेल्या जोरदार धडकेत, भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मृत झालेल्यांमध्ये विजय हिम्मत चौधरी (वय ४०), तुषार वासुदेव जाधव(वय २८) रा.खोटे नगर व भूषण सुभाष खंबायत(वय ४५ ) साई नगर निमखेडी…
पाचोरा : प्रतिनिधी मुलगा काही कामधंदा करत नाही व माझ्या जिवावर बसून खातो, याचा राग येऊन निवृत्त पोलिस बापाने मुलाच्या डोक्यात वखारटीची पास टाकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरून आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बापाला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गाळण (विष्णूनगर) येथील निवृत्त पोलिस अजमल यमाजी चव्हाण (६०) हे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी दारू पिऊन आले असता पत्नी गंगाबाई अजमल चव्हाण यांनी स्वयंपाक करून जेवणास वाढले. यावेळी अजमल चव्हाण यांनी ताटात वाढलेली भाजी बेसिनमध्ये फेकून देत पत्नी व मुलास शिवीगाळ सुरू केली. यावेळी मुलगा कन्हैया…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील जामठीनजीक कुऱ्हा रस्त्यावर गुरे वाहून नेणारी तीन वाहने गोरक्षकांनी पकडली. यात नऊ बैल आहेत. पोलिसांनी वाहनासह चालकांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनक्रमांक एम.एच. ०२ वाय ए ५८३२, वाहन क्रमांक एमपी ०७ जीए ४७७९ व अन्य एक वाहन अशा तीन गुरे वाहून नेत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली त्यांनी जामठीनजीक कुन्हा रस्त्यावर ही वाहने अडविली. यामुळे एकच खळबळ उडाली, शेकडो गोरक्षक एकत्र आले होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन वाहने व त्यामधील नऊ बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांची गोशाळेत रवानगी केली जाणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले

