Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था वातावरणातील बदल आणि अल्प पर्जन्यमान यामुळे यंदा डाळींचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच डाळींचे दर वाढले आहेत. त्यातच एप्रिलमध्ये येणाऱ्या नव्या डाळींचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर डाळींचे गणित गृहिणींसाठी कसरतीचे राहणार आहे. डाळींच्या वाढत्या किमती महागाईसाठी कारणीभूत ठरत आहे. देशातील सर्व जनतेला पुरेल इतक्या कडधान्यांचे उत्पादन होत नसल्यामु‌ळे देशाला डाळींची आयात करावी लागते. गेल्यावर्षी डाळींचे पीक चांगले आले नाही. यावर्षी तर दुष्काळ असल्यामुळे उत्पादनावरही चांगलाच फटका बसला. त्यामुळे आगामी वर्षभर तरी डाळींच्या किमती गगनाला भिडणाऱ्याच राहतील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात कुटुंबातील सर्वजण कामावर गेलेले असल्याने गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक झाले. तसेच घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या विळख्यात सापडल्याने चार कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली. ही घटना सोमवार दि. १८ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरातील साईनगर भागात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची घरे आहेत. यापैकी एका शेजारी एक असलेल्या पत्र्यांच्या तीन घरांमध्ये नितीन भटकर, अशोक भटकर, रोहित सुनील भारुळे, रमेश यशवंत शिंदे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी या चारही कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यानंतर अचानक त्यांतील एका घराला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या किरण अनिल बाविस्कर (वय २४, रा. गेंदालाल मिल) हा चॉपर घेऊन दहशत माजवित होता. शहर पोलिसांच्या पथकाने सोमवार दि. १८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार किरण बाविस्कर याला उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी २ वर्षांसाठी जिल्हा हद्दपार केले आहे. दरम्यान जिल्हातून हद्दपार असताना देखील तो शहरात येऊन हातात लोखंडी चॉपर घेवून दहशत माजवित असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवार दि. १८ मार्च…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव येथे एका दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक उकीरड्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मृत अर्भकाला ताब्यात घेत तपास सुरू केला. दरम्यान चाळीस वर्षीय विधवा महिलेने हा प्रकार केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली होती. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून सुनसगावातील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील चाळीस वर्षीय विधवा महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक उकीरड्यावर टाकून दिले. गुरुवार दि. १४ मार्च रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास हा प्रकार मार्च रोजी दुपारी सव्वादोन घडला. याप्रकारानंतर गावात मोठी खळबळ उडाली. भुसावळ तालुका पोलिसांनी मृत अर्भकाला ताब्यात घेत तपास सुरू केल्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी डंपर मागे घेत असताना गॅरेजवर काम करणारा दीपक सदाशिव खजुरे (२८, रा. तानाजी मालुसरे नगर) हा मेकॅनिक डंपर व झाडाच्यामध्ये दाबला गेला. यात त्याच्या छातीच्या बरगड्या, खांद्याचे हाड तुटून तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १६ मार्च रोजी ऑटोनगरमध्ये घडली. या प्रकरणी १७ मार्च रोजी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव भुसावळ रस्त्यावरील ऑटोनगरमध्ये दीपक खजुरे हा तरुण एका गॅरेजवर काम करतो. १६ मार्च रोजी गॅरेज मालक व सदर तरुण काम करत असताना गॅरेजसमोरून एक जण डंपर (क्र. एमएच १९, सीएक्स ०३४१) मागे घेत होता. त्या वेळी डंपरच्या मागे असलेला दीपक हा…

Read More

यावल : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रक जप्त करण्यात आला होता. तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा काढून हा ट्रक पळवून नेण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या पथकाने रविवारी रात्री वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आणि तो तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता. हा ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. दरम्यान, सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन जणांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकला आणि आवारात लावलेला ट्रक पळवून नेला. या प्रकरणी किनगाव येथील कोतवाल…

Read More

भुसावळ : वृत्तसंस्था रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत; पण भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या जास्त मदत करतात, असा आरोप करीत वरणगावसह परिसरातील २०५ भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे पाठविले आहेत. वरणगाव येथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सुपर वॉरियर यांची बैठक रविवारी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. भाजपतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याविरुद्ध तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामध्ये यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी…

Read More

धुळे : वृत्तसंस्था शहरातील एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करीत विनयभंग केल्याची घटना घडली. तसेच तरुणीचे भावाच्या लग्नातील फोटो एडिट करून ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून, पीडित तरुणीने धुळे शहर पोलिस ठाण्यात जळगाव येथील कल्पेश मुकेश पाटील (वय २४) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी हा पीडित तरुणीला ३ जुलै २०२२ पासून त्रास देत होता. या कालावधीत त्याने शहरातील खांडलविप्र भवनाजवळ तरुणीला गाठून विनयभंग केला. त्यानंतर भावाच्या लग्नात काढलेले फोटो एडिट करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४-अ, ब आणि ड तसेच ५०६ अन्वये गुन्हा दाखल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अरविंद बंगेरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीची वडापावची गाडी आहे. या व्यक्तीने मंत्रालयातील जाळीवर उडी का घेतली, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात पुन्हा एकदा एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मंत्रालयातील जाळीवर अरविंद बंगेरा नामक व्यक्तीने उडी मारली. अरविंद बंगेरा हे वडापाव विक्रेते आहे. अरविंद बंगरेा हे बोरिवली येथे राहतात. अरविंद बंगेरा यांनी उडी मारल्यानंतर पोलिसांची धावाधाव झाली. बंगेरा यांना मरीन…

Read More

मुंबई : प्रतिनिधी सध्या उष्णतेची लाट आहे, तर काही भागात पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार, १६ ते १९ मार्च दरम्यान काही ठिकाणी ढग दाटून येण्याची शक्यता आहे. ही स्थिती मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह भागात राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढग कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 16 ते 19 मार्चपर्यंत विदर्भात ढग आणि पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. सकाळ थंड असते, दुपार कडक असते, त्यानंतर संध्याकाळ थंड असते. अशा परिस्थितीत राज्यात पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे.…

Read More