लाईव्ह महाराष्ट्र न्युज विजय पाटील संपादक लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र दोन दिवस अगोदर त्यांची उमेदवारी रद्द करत खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. आणि या निवडणुकीत उन्मेष पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता या निवडणुकीतही जाहीर केलेल्या यादीत स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार लोकसभा उमेदवारीसाठी भाजपाचे जिल्ह्यातील दोन बडे नेते दुसऱ्या नावासाठी आग्रह धरलेला आहे. त्यामुळे पुन्हा स्मिता वाघ यांच्या उमेदवारी बदल मागच्या निवडणुकीप्रमाणे प्रमाणे होण्याची शक्यता आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे उमेदवारी रद्द…
Author: editor desk
नागपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावामध्ये पती, पत्नी आणि मुलगा असे तिघांचे मृतदेह घरात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तिघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरच्या (Nagpur) मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावातील एका घरात कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मलता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) अशी मृतांची नावे आहेत. श्रीनिवास इळपुंगटी यांचा राईस मिलचा व्यवसाय असून या तिघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप समोर आले आहे. याबाबतची माहिती मिळताच…
जळगाव : प्रतिनिधी ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांचे अपहरण करून रात्रभर दोरीने हात पाय बांधून ठेवत डांबून ठेवत बंदुकीचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच दांडका चापटा लाथा बुक्यानी मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक ३-३-२४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता. या अनुषंगाने पोलीस घटनेचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेल्या असता त्यांना सदर घराला कुलुप आढळून आल्याने पोलीस माघारी परतले होते. यानंतर पोलिसांनी पुन्हा कोर्टात धाव घेत घर धडाधडतीचे परवानगी कोर्टाकडून घेतली व यावेळी आरोपी यांचे बंधू मनोज पाटील हे प्रत्यक्ष हजर होऊन इन CAMERA अडीच तास 20 ते 25 कर्मचाऱ्यांवर संपूर्ण घराची काल…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : विजय पाटील संपादक रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना पुन्हा शह देण्याचा प्रयत्न भाजपकडे केला आहे. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची झालेल्या बैठकीमध्ये रक्षा खडसे यांची नणंद यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची एकमत झाले असल्याची सूत्रांकडून विश्वसनीय माहिती मिळाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना घरामध्येच राजकीय पेच पुन्हा भाजपने निर्माण केला आहे. खडसे यांनी आधी लोकसभा निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. परंतु मंगळवारी पत्रकार परिषद…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या रितेश गजानन सोनवणे (वय २०, रा. शिरसोली इंदिरानगर) याच्यावर शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या पार्कीगमध्ये शिरसोली इंदिरानगरातील रितेश गजानन सोनवणे हा तरुण (एमएच एमएच १९ बीडी ५३४७) क्रमांकाच्या मोटारसायकलजवळ उभा होता. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ खान्देश सेंट्रल मॉल परिसरात धाव घेतली. संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या रितेश सोनवणे याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा व जीवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी पोलीस…
चाळीसगाव : प्रतिनिधी आई-वडील अभ्यासावरून रागवले, म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलीने रागाच्या घरात घर सोडले. या रागातच ती मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेने जात असताना चाळीसगाव येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या रूपाने देवदूत मिळाला अन् ही मुलगी भरकटण्यापूर्वीच बचावली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले व सहकारी पोना. राकेश पाटील हे दि. १२ रोजी मानवी हक्क आयोग कार्यालय, मुंबई या ठिकाणी सेवाग्राम एक्सप्रेसने जात असताना त्यांच्या बाजूला सीटवर बसलेली साधरणतः १५ वर्षे वयाची मुलगी कावऱ्याबावऱ्या नजरेत दिसून आली. घुले यांनी विचारपूस केली असता तिने गोपालपुरा, नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. ही मुलगी नववी इयत्तेत असून तिचे आई वडील तिला अभ्यासावरून नेहमी सतत बोलत…
यावल : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. याच्या निषेधार्थ यावल व रावेर तालुक्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी सामूहिक राजीनामे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे सादर करीत संताप व्यक्त केला. यात जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, भाजपा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, भाजपा ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षला पाटील, फैजपूर माजी नगराध्यक्ष् पांडूरंग सराफ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष् सागर कोळी, व्यंकटेश बारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राजीनामे दिले.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना अशाच एक अपघातात भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या वाहनाचा (एमएच १८ एजे २५२६) मोठा अपघात दि.१३ रोजी बुधवारी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास वीटनेर- पळासखेडा रस्त्यावर झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व त्यांचे चालक आनंदा नेवे यांना दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील एका ठिकाणी ज्ञानेश्वर जळकेकर हे मंगळवारी कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेले होते. कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून रात्री आपल्या गावाकडे परत येत असताना, पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास चालक आनंदा नेवे यांना डुलकी लागल्याने वाहनाचा ताबा सुटला, नियंत्रण सुटलेले वाहन रस्त्याच्या पलीकडे धडकले. सुदैवाने वाहन…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकाऱ्यांच्या नावे ३० हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या जळगावातील खासगी महिलेस धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. बुधवारी २.१५ वाजता जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला. विद्या परेश शाह (३८, रा. जुने भगवाननगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे मौजे पुरी, ता. रावेर येथे वडिलोपार्जित बागायत शेतजमीन आहे. या शेत जमितीत दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी व म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज हवे हवे असल्याने त्यांनी दहा दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधला असता तेथे संशयित विद्या परेश शाह…
जळगाव : विजय पाटील जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या ऐवजी अमळनेरच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी भाजपने आज जाहीर केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून जळगाव मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांना ठाकरे गटाकडून कोण टक्कर देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत आज भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. यात जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी न देता त्यांच्या जागी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चर्चा आहे.…

