Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आंबेडकरांचे आवाहन : जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी
    राजकारण

    आंबेडकरांचे आवाहन : जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी

    editor deskBy editor deskFebruary 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक लढवावी. कारण, मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही. जरांगेंनी लोकसभा लढवली तर त्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येतील, असे ते म्हणालेत.

    प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आवाहन केले. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे. त्यांनी आपला लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही. आमरण उपोषणातून जी जनजागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षणासाठी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

    मनोज जरांगेंनी कोणत्याही पक्षाच्या आधाराने निवडणूक का लढवू नये? याचे उत्तरही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिले. व्यक्तीने एखाद्या पक्षाच्या आधाराने निवडणूक लढवली, तर त्या व्यक्तीवर त्या पक्षाची बंधने येतात. या बंधनांमुळे गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी जरांगे लोकसभेच्या निवडणुकीत बिनधोकपणे निवडून येतील असा दावाही केला. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. आमची भूमिका ते मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026

    भाजप प्रदेश माध्यम विभागात मोठा फेरबदल – राज्यभर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर!

    April 21, 2026

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.