जळगाव : प्रतिनिधी आईला भेटण्यासाठी जात असलेली मुलगी, जावयाच्या कारला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाले. ही घटना रविवार दि. १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महामार्गावर खोटेनगरजवळ घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा सचिन पाटील (वय २५, रा. आयोध्यानगर) यांच्या आईची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा यांच्यासह त्यांचे पती सचिन पाटील (वय ३५), मुलगा देवांश सचिन पाटील (वय वय अडीच वर्षे) तसेच प्रतीक्षा यांची बहीण नंदीनी पाटील (वय १९), विनोद सोपान पाटील (वय ४५) हे कारने रविवारी दुपारी एरंडोल येथे जाण्यासाठी निघाले. त्यांची कार खोटे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यापासून अनेक धक्के बसत असतांना आता पुन्हा खानदेशातून एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. नंदुरबारमधील ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांनी – रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनीही शनिवारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात जाणे पसंत केले होते. ठाकरे गटातून शिंदे गटात ‘ऑऊटगोईंग’ सुरुच असून, बुधवारपर्यंत आणखी काही नेते शिंदे गटात येतील, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत आमश्या पाडवी यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था आजकाल शेतीच्या वादातून लोक आपली नाती विसरतात, आणि एकमेकाच्या जीवावर उठतात अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे. शेती व घराच्या वाटणीच्या वादातून सख्ख्या व चुलत भावानी मिळून दगड, विटानी हल्ला करून भावाचा खून केला. ही घटना पिरोळा (ता. सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर) येथील शेतात शनिवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी खून करणाऱ्या दोघा भावांना अटक केली आहे. या घटनेत खून झालेल्या भावाचे नाव जम्मन त्र्यबंक गोरे (वय ६५, रा. भराडी ह.मु. पिरोळा ता. सिल्लोड) असे आहे. तर त्यांचा खून करणाऱ्या आरोपी सख्ख्या भावाचे नाव रघुनाथ त्र्यबंक गोरे व चुलत भावाचे नाव…
जळगाव : प्रतिनिधी लहान मुलीला बोलल्याच्या कारणावरुन रस्त्याने जात असतांना महिलेला शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी महिलेचा मुलासह पतीवर देखील धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १७ मार्च रोजी पिंप्राळा हुडको परिसरातील गौतम नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील गौतम नगरात अलका भिमराव अहिरे या महिला वास्तव्यास आहे. त्या विश्वास चंडाले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला असून त्या मुलगा सागर, दिनेश यांच्यासोबत राहतात. दि. १६ मार्च रोजी त्यांच्या गल्लीत राहणारी मुलगी मंदिरात आली होती, यावेळी अलका अहिरे या त्या मुलीला तुम्ही मटन खातात मंदिरात…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील कुन्हे बुद्रुक येथे जागा खाली करण्याच्या वादावरून एकाला लोखंडी रॉड व चाकूने मारहाण करून जखमी केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती. जखमी दवाखान्यात उपचार घेऊन आल्यावर फिर्याद दिल्याने अमळनेर पोलिस स्टेशनला उशिराने चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप रामसिंग पाटील यांनी हे आपल्या घरासमोर अंगणात उभा असताना शेजारी राहणारे नाना गुलाब पाटील, मालूबाई नाना पाटील आले व त्यांनी जागा खाली करून का देत नाही असे विचारू लागले. प्रदीप यांनी उताऱ्यावरील जागा मोजून घ्या, असे सांगताच त्यांना राग येऊन त्यांनी प्रदीप व त्याची पत्नी याना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील श्यामवाडी येथील २८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत १६ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेवणनाथ संभाजी माळी (२८, शामवाडी ता.चाळीसगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे, रेवणनाथ माळी हा श्यामवाडी येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १५ रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास गावाजवळील एका विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव येथे रवाना करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. तपास पोलिस नाईक भगवान माळी…
यावल : प्रतिनिधी गोवंशाची वाहतूक करताना एक वाहन गोरक्षकांनी दहिगावजवळ पकडले. तालुक्यातील दहिगाव-कोरपावली रस्त्यावर शनिवारी रात्री हनीफ दगडू तडवी रा. महलखेडी हा (वाहन क्रमांक एम. एच.०४एच. एस .१९८७) अवैधरीत्या गोवंश वाहतूक करीत होता. हा प्रकार दहिगाव गावातील गोरक्षकांच्या निदर्शनास आला असता त्यांनी वाहन पकडले. यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार हे पथकासह दाखल झाले. त्यांनी वाहन व वाहनचालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरा याप्रकरणी यावल पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस करीत आहे.
मेष आज तुमचा दिवस चांगला जाईल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. तुमच्या जोडीदारामध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. शक्य असल्यास इतरांचे मत घेऊनच कोणतेही काम सुरू करा, यश मिळू शकते. ऑफिसमधील बॉस तुमच्या कामावर खूप खुश असतील. कोणतेही नवीन निर्णय घेणे टाळा. तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात उत्साहाचे वातावरण असेल. या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे, तुम्हाला तुमच्या कलागुणांसाठी पुरस्कारही मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमच्या भावनांबद्दल बोलाल. तुम्ही त्यांनाही कुठेतरी बाहेर काढाल. या राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल, तुमच्या कंपनीला…
भुसावळ : प्रतिनिधी दुचाकी चोरांना भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वी तपास करीत दुचाकी चोरांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून संशयित ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठ पो.स्टे. भुसावळ येथे दि. २५ जून २०२३ रोजी दुचाकी चोरी झालेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे. तपास दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर येथून तीन संशयितांना अटक केली आहे. यात शेख बासीद शेख बाबु (वय २८, रा. सुलतानपुरा, जळगाव जामोद, जि. बुलढाणा हल्ली मु. मोहम्मदी नगर, भुसावळ), मोहम्मद…
एरंडोल : प्रतिनिधी खडके सिम येथे दुचाकीने परत जात असताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला दुचाकीने धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कासोदार रस्त्यावर घडली. त्यात जखमी दुचाकीस्वार प्रणय जितेंद्र पाटील (२३, खडके सिम) या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय हा जळगाव येथे रायसोनी महाविद्यालयात बी.टेकला शेवटच्या वर्षाला शिकत होता. तो एरंडोल येथे व्यायामशाळेत व्यायामाला आला होता. घरी परत जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रणय हा दुचाकीने (एमएच१९/इजे२४३८) एरंडोल येथून खडकेसिम येथे कासोदा रस्त्याने घरी परत जात होता. कुंदन परदेशी यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रॅक्टर (एमएच१९/बीजी५१७०) उभा होते. त्यास रिफ्लेक्टर, इंडिकेटर लावलेले…

