Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नदीपात्रात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह
    क्राईम

    नदीपात्रात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

    editor deskBy editor deskFebruary 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शहरातील हिवरा नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सारोळा रस्त्यावरील हिवरा नदी पात्रातून दुर्गंधी येत असल्याचे नदी पात्राशेजारील नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयातील तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे पथक व रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

    घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या मयताच्या अंगात काळ्या रंगाची जीन्स पँट, फुल बाहीचा निळ्या रंगाचा शर्ट आढळला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस कॉन्स्टेबल विनोद पाटील करत आहेत. या तरुणाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पाचोर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.