जळगाव : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून वाद होऊन एकनाथ वसंत खरसाने (५०, रा. समतानगर) यांच्यासह त्यांच्या मुलाला दोन जणांनी मारहाण केली. यावेळी लोखंडी सळईने वार करण्यात आल्याने दुखापत झाली. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी समतानगर परिसरात घडली. याप्रकरणी मंगळवार, १९ मार्च रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फळ विक्रेते असलेले एकनाथ खरसाने यांचा त्याच परिसरातील एकासोबत वाद झाला. त्यावरून खरसाने यांच्यासह त्यांच्या मुलाला दोन जणांनी मारहाण केली. तसेच हातावर लोखंडी सळईने वार केला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी खरसाने यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी नवीन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस कुंटणखान्यावर बुधवारी सायंकाळी शहर पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणाऱ्या आणि त्यांना हा व्यवसाय करायला भाग पाडणाऱ्या एकूण ६० महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील या परिसरात गुन्हेगारी तसेच दुचाकी चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. या कारणावरून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि पथकाने ही कारवाई केली आहे. या सर्व महिलांना रात्री उशिरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी सुरु होती. सर्वच देहविक्रय करणाऱ्या पीडित महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. हा कुंटणखाना अनेक वर्षे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल परिसरात दि.१९ मार्च मंगळवार रोजी पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचे त्याच परिसरातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याने तिने व तिच्या मुलीने महिलेला मारहाण केली. त्यावेळी शेजारील एक महिला तेथे भांडण सोडविण्यासाठी आली असता, तिलाही मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या दोघींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या सोबतच संबंधित पतीच्या पत्नीनेही शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रेमसंबंधाचा संशय असलेल्या महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी हातात तलवार घेऊन कारमधून उतरणाऱ्या आदेश पांडुरंग सपकाळे (२७, रा. एसएमआयटी कॉलेजजवळ, म्हाडा कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत तलवार व कार जप्त केली. ही कारवाई लक्ष्मीनगर परिसरात मंगळवार रोजी रात्री करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक जण हातात तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या पोउनि दीपक जगदाळे, पोकों मुकेश पाटील, साईनाथ मुंढे, छगन तायडे हे लक्ष्मीनगरात पोहोचले. तेथे आदेश सपकाळे हा कारमधून (एमएच ०३ सीएम ०९५९) हातात तलवार घेऊन उतरताना दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तलवार…
चाळीसगाव : प्रतिनिधी रेल्वेच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा डंपर व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन महिला जागीच ठार, तर १७ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता हिरापूर गावानजीक एका हॉटेलजवळ घडली. अपघात होताच डंपर चालक तेथून पसार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनीबाई सोमनाथ यादव (३०, रा. तिनगडा ता. जि. कबीरनाथ छत्तीसगड) व सरस्वती रामप्रसाद उईके (१७ वर्ष रा. दामितितराहि ता.जि. डिडोरी म.प्र.) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून येथे २५ ते ३० मजूर काम करीत होते. हे काम पूर्ण झाल्याने हे मजूर २० रोजी…
मेष आजचा दिवस सकारात्मक असेल. नशिबाच्या तुमच्या बाजूने असेल. अध्यात्माची आवड निर्माण होईल. तुम्ही तुमच्या ज्ञानावर आणि कामाच्या कौशल्यावर अधिक काम करू शकाल. व्यवसायात प्रगतीची शक्यता वाढेल. कोणतीही नवीन जबाबदारी तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने पार पाडाल. काही कारणांमुळे खर्च वाढतील. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात. एकमेकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक वाद टाळा, रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांना चांगले यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. पैशाच्या बाबतीत इतर कोणावरही विश्वास ठेवणे टाळा. वैवाहिक जीवनात आनंद…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शहरातील एका भागात ड्रग्ज घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली असून . त्यांच्याकडून सुमारे 75 लाख लाखांचे कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी 18 प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेआहेत. या कारवाईमुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे मेथाक्वालोन नावाच्या ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी चाळीसगाव व नाशिक यांचे कनेक्शन समोर आले होते. त्यात भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल परिसरात काहीजण ड्रग्ज मोठा साठा घेवून जात असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रशांत सोनार यां ना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी १९ मार्च…
जळगाव : प्रतिनिधी विट्टभट्टीवर काम करणारा मजूराने दुचाकी चोरुन तो वापरत असतांना एलसीबीच्या पथकाला मिळून आला. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. अर्जुन सुरेश कुंभार (रा. बोरावल गेट, यावल) असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिसारातून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याठिकाणाहून चोरलेली दुचाकी यावल येथील विटभट्टीवर काम करणारा मजूर अर्जुन कुंभार हा वापरत होता. परंतु गुन्हा घडल्यापासून संशयित चोरटा फरार होता. दुचाकी चोरणारा अर्जुन कुंभार हा बोरावल गेट जवळ आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा शनिवारी निवडणूक आयोगाने केली. तेव्हापासून जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता प्रशासनातर्फे लागू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे शहरातील राजकीय फलक बॅनर आदी साहित्य काढण्याचे कारवाई करण्यात आली. मात्र शासकीय विश्रामगृहात राजकीय नेते व कार्यकर्त्यांची अजूनही जळगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठका गुप्तपणे होत असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे या बैठकांवर अंकुश घालणारे प्रशासन जागे होईल का? असा सूर नागरिकांकडून केला जात आहे. एकंदरीत सध्या जळगाव लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीची आचारसंहिता देखील लागली असून १३ मे रोजी जळगाव व रावेर मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर…
जळगाव : प्रतिनिधी नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जगदीश हिलाल ठाकरे (वय ३८, रा. सुटकार, ता. चोपडा) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झत्तला. ही घटना सोमवारी रात्री कानळदा रस्त्यावर आव्हाणे फाट्याजवळ घडली. या प्रकरणी धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील सुटकार येथे जगदिश ठाकरे हे वास्तव्यास होते. शेतीकाम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दि. १७ रोजी जगदिश ठाकरे व ज्ञानेश्वर पंडित ठाकरे हे धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते रात्री दुचाकीने ते सुटकार येथे परतत…

