Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा भयानक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना मृतदेह बाहेर काढून फेकून देण्यात आला आहे. रविवारी रात्री अत्यंविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर नेरे गावातील प्रकाश सदाशिव बढे या संशयित व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये जात हा प्रकार केला. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबधित व्यक्तीला बघितल्यानं ही घटना उघडकिस आली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत, त्याचं हॉटेल जाळलं. दरम्यान या घटनेनंतर गावात तणाव निर्माण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मारोती सुझूकी कंपनीच्या इको वाहनाचे सायलेन्सर चोरी करणार्‍या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर पाच गुन्ह्यांची उकल झाली असून नाशिकच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. आरोपींना एक साथीदार कारागृहात असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार आहे. मनीष उर्फ सनी रवींद्र महाजन (20, शिरूड नाका, अमळनेर), शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील (23, शिरूड नाका, अमळनेर) व निखील संतोष चौधरी (22, राजाराम नगर, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाईचे निर्देश दिले.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक घटना सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर नेहमीच येत असतात अशीच एक संतापजनक घटना छत्तीसढमध्ये समोर आली आहे. एका शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याच शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे. शाळेत एक शिक्षक दारू पिऊन आला होता. त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी चप्पल आणि बुट फेकून मारलेत. शिक्षकाला विद्यार्थ्यांनीच अगदी शाळेबाहेर पळवून लावलं आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर घटना एक आठवड्यांपूर्वीची असल्याचं समजलं आहे. बस्तर ब्लॉक येथील पालीभाटा प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. शाळेमध्ये एक शिक्षक दररोज नशेत यायचा. शाळेत येतानाच तो आधी दारू पिऊन येत होता. त्यानंतर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी तो शाळेत झोपून घ्यायचा. सर उठा आम्हाला शिकवा,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी “ खान्देशची मुलूखमैदान तोफ “ म्हणून परिचीत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते मार्च गुलाबराव पाटील यांची स्टार प्रचारक म्हणून निवड झाली आहे. ना. गुलाबराव पाटील यांची तोफ आता लोकसभा निवडणुकांच्या निमीत्ताने संपूर्ण राज्यात धडाडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रकारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 40 नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. यातशिवसेना नेते तथा “ खान्देशची मुलूखमैदान…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ममुराबाद गावाजवळ बुधवारी सायंकाळी सहा वाजता रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने भरधाव एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आलम शेख (वय २८) आणि सादिक जुम्मा पिंजारी (२०, दोघे रा.आझादनगर, पिंप्राळा, जळगाव) हे दोघे रोजा सोडण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकीने (जीजे ०६ केई ०५४२) जळगावला जात होते. समोरून येत असलेल्या एसटी समोर (एमएच १४ बीटी २२१६) कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने पुढील दुचाकीला जबर धडक दिली व त्यानंतर…

Read More

रावेर : प्रतिनिधी उटखेडा शिवारात नकट्या नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात ९ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये रोख, सात दुचाकी, काही मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहे. रविवारी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात आरोपी राहुल उत्तम भालेराव (२५) मुकेश धना भालेराव, (३२ दोन्ही रा. कुसुंबा खुर्द ता. रावेर मोसीन हुसेन तडवी (२७, रा. रावेर) कलीम रज्जाक खाटीक (४२) फिरोज रमजान तडवी (४०), विकास रमेश पवार (३०), सुलेमान आमद तडवी (३७), कादर रुबाब तडवी (३३), पाचही रा. लोहारा ता. रावेर व काशीनाथ तापीराम…

Read More

यावल : प्रतिनिधी शहरातून टाकरखेडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, यावल टाकरखेडा रस्त्यावरून दुचाकीवरून मुकुंदा गंगाराम सोनवणे (वय ३२), नितीन हिरालाल तायडे (वय ३३) व शरद सोपान कोळी (वय ३३, तिघे रा. भालशिव ता. यावल) हे जात होते. दरम्यान टाकरखेडा गावाजवळील वळणावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, परिचारिका मंजूषा कोळेकर, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तिघांची प्रकृती गंभीर…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी फायनान्सचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून युवकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेवक पुत्रासह पाच जणांविरुद्ध बुधवारी (दि.२७) बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील इमामवाडा येथील अझहर खान सलीम खान (३३) या युवकाने फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर फ्रीज घेतला आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे दोन हप्ते भरता आले नाहीत. याबाबत वसीम शेख शफी याने २४ रोजी सायंकाळी पाच वाजता जाब विचारल्यानंतर अझहरने धंदा व्यवस्थित सुरू नाही, खूपच अडचण आहे. मात्र मागील हप्ते व चालूचा हप्ता लवकरच भरण्यात येईल, असे सांगितल्याचा वसीमला राग आल्याने त्याने अझहरला शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत पोलिसांत तक्रार करू, असे अझहरने…

Read More

धुळे : वृत्तसंस्था पांढऱ्या भिलाव्याचे आमिष दाखवित नाशिक जिल्ह्यातील एकास तालुक्यातील अजनाळे शिवारात लुटण्यात आले. गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करत त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड हिसकावून नेली. ही घटना एप्रिल २०२२ मध्ये घडली. या प्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर धुळे तालुका पोलिस ठाण्यात पितापुत्रासह सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नानाजी शहाजी बंदरे (वय ४२, रा. मौजे वखारी, ता. देवळा जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली. त्यांना विनोद ग्यानदेव चव्हाण (वय ५२) व चॅम्पियन विनोद चव्हाण (वय ३५, रा. अजनाळे ता. जि. धुळे) यांच्यासह चौघांनी ‘पांढरा भिलावा देतो’, असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांना धुळे तालुक्यातील अजनाळे गाव शिवाराजवळ असलेल्या डोंगरातील…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी कळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही घरामध्ये काही कार्यक्रम आयोजित करू शकता. मित्रांसोबत बाहेर जाता येईल. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. दैनंदिन कामातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्हाला काही विशेष काम करायचे असेल तर आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. या राशीच्या कलाकारांसाठी आजचा दिवस विशेषतः चांगला आहे. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. संयमाने काम केल्यास यश नक्की मिळेल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. ऑफिसमध्ये काही विशेष बदल होतील,…

Read More