धुळे : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात प्रतिबंधित असलेल्या सुंगधित सुपारीची अवैध वाहतूक सुरु असून नुकतेच पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेक पोस्टवर संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना सुगंधित सुपारी मोठ्या प्रमाणात आढळून आली. यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई आग्रा रोडवर इंदौरकडून शिरपूरमार्गे राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधित सुपारीची विना परवाना अवैधरित्या वाहतूक होत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीद्वारे राष्ट्रीय महामार्ग पळासनेर गावाजवळ लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर संशयित वाहनांचा तपास सुरू असताना मध्य प्रदेशमधून आलेल्या एम.एच.१२ क्यु.डब्ल्यु.३२२४ सुपारी आढळून आली. तस्करीसाठी वापरण्यात येणारा ट्रक पोलीस ठाण्यात आणून दोन पंच बोलावून ट्रकची ताडपत्री उघडून तपासणी केली १२…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मालाडच्या मालवणी परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील फरार बनावट डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. परवेझ अब्दुल अजीज शेख असे आरोपीचे नाव आहे. बनावट रुग्णालय चालवल्याप्रकरणी त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 12 ने ही कारवाई केली. मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी परवेज शेख याचा शोध घेत असताना मालाड येथील मालवणी परिसरातील बेकायदेशीर क्लिनिकचा भांडाफोड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पोलीस ठाण्यात 2023 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी हा मालवणी परिसरात बोगस डॉक्टर म्हणून…
जळगाव : प्रतिनिधी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून उत्तम प्रशासक म्हणून आदर्श निर्माण केला. “सूर्य, चंद्र जातील पण शिवराय आणि शिवरायांचे विचार कायम राहतील. शिवरायांचे चरित्र सर्वासाठी कायम प्रेरणादायी व ऊर्जास्रोत्र राहणार आहे, प्रत्येकाने शिवरायांचे विचार जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी व नशिराबाद येथे शिवजयंती उत्सवाप्रसंगी बोलत होते. पालकमंत्र्यांनी मिरवणुकीत धरला ठेका पाळधी येथे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवप्रेमीसह डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवप्रेमी सोबत आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था प्रेमप्रकरणातून चुलत बहिणीचे आतेभावाशी लग्न लावून दिल्याच्या संशयावरून मावस काकाच्या मुलाने नवरदेवाच्या अंगावर चार वेळा गाडी घालून चिरडल्याची भयंकर घटना गुरुवार, २८ मार्च रोजी दुपारी १ वाजता वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा रोडवरील शेंदुरवादा येथे घडली. नवरदेव आणि त्याचे वडील लग्नासाठी बँकेत पैसे काढायला गेले होते. पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने वडीलांसोबत बॅकेतून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय तरूणाच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्याच्या अंगावर चार वेळेस बोलेरो घालून हत्या करण्यात आली. एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार गुरूवारी 28 मार्चला दुपारी 1 च्या सुमारास वाळुज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेंदुरवादा- सावखेडा रस्त्यावर घडला. पवन…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची जोरदार धामधूम सुरु असतांना सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींसह भाजपवर आरोप केले आहे. ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरीबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ती ईडीच एक घोटाळा आहे अशी टीका देखील केली असून दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले असा गंभीर आरोप ठाकरे गटाने मुखपत्रातून भाजपवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांवरून ठाकरे गट सातत्याने भाजपवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. ”ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरीबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ती ईडीच एक घोटाळा आहे. दहशतवाद करून…
पारोळा : प्रतिनिधी किसान महाविद्यालयासमोर लावण्यात आलेल्या डंपरला दुचाकी चालकाने मागून धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक पृथ्वीराज पाटील (वय ५५) रा. पळासखेडा सीम यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी योजनाबाई पृथ्वीराज पाटील या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयासमोर महामार्गावर डंपर उभा करण्यात आला होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. पाटील हे बाजारासाठी पारोळा येथे येत होते. त्यात हा अपघात झाला. अपघातात पृथ्वीराज पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावातील वराडे गल्लीत शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून अचानकपणे दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या दगडफेकीमध्ये काही पोलिस कर्मचारी व नागरिक असे ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा व दंगा नियंत्रण पथक शिरसोली प्र.बो. येथे पोहचले होते. गुरुवारी दि.२८ शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक रात्री ८ वाजता गावातील वराडे गल्लीतील एका धार्मिक स्थळाजवळून जात असतांना अचानक मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय…
सावदा : प्रतिनिधी पाल बोर घाटातून गुरांची अवैध वाहतूक करतानासहा ट्रकचालकांना सावदा पोलिसांनी पकडले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. यावेळी वाहनांमधील १०५ म्हशींची सुटका करण्यात आली. या म्हशी सिंगत येथील गोशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी वाहने व म्हशी असा ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या वाहतुकीची माहिती लोहारा दूरक्षेत्र पोलिस चौकीचे पो.हे.कॉ. खोडपे यांना मिळाली. यानंतर फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या सूचनेनुसार बोर घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फॉरेस्ट चौकीजवळ या सहा गाड्या थांबविण्यात आल्या व पुढील कारवाई केली. सावदा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण १२…
मेष आज कौटुंबिक संबंध दृढ होतील. थोडे कष्ट करून उद्दिष्टे सहज साध्य करता येतात. व्यावसायिक कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे हेतू सहज समजतील. आज तुम्ही उच्च पदावर असलेल्या लोकांच्या संपर्कात येऊ शकता. तुमच्या कामात सामाजिक संपर्काचा फायदा घेण्यात यश मिळू शकतं. वृषभ आज तुमचे लक्ष अध्यात्माकडे जास्त असेल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. व्यापार क्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. ऑफिसच्या कामात तुम्हाला तुमच्या बॉसकडून दाद मिळेल. मिथुन आजचा दिवस उत्तम राहील. कोणत्याही समस्यांवर मात करण्यासाठी, तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत बसून मार्ग शोधू शकाल. प्रत्येक काम…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील नेहरू नगरात दुचाकीने ने जात असलेल्या व्यापाराची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेले पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता घडली. या प्रकरणातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अटक केली, त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नेहरू नगर परिसरातील ओम गोपाल चुघरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून चहा पावडरचा व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ओम सुधरा हे त्यांची स्कुटी (एमएच १९ डीएन ७८२९) ने…

