• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जरांगे पाटलांचे १७ दिवसानंतर उपोषण मागे

editor desk by editor desk
February 26, 2024
in राजकारण, राज्य
0
जरांगे पाटलांचे १७ दिवसानंतर उपोषण मागे

जालना : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.

आज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा येत्या दोन दिवसात स्पष्ट करु.. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील हे फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी भांबेरी गावातून पुन्हा जालन्याकडे परतण्याचा निर्णय घेतला.

Previous Post

गायक पंकज उदास यांचे निधन

Next Post

धक्कादायक : मध्यरात्री गच्चीवरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post
धक्कादायक : मध्यरात्री गच्चीवरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

धक्कादायक : मध्यरात्री गच्चीवरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group