रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावदा येथे शेतात सालदार म्हणून काम करणार्या प्रौढाचा निर्घृण खून करण्यात आल्यानंतर सावदा शहरात खळबळ उडाली आहे. सावदा ते कोचूर रोडवर एका शेतातील घरात सालदाराचा मृतदेह आढळला आहे. शोभाराम रिचू बारेला (45) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वृत्त असे कि, शोभाराम बारेला हा सालदार म्हणून कामाला होता व तो शेतात बांधलेल्या खोलीतच वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला असून डोक्यात दगड घालून त्याला संपविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. ही घटना कोचूर रोडवर असलेल्या बेंडाळे यांच्या शेतात घडली. शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शोभाराम बारेला यांचा मृतदेह आढळल्यानंतर…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विहीर फाट्याजवळ धक्का लागल्याच्या वादातून एकाला मारहाण करीत शस्राने भोसकले. ही घटना २५ रोजी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध धरणगाव य पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सुभाष नन्नवरे न. (कोळी) (वय ३६ धंदा मंडप दुकान, रा. न सोनवद ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ मार्च न रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मित्रांसह विहीर फाट्याजवळील हॉटेल अंजनी गार्डन येथे जेवणासाठी गेला होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रावसाहेब कैलास सपकाळे याच्या हाताचा धक्का लागला. त्यावर संदीप नन्नवरे म्हणाले की, भाऊ थोडा सावकाश चला, असे बोलल्याचा राम आल्याने रावसाहेब कैलास सपकाळे सुभाष धनसिंग सपकाळे,…
जळगाव : प्रतिनिधी खून, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे यासह वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख जगदीश जगन्नाथ महाजन (५१), टोळी सदस्य दादू उर्फ विशाल जगदीश महाजन (२३) दोघे रा. चाळीसगाव या दोघांना सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवार, २९ मार्च रोजी दिले. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश महाजन व दादू महाजन या दोघांविरुध्द चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, घातक हत्यार बाळगणे असे वेगवेगळे गंभीर १० गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार…
जळगाव : प्रतिनिधी दागिने घडवण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या लगडसह सोन्याची चेन असे एकूण १७ लाख रुपये किमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाला. ही घटना गुरुवारी, २८ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुवर्ण व्यावसायिक सोन्याचे तुकडे, लगड हे कारागिरांना देऊन त्यांच्याकडून दागिने बनवून घेतात. याच पद्धतीने सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (३०, रा. लक्ष्मीनगर) यांनी कारागीर शेख अमीरुल हुसेन (२८, रा. पश्चिम बंगाल, ह.मु, जोशी पेठ, जळगाव) याला १५ लाख रुपये किमतीची २२५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दिली. या सोन्यासह खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (रा. जळगाव) यांची…
जळगाव : प्रतिनिधी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून महिलेसह तिचा पती, सासू, नणंद यांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम स्वीकारत तब्बल एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपयांमध्ये सोनल भीमराव उपलवार (३४, रा. हरेश्वरनगर) यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चारजणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या सोनल उपलवार यांचा व्हॉटस् अॅप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीनजणांनी व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. दि. १६ फेब्रुवारी ते २८ मार्च यादरम्यान सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील बँक खात्यातून वेळोवेळी एकूण एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपये स्वीकारले.
रावेर : प्रतिनिधी शहरातील बारीवाड्यालगत उघड्यावर अवैधरीत्या २० किलो मांस विक्री करताना शेख इमरान शेख लूकमान (वय २०, रा. सिद्धार्थ नगर, रावेर) यास रावेर पोलिसांनी शुक्रवारी पकडले. त्याच्याजवळून पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचबरोबर गोमांस पुरवठा करणाऱ्यासही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आकस्मिक धाड टाकून ही कारवाई केली. या आरोपीसह त्याने हे मांस खरेदी करून आणलेल्या रसलपूर येथील आरोपीलाही पकडले. त्याच्याकडील अवैध मांस, सुरा, लाकडी गुद्दा, तराजू, वजनमापे असा पाच हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा येथील हॉटेल त्रिमूर्ती येथे जेवण आणि दारूचे बिल मागण्याच्या कारणावरून एकाने हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केली. यावेळी धारदार वस्तूने वार ही केला. ही घटना बुधवारी (दि. २७) रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवार २८ रोजी मध्यरात्री भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा येथे हॉटेलवर राजकुमार रवींद्र खरात (रा. समतानगर, भुसावळ) हा त्याच्या मित्रांसोबत आला होता. जेवण झाल्यानंतर दारूचे पैसे न देता काऊंटरवर बिल फेकून दिले. यावेळी मॅनेजर धरमदास जीवनलाल चौधरी (रा. साकरी फाटा वरणगाव रोड, भुसावळ) यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि काहीतरी धारदार…
मेष आज नातेवाईकांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगले निकाल मिळतील. आज जे काही काम हाती घ्याल ते वेळेवर पूर्ण कराल. आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, तुमचा दिवस छान जाईल. वृषभ व्यवसायात गुंतवणुकीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. आज तुम्ही मित्राला आर्थिक मदत करू शकाल. कोणतेही प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या वरिष्ठांची मदत घेतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवू शकता. तुम्हाला आरोग्याबाबत थोडे जागरूक राहण्याची गरज आहे. शिक्षकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवार २८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन ३२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या दगडफेकीच्या घटनेमुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून ताणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उप पोलीस अधीक्षक संदीप गावित,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शिरसोली येथे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सहायकारी मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता, त्यानुसार ज्या मतदानकेंद्रास जोडलेल्या मतदारांची संख्या १५०० पेक्षा अधिक होती तिथे सहायकारी (अतिरीक्त) नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले. तसेच मतदान केंद्राच्या ज्या इमारती नादुरुस्त होत्या किंवा त्यांची पडझड झाली होती. अशा मतदान केंद्राऐवजी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित केले होते. प्रस्तावित यादीवर नागरिकांकडून…

