भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळासखेडे येथे अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करत पतीचा खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत किशोर शिवाजी पाटील वय ४५ यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे व्यक्ती आपल्या पत्नी पुष्पा पाटील हिच्या सोबत वास्तव्याला होते. दरम्यान किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी जि.पुणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे अनेक वेळा या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते.…
Author: editor desk
जळगाव-प्रतिनिधी सध्या सुरू असलेल्या अतिशय कडक उन्हात आपल्याला जर कुठे मनोरंजनासह धमाल मस्ती करायची असेल तर आपल्यासाठी एकमेव गारेगार पर्याय म्हणजेच शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्ट असल्याची माहिती याचे संचालक नीरज जेसवानी यांनी दिली. ते याबाबत आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिरसोली रोडवर अनुभूती स्कूलच्या मागे, पाचदेवी माता मंदिराजवळ असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सीझन मोठ्या उत्साहात सुरू झाला असून याच्या होळी धमाका महोत्सवाला देखील उदंड प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती देण्यासाठी या वॉटरपार्कचे संचालक नीरज जेसवानी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. याप्रसंगी त्यांनी सर्वप्रथम खान्देशातील जनतेकडून मिळत असलेल्या जबरदस्त प्रतिसादाबाबत आभार व्यक्त केले.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात आता चांगलेच उन तापायला लागले आहे. त्यामुळे अनेक लोक न्हाळ्याची सुट्टी लागली की, बाहेर फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे अनेकांना फिरण्याची आवडते तर काहींना ट्रेकिंगला. यासाठी आपण ट्रिपचा प्लान करतो. यंदाच्या एप्रिल महिन्यात तुम्हाला फिरायचे असेल तर IRCTC ने भन्नाट टूर प्लान आणला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत देवदर्शनाचा प्लान करु शकता. जाणून घेऊया टूर प्लानबद्दल सविस्तर पॅकेजचे नाव – “मानखंड एक्सप्रेस – भारत गौरव टुरिस्ट ट्रेन” पॅकेज कालावधी – 10 दिवस आणि 11 रात्री टूर पॅकेज तारीख – २२ एप्रिल प्रवास…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल येथील एका शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेतले परंतु पावसाचा लहरीपणामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे आता कर्जफेड कशी करायची याची विवंचना होती. यातूनच शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल तालुक्यातील नागदूली येथील भगवान गंभीर महाजन (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नी, दोन मुले, आई, भाऊ यांच्यासह गावात वास्तव्यास होते. शेती काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. परंतु उत्पन्न चांगले न आल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. यामुळे भगवान महाजन हे सतत विचारात राहत…
सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक घटना महाबळेश्वर तालुक्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. कोयना विभागातील वाळणे गावातील कोयना जलाशयात पोहायला गेलेल्या ३ मुली बुडाल्या होत्या. त्यातली दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एका मुलींना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व मुली १२ ते १३ वयोगटातील असून वाळणे गावावर शोककळा पसरली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली शिवसागर जलाशयात बुडाल्या होत्या. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत तर वाचवण्यात आलेल्या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू…
जळगाव : प्रतिनिधी कोयता घेऊन दहशत पसरवत असलेल्या गजानन उर्फ गणेश रवींद्र चौधरी (वय १९, रा. शनिपेठ) याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार दि. ३० मार्च रोजी पहाटे रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना रेल्वे स्थानक परिसरात एक जण कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या वेळी पथकाने तेथे जाऊन गजानन चौधरी याला अटक केले. त्याच्या जवळ आढळून आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोकॉ तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
चोपडा : प्रतिनिधी गेरूघाटी ते वैजापूर रोडवरील न वनविभागाच्या नाक्याजवळ अवैधरीत्या गावठी पिस्तूल व एक न जिवंत काडतूससह संशयिताला चोपडा क ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रेहमल जेमल पावरा (३३, जिरायत पाडा, पो. मेलाने, ता. चोपडा) असे न संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ३:३० वाजता रेहमल हा विना नंबर प्लेटच्या वे दुचाकीवरून जात होता. रेहमलला थांबवून विचारपूस केली असता त्याच्याकडे एका गावठी पिस्तूलसह न काडतूस मिळून आले. गावठी बनावटी कट्टा, काडतूस, न दुचाकी असा एकूण ७६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पोकॉ. चेतन सुरेश महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी माहेराहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी करत तसलीनबी शेख जाबाज (२१) या विवाहितेच्या तोंडात मुंग्या मारण्याचे औषध टाकून सासरच्या मंडळींनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवार, २९ मार्च रोजी घडली. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या तसलीनबी शेख यांचा विवाह जळगावातीलच जाबाज शेख सलीम याच्याशी झाला. माहेराहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी विवाहितेकडे केली जाऊ लागली. विवाहितेने पैसे आणले नाहीत म्हणून पती जाबाज शेख आणि सासू समन्नुख शेख यांनी शिवीगाळ व मारहाण करत विवाहितेच्या तोंडात मुंग्या मारण्याचे…
फैजपूर : प्रतिनिधी आमोदा येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री जुगारावर धाड घालून दोघांना ताब्यात घेतले. मेहबूब नबाब तडवी व तुषार दिनकर चौधरी (दोघ रा. आमोदा) अशी आरोपींचे नावे आहेत. दोघांकडून २६३० रोख व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा-बामणोद येथे गेल्या काही दिवसापासून सट्टा जुगार जोरात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने शुक्रवारी रात्री आमोदा बसस्थानकाच्या जवळ टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाड घातली. यात सट्टा घेताना मेहबूब तडवी याला ताब्यात घेतले यावेळी तुषार चौधरी जुगार खेळविताना आढळून आला. स्थानिक गुन्हा शाखेचे महेश महाजन यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा…
रावेर : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभियंता असलेले संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी संजय ब्राह्मणे जाहीर करण्यात आली आहे. रविवारी पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातील घोषणा केली. ब्राह्मणे हे बी. ई. सिव्हिल झाले आहेत. ते नंदुरबार येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. मूळचे धुळे येथील रहिवासी असलेले ब्राह्मणे हे सध्या भुसावळात वास्तव्यास आहेत. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सन २०१४ मध्ये शिवसेनेकडून विधानसभा निवडणक लढविली होती

