मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या आणखी 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर जळगावमधून करण पवार, हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील व पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कामडी या सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्तीला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी बुधवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना उद्धव ठाकरे यांनी कल्याण, जळगाव, हातकणंगले व पालघर या 4 लोकसभा मतदार संघांतील आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीने जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे भाजपने तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. उन्मेश पाटील नाराज होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. आज खासदार उन्मेश पाटील यांनी खासदार पदाचा राजीनामा देत शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंध बांधून पक्ष प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी देऊन विद्यमान खासदार पाटील यांचा पत्ता कट केला होता. त्यामुळे ते भाजपच्या नेतृत्वावर नाराज होत आज ते शिवसेनेच्या शिवबंध मनगटावर…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सोनवद येथे राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेवर हृदयविकाराचा झटका आला होता परंतु न्यूरोलॉजिस्ट स्पेशलिस्ट डॉ. गोपाल घोलप आणि गाजरे हॉस्पिटलचे डॉ. सुनील गाजरे व मॅनेजमेंट यांनी तपासणी अंती मेंदूत ब्लॉकेज असल्याचे सांगून त्यांच्यावर शास्त्रक्रिया करून त्यांची तब्येत अजून खालावली गेली, तसेच त्यांच्याकडून ऑपरेशन साठी ५ लाख ५० हजार रुपये आणि हॉस्पिटलचा चार्ज म्हणून ३ लाख ८५ हजार रुपये रुपये वसूल करून फसवणूक केल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान प वृद्ध महिलेची प्रकृती खालावणाऱ्या डॉक्टर घोलप आणि डॉक्टर गाजरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांना तक्रार केली…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था शहरातील छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा देखील समावेश आहे. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाने…
चोपडा : प्रतिनिधी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे पथक व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी न. प.च्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी लक्ष्मण बावीस्कर (४०, पंचशीलनगर, चोपडा), खुशाल बावीस्कर (४८ कोळंबा, ता. चोपडा), अजय माळी (२२ लोहीया नगर, चोपडा), वाल्मिक शिंदे (वर्डी, ता. चोपडा), अमोल जैन (३८ पंकजनगर, चोपडा), हिरालाल बाविस्कर (४३ कोळंबा, ता. चोपडा), सागर पाटील (१९, बुधगाव, ता. चोपडा), प्रवीण बावीस्कर (४०, कोळंबा, ता.चोपडा), प्रदीप महाजन (५३, अडावद, ता. चोपडा) अनिल लोहार (४७, चोपडा), सुधाकर सोनवणे (३८, गौतमनगर, चोपडा), आकाश…
यावल : प्रतिनिधी निंबादेवी (यावल) वनक्षेत्रातील एका नाल्यात २५ हजार रुपये किमतीचा खैर लाकडाचा साठा जप्त करण्यात आला आहे. वृक्षतोड करणारा आरोपी पसार झाला आहे. त्यामुळे हा साठा यावल येथील मुख्य विक्री केंद्रात पाठविण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल वनक्षेत्रातील पथक गस्त घालत असताना एका नाल्यात वृक्षतोड करून लाकडाचा साठा दडवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार निंबादेवी क्षेत्राच्या नवरक्षकांनी हा साठा ताब्यात घेतला आहे. ५१ घनमीटर एवढा हा लाकडाचा साठा असून, त्याची किंमत २५ हजार ५८४ इतकी आहे. अज्ञात आरोपीविरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वन संरक्षक…
भुसावळ : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकावर विक्रत्यांच्या दोन गटातील वाद सोडविताना आरपीएफ निरीक्षक राधाकिशन मीना (४२) व त्यांचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांना काही विक्रेत्यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी आल्यावर कोणी कोठे मालाची विक्री करावी, यावरून विक्रेत्यांमध्ये हा वाद पेटला होता. वाद वाढत असल्याने आरपीएफचे एएसआय दीपक तायडे यांनी राधाकिशन मीना यांना ही माहिती दिली. मीना हे घटनस्थळी आल्यावर त्यांनी जवळपास शंभरावर लोकांचा वाद सोडवून त्यांना शांत केले. परंतु जमावामधील सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमीद, वसीम खान बिस्मिल्ला खान व इतरांनी…
जळगाव : प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमधील इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी तुषीता आकाश सराफ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ३६व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मुले आणि मुली २०२३-२४ या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. तिला पुरस्कार स्वरुपात कांस्य पदक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थिनी तुषीता हिचे अभिनंदन केले. ही विद्यार्थिनी याच शाळेतील क्रीडा शिक्षक आकाश सराफ यांची कन्या आहे. यानिमित्त विद्यार्थिनीसह तिचे वडील व क्रीडा शिक्षक सराफ यांचा सत्कार प्राचार्य श्रीधर सुनकरी यांनी केला.
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. वडील किंवा ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात. एक पद्धतशीर दैनंदिन दिनचर्या आखून तुमचा मानसिक आणि शारीरिकरित्या तणाव मुक् होईल. आज तुमची आर्थिक स्थिती सामान्य असेल. तुमच्यावर ताण येऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा मित्र किंवा ओळखीचा माणूस तुम्हाला त्याच्या कामात बराच काळ व्यस्त ठेवू शकतो. वृषभ आज तुमचा दिवस मित्र आणि कुटुंबियांसोबत जाईल. तुम्हाला काही मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मिळू शकते. दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवल्यास तुमचे व्यक्तिमत्व आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. उत्पन्नाचे स्रोतही मजबूत होतील. आज खूप काम असेल ज्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होईल,…
मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात भाजपकडून उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर झाल्या असून उमेदवारांनी गाठी भेटी देखील सुरु केली असतांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेले नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईत आहेत. भाजपचे युवा नेते पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करन पवार त्यांच्या सोबत आहेत. पवार यांना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचे निश्चित…

