जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या तीन दुचाकींसह दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील रिधुर या गावातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम आखली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना गुप्त माहिती नुसार दुचाकी चोरीतील गुन्हेगार हे जळगाव तालुक्यातील रिधुर गावात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथक रवाना केले होते. पथकाने जळगांव तालुक्यातील रिधुर गावातील दोन संशयीत आकाश गोरखनाथ सोनवणे वय २३…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील दुध फेडरेशन रोड वरील नवीन कानळदा रोड परिसरातील इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर या परिसरात अनोळखी टवाळखोरांनी तब्बल ७ ते ८ चारचाकी गाड्याच्या काचा फोडत नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन कानळदा रोड परिसरात दि.२ व ३ रोजी रात्री ७ ते ९ वाजेच्या सुमारास राधाकृष्ण नगर व इंद्रप्रस्थ नगरातील तब्बल ७ ते ८ चारचाकी गाड्यांचे काचा फोडत नुकसान केल्याची घटना घडल्याने परिसरातील चारचाकी मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेतली होती. MH.19.CZ.5638 , MH.19.AE.1834, MH.02.BR.4136,…
लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी ३ मार्च पहाटेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन बालाजी कोतवाल (वय २७) शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) कृष्णा विठ्ठल मंडले (वय २४) आणि नर्मन राजाराम कात्रे (वय ३३) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत तरुण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण…
भुसावळ : प्रातिनिधी शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महेश नगर भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती. पोलिसांनी पाळत ठेवून गोपनीयपणे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर रविवार, दि.३ मार्च रोजी धाड टाकत सहा तरुणींची सुटका केली तर दाम्पत्याला अटक केली आहे. विशाल शांताराम बहाटे व पल्लवी विशाल बहाटे (महेश नगर, भुसावळ) अशी अटकेतील दाम्पत्याची नावे असून त्यांच्याविरोधात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. भुसावळ शहरासह तालुक्यातील अनेक बडे शौकीन ग्राहक दाम्पत्याच्या संपर्कात होते शिवाय त्यांचे फोनवर संभाषण व चॅटींग झाल्याचे समजते. पोलीस आता कुणा-कुणावर कारवाई करतात ? याकडे लक्ष…
जळगाव : प्रतिनिधी बहिणीकडे जेवणासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख ६० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी दि.२ बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम पेठेतील मुजाईद खान अय्युब खान हे २ रोजी रात्रीच्या सुमारास उस्मानिया पार्कमध्ये बहिणीकडे जेवणासाठी गेले होते. रात्री पावसाचे वातावरण असल्याने ते तेथेच मुक्कामी थांबले होते. दुसऱ्या दिवशी भाऊ अबुबकार खान हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडाच दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी एक लाख…
फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील पाडळसे येथील कोसगाव रस्त्यावर तलवार घेऊन आरडाओरड करीत दहशत माजविणाऱ्या पाडळसा येथील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (२८) यास फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी प्रवीण तायडे हा कोसगाव रस्त्यावर तलवार घेऊन दहशत माजवत होता. सपोनि नीलेश वाघ, फौजदार विनोद गाभणे, मोहन लोखंडे, विकास सोनवणे, मोती पवार, बाळू भोई, राहुल महाजन, अरुण नमाईते यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी आणि तिची आई त्यांच्या झोपडीत असताना तीन जण आत शिरले आणि त्यांनी या मुलीच्या आईस मारहाण केली. याचवेळी या मुलीचे दोन भाऊही आले. त्यावेळी मुलगी आणि तिच्या दोन भावांनाही मारहाण करीत मुलीचा विनयभंग केला, याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तिसरा अल्पवयीन आहे, पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन…
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार, ४ मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्याहस्ते जळगावनजीक असलेल्या खेडी येथे वारकरी भवनाचे तर मुंढोळदे (खडकाचे) येथे तापीवरील पुलाचे भूमिपूजन होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील मंगळवारी जळगाव येथील युवा संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन होऊन ते हेलिकॉप्टरने वाशिमकडे जाणार आहे. तेथून दुपारी ३:५५ वाजता हेलिकॉप्टरने त्यांचे मुंढोळदे (खडकाचे) ता मुक्ताईनगर येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी मुंढाळदे (खडकाचे) ते सुलवाडी-ऐनपूर या मुक्ताईनगर व रावेर तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे भूमिपूजन होणार आहे. ४:४५ वाजता मुक्ताईनगर येथे…
मेष आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नियोजन करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. जर तुम्हाला आज कोणाला प्रपोज करायचे असेल तर आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही मोकळ्या मनाने बोलाल. इतरांच्या समस्याही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम ठरले. सामाजिक कार्यात तुमचं मन रमेल. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील आजचा दिवस अनुकूल आहे. शिक्षकांकडूनही तुम्हाला अभ्यासात पूर्ण मदत…
जळगाव : प्रतिनिधी रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा , आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे.असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त 77 आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयामध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण…

