Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात काम करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. नुकतेच शासकीय काम करून देण्यासाठी तडजोडीअंती तीन हजारांची लाच स्वीकारताना विहितगांव, जि.नाशिक तलाठी सतीश गिरीश नवले (48, फ्लॅट नंबर – 303, अक्षराधारा ई, सँडी बेकरी जवळ, आनंद नगर, उपनगर, नाशिक) व विहितगार तलाठी मदतनीस दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे (43, राधिका निवास, उज्वल कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड, नाशिक, पुणे रोड चेहडी बु.॥) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय तक्रारदार यांच्या पतीचे नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत असल्याने तहसीलदार नाशिक यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था १० बँकांवर नियमांचे पालन न केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई केली आहे. या १० बँकांना ६० लाख रूपयांपर्यंतचा दंड ठोठवला आहे. त्यांनी बँकीग नियमाचे पालन आणि ग्राहकांची सुरक्षितता याचे उल्लघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा दंड लावण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील बँकाचा या समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  या बँकांमध्ये महाराष्ट्रातून सोलापूरतील सोलापूर जनता सहकारी बँक, नाशिकतील जनलक्ष्मी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगरतील स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईतील उत्कृष्ट सहकारी बँक, पश्चिम बंगालातून हावडातील हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तामिळनाडूतून राजापालयमतील राजापालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, दिंडीगूलतील दिंडीगुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी लोहमार्ग पोलिसांनी अट्टल मोबाइल चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाइल जप्त केले आहेत. गजानन वसंता सुशीर (३०, धरणगाव, ता. मलकापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी प्रदीप बनसोडे (भांडूप पूर्व मुंबई) या ८ फेब्रुवारी २०२४ रोजी डाऊन शालिमार एक्सप्रेसने ठाणे ते अकोला असा प्रवास कोच एच-५ मधून करीत असताना भुसावळ सुटल्यानंतर त्यांच्या झोपेचा फायदा घेत पर्स चोरीला गेली. हे लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पर्समध्ये २५ हजारांचा मोबाइल व रोख रक्कम तसेच कागदपत्रे मिळून ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज होता. याबाबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे प्रेमसंबंधातून एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार व नंतर तिचा खून करण्यात आल्याची घटना वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत एकास अटक करण्यात आली आहे. संजय धोंडा गायकवाड (३१, रा. वरखेडे खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान गावालगतच्या खडक्या नाल्यात शौचासाठी गेली होती. ती लवकर घरी परत न आल्याने मुलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी गिरणा नदीपात्रात वाळूमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिस पाटील संतोष तिरमली…

Read More

भडगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी शेतातील पिकांना पाणी भरत असताना त्यांच्यावर रानडुक्कराने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी चाळीसगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कजगावसह परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ३ रोजी तांदुळवाडी येथील शेतकरी रवींद्र सुपडु पाटील (वय ५०) हे सकाळी बाजरी, मका पिकांना पाणी भरण्यासाठी भोरटेक शिवारातील आपल्या शेतात गेले होते. पिकांना पाणी भरत असताना अचानक रानडुक्कराने पाटील यांच्यावर झडप घेत मांडीला चावा घेतला. मांडीला गंभीर इजा झाल्याने त्यांना तत्काळ चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुक्कराने शेतकऱ्यांवर हल्ले चढवण्यास सुरुवात केल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी काहीही कारण नसतांना स्वामी राजेंद्र पोतदार (वय ३१) यांना दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई या दोघ भावंडानी बेदम मारहाण केली. यामध्ये दीपक याने चॉपरने तर युवराज याने काचेच्या बाटलीने स्वामीच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १ एप्रिल रोजी शिवशंकर कॉलनीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहतील इंद्रप्रस्थ नगरातील शिवशंकर कॉलनीत स्वामी राजेंद्र पोतदार हा तरुण वास्तव्यास असून तो सोनारी काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे दीपक भोई व युवराज भोई यांनी काहीही एक कारण नसतांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मैत्रीणीला भेटाण्यासाठी जायचे सांगून तरुणीला एका हॉटेलवर घेवून जात तिच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्याला विरोध केला असता, तिचा हातपाय बांधून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तरुणीची सुटका केल्याची घटना मंगळवार दि. १ एप्रिल रोजी एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात संशयित जयेश सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील तरुणी शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रीकीचे शिक्षण घेत असून ती शहरातील एका परिसरात हॉस्टेलवर वास्तव्यास आहे. दि. १ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तरुणी हॉस्टेलवर असतांना तीला जयेश सोनार याने फोन केला. यावेळी त्याने आपण माझ्या मैत्रीणीला भेटण्यासाठी बस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आमदार एकनाथ खडसे भाजपात जाणार अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. या चर्चाना आ. एकनाथ खडसे यांनी बुधवारी पुर्ण विराम दिला असून आपण आपल्या सुप्रिम कोर्टाच्या तारखेसाठी दिल्लीला गेलो होतो. तेथे कोणाचीही भेट घेतली नाही, त्यामुळे मी भाजपात जाण्याच्या चर्चेत कोणतेच तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आ. खडसे म्हणाले की, आपण भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु असा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही, असा निर्णय घ्यावयाचा असला तर, कार्यकर्त्यांना व सहकार्यांना विश्वासात घेवूनच असा निर्णय होत असतो. असा महत्वाचा विषय असल्यास ज्या पक्षाने आजपर्यंत मदत केली त्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील औद्योगिक वसाहत मधील डी सेक्टर मधून ६ लाख ८५ हजार रुपये किमतीचे नवीन ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. २ डिसेंबर २०२३ रोजी घडली होती. या प्रकरणात चौकशी अंती अखेर मंगळवारी दि. २ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील औद्योगिक वसाहतीच्या डी-सेक्टरमध्ये मोहन तोताराम चौधरी (वय-५८ रा. जळगाव) यांच्या मालकीचे नवीन ट्रॅक्टर लावले होते. दि. २ डिसेंबर २०२३ रोजी ६ लाख ८५ हजार रुपये किमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. ट्रॅक्टर चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहन चौधरी यांनी सर्वत्र चौकशी केली, दरम्यान…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आज तुम्ही अशा व्यक्तीला भेटाल ज्याच्या शब्दांचा तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडेल. हे शक्य आहे की तुमच्या भूतकाळाशी संबंधित कोणीतरी उद्या तुमच्याशी संपर्क साधेल आणि हा दिवस संस्मरणीय बनवेल. ऑफिसमध्ये तुमचे चांगले काम पाहून तुमचे सहकारी तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकतील. तुम्ही लोकांसाठी प्रेरणास्रोत व्हाल, यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. गरीब व्यक्तीला मदत केल्याने मनःशांती मिळेल. काम करण्याच्या नवीन पद्धतींवर मित्रांसोबत चर्चा कराल, तुम्हाला नवीन कल्पना मिळतील. पैशाच्या बाबतीत लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे. एखाद्याला पैसे उधार देण्यापूर्वी विचार करा. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज, व्यवसायात चांगला नफा असल्याने, तुम्ही तुमच्या घरातूनच तुमची नवीन…

Read More