• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तणावातून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

editor desk by editor desk
March 10, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
तणावातून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

जळगाव : प्रतिनिधी

तरुणाने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी पहाटे तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील अशोक नगर परिसरातील रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दोन दिवसांपासून तो कुठ्ल्यातरी तणावात असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री घरातील स्वयंपाक घरात दरवाजा बंद करून झोक्याच्या दोरीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शितल झोपेतून उठली तेव्हा पती दिसून आले नाही. त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाक घराचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यांनी शेजारच्या नागरिकांना बोलावून दरवाजा तोडला. तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, मोठा भाऊ असा परिवार आहे.

Previous Post

भरधाव दुचाकीच्या धडकेत एक जखमी

Next Post

ठाकरे गटाला मोठा धक्का : दिग्गज नेता शिंदे गटात घेणार प्रवेश

Next Post
ठाकरे गटाला मोठा धक्का : दिग्गज नेता शिंदे गटात घेणार प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का : दिग्गज नेता शिंदे गटात घेणार प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group