Author: editor desk

एरंडोल : प्रतिनिधी ‘मदर्स डे’च्या दिवशीच मुलगा आणि सुनेने मिळून आईचा दगडाने ठेचून खून केला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना एरंडोल येथील केवडीपुरा भागात रविवारी पहाटे घडली. प्लॉट विक्रीच्या वादातून हा प्रकार घडला. मुलगा आणि सुनेस अटक करण्यात आली आहे. विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) (६०) असे या मृत महिलेचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विमलबाई यांच्या घराशेजारी त्यांच्या नावे असलेला प्लॉट मुलगा बापू मोहिते (४०) व सून शिवराबाई मोहिते (३५) यांना विकायचा होता. परंतु यास विमलबाईंचा विरोध होता. त्यामुळे मुलगा आणि सून त्यांना त्रास द्यायचे त्यामुळे विमलबाई ह्या मुसळी (ता. धरणगाव) येथे गेल्या होत्या. समाजातील काही लोकांनी मुलगा व…

Read More

मेष आजचा दिवस खूप खास असेल. कुटुंबात विशेष नातेवाईकाच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्र-परिवारात व्यस्त राहाल. एखादे मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. आज काही नवीन कामे अचानक समोर येऊ शकतात. विचारपूर्वक केलेल्या कृतीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. वाहन व्यवसायात चांगल्या विक्रीतून फायदा होईल, आर्थिक स्थिती मजबूत राहील. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी भगवंताचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करू. आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. घर बांधणीचे काम वेगाने होईल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. आज रस्त्याने चालताना अनोळखी व्यक्तीशी विनाकारण वाद टाळा. यामुळे तुमचा वेळ वाचेल. तुमच्या पद आणि क्षमतेनुसार काम केले…

Read More

जळगाव : विजय पाटील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रावेर मतदार संघात मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात यावर सर्वांचे लक्ष आहे. एकीकडे राजकारणात नवखे असलेले उद्योजक श्रीराम पाटील तर दुसरीकडे मागील दहा वर्षांपासून खासदार असलेल्या एका मोठ्या राजकीय परिवाराच्या सून रक्षा खडसे आहेत. केळी, कापूस ही महत्त्वाची पिके घेणारा रावेर मतदार संघ रेल्वे, ऑर्डीनंस फॅक्टरी यांच्या साठी सुध्दा प्रसिद्ध आहे. मागील दहा वर्षांच्या कालखंडात मतदार संघातून सुरू झालेली हॉर्टीकल्चर ट्रेन बंद झाली, रावेर रेल्वे स्थानकात अनेक गाड्यांचा थांबा बंद झाला, राजधानी होती एक्स्प्रेसला जळगांवला थांबा मिळाला परंतु देशातले मोठे जंक्शन असलेले भुसावळ येथे थांबा नाही, पर्यटन विकासाचा कोट्यवधीचा हरताळा क्लस्टर कागदावर आला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज चॅनलचा लोगो व नाव वापरून एक फेक पोस्ट तयार करण्यात आली. त्यात स्मिताताईंना फोटो व नाव देखील वापरुन खोडसाळपणा करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब निदर्शसनास येताच स्मिताताईंनी तीव्र नाराजी केली. मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला. स्मिताताई म्हणाल्या की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जीवनात पाळणारे आहोत. शिवछत्रपतींच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता. मात्र आता काही विरोधक महिलांच्या नावाने असे प्रकार करुन महिलांचा अपमान करत…

Read More

बीड : वृत्तसंस्था शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे असो की आणखी कोणी पुढे येत असतील, तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. मनोज जरांगे-पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या जिल्ह्यात येऊन जरांगे-पाटलांना भेटलो. त्यांना एक विनंती केली की, या राज्यात कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत येथे प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, फौजिया खान,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेला तिच्या मुलांना मारण्याची धमकी देत भुसावळ शहरातील सुरभी लॉज येथे एकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी, १ मे रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ १२ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान या महिलेला तिच्या मुलांना रेल्वे पटरीवर फेकून जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी विनोद इंगळे (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) याने महिलेवर भुसावळ शहरातील सुरभी लॉज आणि खडका चौफुली येथे वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. तपास उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे व मोहाडीचे सरपंच धनंजय सोनवणे या दोन्ही भावांच्या घरांवर दगडफेक करून घर व वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगल तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश पुंडलिक हटकर (वय ३३) व आकाश बबन हटकर (वय २६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मोहाडीचे सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता गावातील काशिनाथ गवळी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन दीपक हटकर,…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. वडिलधाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमचे करिअर पुढे नेण्यास मदत करेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सरकारी कामे आज पूर्ण होतील. वृषभ आज तुमचा दिवस लाभदायक असेल. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुमच्या बोलण्याने सगळे प्रभावित होतील. राजकारणाशी संबंधित लोकांना आज काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आज तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. शिक्षकांकडून नवीन काही शिकायला मिळेल. मिथुन आजचा दिवस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रिय जळगाव जिल्हावासियांनो, खान्देश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमि राहिलेली आहे. सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवाराचा सदस्य म्हणून मानतो. मी नेहमी जळगावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. विकासाशिवाय पर्याय नाही. मग तो भारतदेशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा किवा जळगावचा असो. विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा (रेल्वे, रस्ते, विमान सेवा, पिण्याचे पाणी, घरकुल इ.), याच कडीत भारत देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योगाची साखळी निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टीमुळे सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे. मी १९७८-१९८० ला राजकारणात आल्यावर विकासाच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाचा तडाखा जोरदार असतांना नुकतेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आता आणखी दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या 24 तासांत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. शनिवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर,…

Read More