Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्देवी : दिव्यांग तरुणाने धावत्या रेल्वेसमोर संपविले आयुष्य
    क्राईम

    दुर्देवी : दिव्यांग तरुणाने धावत्या रेल्वेसमोर संपविले आयुष्य

    editor deskBy editor deskApril 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कामानिमित्त बाहेर जातो सांगत घरातून बाहेर पडलेल्या भगवान मणिलाल चौधरी (वय २६, रा. वडनगरी, ता. जळगाव) या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार दि. ७ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहरातील समृद्धी अपार्टमेंटसमोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे भगवान चौधरी हा तरुण कुटुंबियांसह वासतव्यास होता. दोन्ही पायांनी दिव्यांग असतांना देखील तो टेन्ट हाऊस चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तो कामानिमित्ता जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रविवारी ७ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता शहरातील समृध्दी अपार्टमेंटसमोरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वे समोर स्वतःला झोकून देत त्याने आपली जीवनयात्रा संपवली. तरुणाच्या आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. सोबत असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई निर्जला, वडील माणिलाल गंभीर चौधरी आणि लहान भाऊ पवन असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.