जळगाव : प्रतिनिधी शहराजवळ असलेल्या मोहाडी येथे अक्षयतृतीयेनिमित्त पत्ते खेळताना दोन जणांमध्ये वाद झाले होते. या दोघांमध्ये मोहाडी रोडवरील जगवानी पेट्रोल पंपाजवळ दोन्ही गटांमध्ये समझोता सुरु होता. परंतु, तेथे त्यांच्यामध्ये पुन्हा वाद उफाळून आल्याने काहिंनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे शेजारीच राहणाऱ्या माजी जि.प. सदस्यांच्या घरावरही दगडफेक झाली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी गावात अक्षयतृतीयनिमित्त पत्यांचा डाव सुरू होता. यामध्ये पत्ते खेळत असताना एकासोबत वाद झाल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो व्यक्ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता, परंतु त्यांनी तक्रार…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आपसामध्ये सुरू असलेल्या गंमतबाजीवरून वाद उद्भवला आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकेश विजयसिंग राजपूत (१९, रा. आशाबाबा नगर) या विद्यार्थ्याची कॉलर पकडून त्याच्यावर चाकूने वार केला. ही घटना बुधवार, ८ मे रोजी मू.जे. महाविद्यालयाजवळील एका बेकरीजवळ घडली. याप्रकरणी ९ मे रोजी रामानंद नगर पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा लोकेश राजपूत हा विद्यार्थी बुधवार, ८ मे रोजी सकाळी उभा होता. त्याच्या बाजूला काही तरुणांमध्ये गंमतबाजी सुरू होती. त्यावरून त्या तरुणांमध्ये लोटालाटी झाली. त्यावेळी काहीही कारण नसताना तरुणांनी लोकेशची कॉलर पकडली. कॉलर का पकडली म्हणून त्याने विचारणा केली असता कल्पेश पाटीलसह…
बोदवड : प्रतिनिधी एका २४ वर्षीय तरुणीचा रेल्वेचा धक्का लागल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात १० मे रोजी घडली. स्वाती भिमराव तायडे असे मृत तरुणीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील तासखेडा येथील रहिवासी असलेली स्वाती ही तिच्या आई व भावासोबत वरणगाव येथे वास्तव्यास होती. ती एका खासगी रुग्णालयात कामास होती. शुक्रवारी १० मे रोजी ती सिद्धेश्वर नगर येथे राहणाऱ्या मोठ्या बहिणीकडे जात असताना, स्टेशन परिसरात थोड्या अंतरावर अज्ञात रेल्वे गाडीचा जोरदार धक्का लागल्याने ती जागीच ठार झाली. याबाबत स्टेशन मास्तरांच्या खबरीवरून रेल्वे पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ : प्रतिनिधी उसनवारीने दिलेल्या पैशांपैकी बाकी राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाइपने वार करून जखमी केल्याची घटना ४ मे रोजी रात्री १२.३० वाजता शहरातील जलालशहा बाबा दर्गाजवळ घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात ९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, इमरान शेख गुलाम रसूल (वय ३५, रा. जलालशहा बाबा दर्गा, भुसावळ) याने सोमेश सोनवणे याला उसनवारीने ४० हजार रुपये दिले होते. ४ मे रोजी मध्यरात्री इमरान शेख याने ४० हजार पैकी ५ हजार रूपये मागितल्याचा राग आल्याने सोमेश सोनवणे, किशन पंचरवाला, संतोष सोनवणे, कुणाल सोनवणे, प्रताप सुरवाडे, नीलेश पारधे, जितू कैलास…
नाशिक : वृत्तसंस्था विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार डॉक्टर्स सेल डॉ नितीन वसंतराव पाटील यांनी डॉ संदिप शिंदे यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. नाशिक जिल्हाध्यक्ष मा कोंडाजी मामा आव्हाड, डॉक्टर्स सेल चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ विष्णूपंत अत्रे, डॉ सेल चे उपाध्यक्ष डॉ आनंदा आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ संदिप शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी डॉ नितीन पाटील यांनी डॉक्टर्स सेल नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सक्रिय रित्या कार्यरत असून संपूर्ण ताकदीने मा. राजाभाऊ वाजे आणि मा. भगरे सर यांच्या प्रचार कार्यात सहभागी होऊन दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
जळगाव : प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या स्वप्नील दीपक पाटील (१५, रा. बाळद, ता. भडगाव) या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवार, १० मे रोजी दुपारी कुसुंबा येथे उघडकीस आली. अक्षय्य तृतीया सण साजरा होत असताना आजी त्याला जेवणासाठी बोलवायला गेली त्या वेळी ही घटना समोर आली. सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील बाळद येथील स्वप्नील पाटील हा इयत्ता नववी वर्गातून उत्तीर्ण होऊन दहावीत गेला. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने तो जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामा किशोर भानुदास पाटील यांच्याकडे लहान भावासह आला होता. शुक्रवार, १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना तो घरात आला…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून आणि बॉसकडून एखादी गोष्ट सांगितली जात असेल तर ती गांभीर्याने घ्या आणि तुमच्या उणीवा जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. आज आपण व्यवसायाच्या प्रगतीसाठी आर्थिक नियोजन करू. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन खर्च आणि खरेदी करताना समतोल राखावा लागेल आणि बचतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी एकाग्रता राखावी लागेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, व्यावसायिक योजनांबाबत थोडे सावध राहा. आज तुमचे मन अध्यात्मावर अधिक केंद्रित असू शकते. आज…
अक्षय तृतीयेला संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली जाते त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगलेश्वर बागेवाडी या गावात थोर शिवभक्त मादिराज व मादलंबिका यांच्या पोटी झाला आणि तो सामाजिक क्रांतीचा दिवस ठरला कर्नाटक ,महाराष्ट्र आणि तेलंगणा,आंध्र प्रदेश या भागात मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली जाते 26 एप्रिल 2001 पासून महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती महाराष्ट्रात साजरी होते 2002 मध्ये कर्नाटक मध्ये तर 2003 मध्ये तेलंगणा आणि 2016 पासून आंध्र प्रदेशात शासकीय जयंती साजरी होते महात्मा बसवेश्वरांचे चरित्र इयत्ता पाचवी सातवी व नववी यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले तर महाविद्यालय स्तरावर संशोधन स्वरूपात त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला जातो.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फॉरेस्ट कॉलनी येथील प्राईम रिडींग लायब्ररी येथून विद्यार्थ्यांची लॅपटॉप, बँग आणि रोकड असा एकुण ३३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवार दि. ७ मे रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भोईटे नगरातील अमर प्लाझा येथे चेतन दिलीप बागुले (वय २३) हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. चेतन हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तो रोज फॉरेस्ट कॉलनीतील प्राईम रिडींग लायब्ररीत रिडींगसाठी येत असतो. नेहमीप्रमाणे मंगळवार दि. ७ मे रोजी सायंकाळी तो लायब्ररीत आलेला होता. त्यावेळी…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कासवा या गावात वेल्डिंग वर्कशॉपच्या दुकानावर बसलेल्या २८ वर्षीय तरुणाला माझ्याकडे काय बघतो. असे म्हणत चौघांनी त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर लोखंडी रॉड तरुणाच्या डोक्यात टाकून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील कासवा येथे रुपेश हरचंद सपकाळे (वय २८) हा तरुण वेल्डिग वर्कशॉप दुकानवर बसला होता. याठिकाणी पवन संतोष सपकाळे याने येऊन माझ्याकडे काय बघतो असे सांगत वाद घातला. त्यानंतर पवन सपकाळे याच्याससह प्रशांत कैलास रायसिंगे, जितेंद्र जनार्धन सपकाळे व आनंद पुना सपकाळे सर्व रा. कासवा…

