अमळनेर : प्रतिनिधी मजा घेऊ नको सांगितल्याचा राग आल्याने एकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना दि. १२ रोजी विद्याविहार कॉलनीत घडली. अंकित चंद्रकांत देशमुख हा १२ रोजी रात्री विद्याविहार कॉलनीच्या कमानीजवळ मित्रांबरोबर गप्पा मारत होता. त्यावेळी रवींद्र ऊर्फ विश्वनाथ पीतांबर पाटील आला. आणि त्याने अंकितच्या आईच्या नावाने गंमत सुरू केली. आईच्या नावाने गंमत करू नको, असे सांगितल्याचा रवींद्रला राग आला. त्याने अंकित याला लोखंडी रॉडने मारहाण केली. अंकित हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेतल्यावरून रवींद्र पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेकॉ प्रमोद पाटील करीत आहेत.
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डांभुर्णी येथे शेतात रोटावेटर करीत असताना चालकाचा तोल जाऊन पडल्याने रोटावेटरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, डांभुर्णी येथील विजय जानकीराम कोळी (३५) हे मंगळवारी रोटावेटर करीत होते. तोल जाऊन मागे पडल्याने ते रोटावेटरमध्ये अडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत केतन रेवा फालक यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय कोळी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार…
भुसावळ : प्रतिनिधी रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ५९ दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही कारवाई आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागातून उन्हाळी विशेष अशा १०६ प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या काळात तर तिकिटांचा अधिकच काळाबाजार होतो. त्यामुळे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध रेल्वे विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ५९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ विभागाच्या डीआरएम इती पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, प्रवाशांनी एजंटांना जादाचे पैसे मोजून तिकिटे खरेदी करू नयेत, असे आवाहन रेल्वे…
मेष : धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. वृषभ : परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची…
नांदगाव : वृत्तसंस्था नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. बस आणि मारुती कारचा अपघात झाला असून यात मारुती कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांचे बालक गंभीर झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि मारुती कारची जोरदार धडक झाली. अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले.मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बस चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ओव्हरटेक करण्याचा नादात कारला समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी सकाळी साडे नऊ वाजता गंगा पूजा केली आणि क्रूझने नमो घाटावर पोहोचले असता काशीतील कोतवाल नावाच्या कालभैरव मंदिरात दर्शन घेतले आणि आरती केली. त्यानंतर पंतप्रधानांनी वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथही उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी,…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत. चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे, असं यावेळी जरांगे यांनी सांगितले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. दहा टक्के आरक्षण दिलं ते कुणाच्याही नाही. यामुळे मुलांचा वाटोळे झालं आहे. 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत काल दुपारी 3 वाजेपर्यंत ऊन आणि मोकळं आभाळ असलेलं वातावरण होतं. पण अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसापेक्षा वारे प्रचंड वेगाने वाहू लागले. या वाऱ्याचा वेळ तासी 40 ते 50 किमी असा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान मुंबईतील दोन ठिकाणी तर मोठमोठ्या होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्या. आधी वडाळा येथील श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय. अतिशय चित्तथरारक अशी ही घटना आहे. या घटनेत कुणी जखमी झालं आहे का, कितपत नुकसान झालंय, याबाबतची सविस्तर मााहिती अद्याप समजू शकलेलं नाही. पण या…
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून शहर वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. नवरा-बायकोच्या भांडणाचा राग शहरावर काढण्याचा प्रकार घडला आहे. पत्नीच्या प्रेमात पडलेल्या या व्यक्तीने बायको नांदण्यासाठी येत नसल्यामुळे पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मिळालेल्या या धमकीमुळे पुणे पोलिसांना जोरदार धक्का बसला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पुणे शहरात मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. यापूर्वी कोयता गँगने पुणे शहरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता गोळीबारच्या घटना मागील महिन्यात चार वेळा घडल्या. गुन्हेगारीप्रमाणे कौटुंबिक वाद आणि कलहसुद्धा समोर येत…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने समोर आलेला खड्डा चुकविताना आपल्याला कट मारल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी जुनेद अख्तर गंभीर खान (२४, रा. आझादनगर) या तरुणाला पाठलाग करून बेदम मारहाण केली. त्याला रोडवर खाली पाडून दगडाने व चाकूने वार केल्याने तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. ही घटना शनिवार, ११ मे रोजी रात्री फातेमा नगर ते सुप्रीम कॉलनीदरम्यान घडली. याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, ११ मे रोजी रात्री मनियार सलमान खान अब्दुल गफ्फार (२५, रा. उस्मानिया पार्क), इकरामोद्दीन अमिनोद्दीन शेख व…

