Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कंटेनरला कारने दिली जबर धडक
    क्राईम

    कंटेनरला कारने दिली जबर धडक

    editor deskBy editor deskApril 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील समृद्धी महामार्ग अपघातांमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना पुन्हा एकदा या महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. कंटेनरला कारने जोरदार धडक दिल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात घडला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिली. समृद्धी महामार्गावर हडस पिपंळगाव जवळील टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. परंतु, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. घटनास्थळी मदत कार्यासाठी नागरिक धावून आले होते. समृद्धी महामार्ग नेहमी अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. मागील महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी ८ मार्च रोजी भीषण अपघात झाला होता.चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली होती. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.

    विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबत नाहीये. आज पुन्हा एक अपघात झाला आहे. २४ फेब्रुवारी रोजी देखील भीषण अपघात झाला होता. समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर ट्रकने पेट घेतला होता. त्यामुळे चालक व वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.