Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) येथे आज दि. १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी महायुतीची जिल्ह्यात पहिलीच सभा होत आहे. या सभेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहतील.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण तलाव शिवारात एका इमारतीच्या ठिकाणी सेंट्रिंग काम करत असताना, अचानक ९ व्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९:३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, बंडू वना सोनवणे (वय ५२, रा. आसोदा रोड, गुरुदत्त कॉलनी), असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून सेंट्रिंगचे काम करत होते. मेहरूण तलाव शिवारात एका इमारतीचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता इमारतीच्या नवव्या मजल्यावर बंडू सोनवणे हे सेंट्रिंगचे काम करत होते. हे काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला. ते थेट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर पित्याने दुसऱ्या दिवशी घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता शहरातील गणेशनगर भागात घडली. अमित नंदलाल कटारिया (वय ३२, रा. आदर्शनगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमित दोन महिन्यांपूर्वीच आदर्शनगरात पत्नी, तीन वर्षांचा मुलगा सन्मित यांच्यासह राहायला आला होता. महात्मा फुले मार्केट येथे ‘चुनरी कलेक्शन’ नावाने त्याचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी ३ वर्षीय मुलाचा वाढदिवस साजरा केला. गुरुवारी फुले मार्केटमधील दुकानातून अमित गणेशनगरमधील आपल्या आईच्या घरी गेला. वरच्या मजल्यावर आराम करण्यासाठी जात असल्याचे अमितने आईला सांगितले. बराच वेळ झाल्यानंतर आई अमितला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर…

Read More

रावेर : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेनिमित्त येथे आईसोबत आलेल्या फेकरी येथील तरुणाचे अपघाती निधन झाले. ही घटना पातोंडी गावाच्या पुढे मुक्ताईनगर रस्त्यावर एका ढाब्यासमोर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षक म्हणून सेवारत असलेल्या रामचंद्र मधुकर सोनवणे (रा. रावेर) यांचेकडे त्यांचा भाचा यश दिलीप तायडे (वय २१, रा. फेकरी, ता भुसावळ) हा त्याची आई अलका दिलीप तायडे यांच्यासह मोटारसायकलने अक्षय्य तृतीयेनिमित्त आला होता. मामांकडे दुपारी सहभोजन घेतल्यानंतर तो सावदा येथील मावशीला भेटून येतो असे सांगत मोटारसायकलने निघाला. मात्र तो नांदूपिंप्री येथील मावशीकडे जायला निघाला. तो पातोंडी गावाच्या पुढे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी बुधवारी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. भविष्यात राष्ट्र, राज्य, जिल्हा व जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केले आहे. सुरेशदादा जैन हे १९७४ पासून राजकारणात होते. ते १९८० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि सलग ३४ वर्षे आणि नऊ वेळा आमदार होते. ते १९८५ मध्ये जळगावचे नगराध्यक्ष, तर…

Read More

मेष आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्ही रिलॅक्स व्हाल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे, लवकरच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन स्थान प्राप्त करणार आहात. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष फायदेशीर राहील. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत नातेवाईकांच्या घरी जाऊ शकता. आज नोकरीच्या ठिकाणी मोठी ऑफर मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याची योजना आखाल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कॉलेजमध्ये नवीन प्रोजेक्ट्सवर काम करणारे विद्यार्थी लवकरच आपली तयारी पूर्ण करतील. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज कोणतेही काम करताना वडिलांचा आशीर्वाद जरूर घ्या. हे तुम्हाला तुमच्या कामात मदत…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्याची निवडणूक रंगात आलेली आहे. बजरंग सोनावणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवस इथे थांबणार आहेत. कालच्याच पत्रकार परिषदेत शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की, आपण एका बाजूला म्हणत आहेत की, भाजपला हरवलं पाहिजेत, सत्तेपासून खाली खेचलं पाहिजेत. उद्या आपण तेच वाक्य वापरणार याची मला खात्री आहे. पण राजनाथ सिंह यांना आपण फोन का केला होता याचे उत्तर तुम्ही अजून दिलेले नाही असा सवाल आंबेडकर यांनी विचारला. राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला असून आता राजकीय वातावरण देखील तापले असून विविध पक्षांच्या प्रचारसभानांही वेग आला असून याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पदयात्रे दरम्यान, स्मिताताईंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी “अबकी बार मोदी सरकार “ या घोषणांनी शहरातील प्रत्येक भाग दणाणून सोडला. स्मिताताईंनी पदयात्रेत सामील नागरिकांशी संवाद साधत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले . यावेळी माजी खासदार ए.टी. नाना पाटील, अमोलदादा चिमणराव पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, मच्छिन्द्र बापू पाटील, रमेशभाऊ परदेशी, वासुदेव पाटील, उज्वलाताई पाटील, रवीभाऊ जाधव, राजाभाऊ पाटील, परेश पाटील, सुनील पाटील, अतुल पवार, सचिन पानपाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात सर्वत्र सामूहिक रित्या अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. या वर्षी १० मे रोजी अक्षय तृतीया असून या दिवशी शुभ मुहूर्त समजले जाते त्या दृष्टीने या दिवशी बालविवाह होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क राहून असे होणारे बालविवाह थांबविण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले . बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ संपूर्ण राज्यात लागू केला आहे. त्याचप्रमाणे त्या बाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२२ देखील लागू आहे. या नियमानुसार ग्रामसेवक यांना ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक आधिकारी तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी येथील बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुक्ताईनगर येथून दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत. सविस्तर वृत्त असे कि, येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भरत शालिग्राम बोंडे यांची दुचाकी ४ मे रोजी घरासमोरून चोरीस गेली होती. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, पोलीस नायक सोपान पाटील, राहुल वानखेडे, सचिन चौधरी, जावेद…

Read More