रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिनावल येथे ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडणीचे काम करीत असताना ट्रॅक्टर मागे आले. यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे नाव यशवंत हेमचंद्र धांडे (५७) असे आहे. चिनावल येथे कुटुंबासह राहत होते. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी नांगरणी, रोटा करण्याचे काम सुरू जाते. रात्री शेतात रोटा करण्यासाठी जायचे असल्याने रविवारी सायंकाळी ते खळ्यात ट्रॅक्टरला जोडणी करीत होते. दरम्यान, ट्रॅक्टर सुरू असल्याने ते मागे आले. ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने यशवंत धांडे गंभीर जखमी झाले. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना फैजपूर येथे खासगी रुग्णालयात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५७.७०, तर रावेरसाठी ६३.५७ टक्के मतदान झाले. अंतिम टक्केवारीत यात आणखी काही वाढ होऊ शकते. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. एरंडोलमध्ये मतदानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध तर दारूच्या नशेत आढळणाऱ्या मलकापूर मतदार केंद्र प्रमुखाविरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील रामदेववाही येथे दुचाकीवरील चारजणांना भरधाव कारने उडविल्याच्या घटनेनंतर आरोपींवर गंभीर कारवाई न झाल्याने त्याचे पडसाद जामनेर, चाळीसगाव व जळगाव तालुक्यात उमटले आहेत. रामदेववाडीतील बंजारा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकल्याची बातमी कळताच या दोन्ही मतदारसंघांतील बहुतांशी समाजबांधवांनी मतदानाकडे पाठ दाखविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान अंतिम टप्प्यात आले आहे. मेहरूण भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी मदत केली. मेहरूण भागातील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, स्वामी समर्थ चौक भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर जाऊन वृद्ध व दिव्यांग मतदारांना ने आण करण्यासाठी मदत केली. यामध्ये फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत, ऋषी राजपूत, आकाश तोमर, मयुर डांगे, संकेत म्हस्कर, चेतन राजपूत, राहुल राजपूत, नकुल निकम आदींनी मदत केली.
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. आज तुम्हाला काही मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. आज विद्यार्थी काही महत्त्वाचे प्रॅक्टिकल पूर्ण करण्यात व्यस्त राहतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही निरोगी रहाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे तुमच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. कोणतेही प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत भविष्याचा विचार कराल. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील ९ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान होत आहे. पश्चिम बंगालमधील बोलपूर येथे मतदानाच्या एक दिवस आधी रात्री उशिरा एका TMC कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. टीएमसीने सीपीआय(एम) समर्थकांवर बॉम्बस्फोटांचा आरोप केला आहे. दुर्गापूरमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. बीरभूममध्ये भाजपने टीएमसी समर्थकांवर स्टॉलची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, बिहारच्या मुंगेरमध्ये मतदानापूर्वी एका पोलिंग एजंटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंगेरमध्येच मतदानादरम्यान स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी आज दि.१३ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेसाठी मतदान सुरु असून या दोन्ही मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. यात रावेर लोकसभा मतदार संघ आघाडीवर आहे. 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ -42 .15 % विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे 13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –39.23 % 14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –45.02 % 15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –41.16 % 16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –46.04 % 17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –39.07 % 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ -43.80 % ▪ 04 रावेर लोकसभा मतदारसंघ -45.26 % विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे 10…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिक सकाळीच मतदान करण्यासाठी मतदार केंद्र गाठत आहे.दुपारी १ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात ३१.७०% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात ३२.०२% मतदान झाले आहे. यामधील जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव विधानसभा मतदारसंघ – 32.22 %, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 34.93 %, अमळनेर विधानसभा मतदारसंघ – 31.62 %, एरंडोल विधानसभा मतदारसंघ – 35.05 %, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – 26.97 %, पाचोरा विधानसभा…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दीपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) ही आठ महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार झाली. तर तिचे पती व तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले, तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरपले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जुना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहेत. ते पत्नी दीपाली व तीन वर्षांची मुलगी काव्या हिला घेऊन निमगव्हाण येथे नातेवाइकांकडे भेटण्यासाठी गेले…
जळगाव : प्रतिनिधी लग्नाचा पहिला वाढदिवस आणि तसे मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवून सकाळी आनंदात असलेल्या कुणाल प्रकाश सूर्यवंशी (२९, रा. दातर्ती, ता. साक्री, जि. धुळे ह. मु. स्वामी समर्थ कॉलनी, द्वारका नगर परिसर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, १२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कुणाल सूर्यवंशी हा तरुण स्वामी समर्थ कॉलनी येथे आई, वडील, पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीसह राहत होता. तो सिव्हिल इंजिनिअर असून एका सिमेंटच्या कंपनीत तो मार्केटिंग करायचा. १२ मे रोजी त्याच्या लग्नाला एक…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील पुरुषोत्तम नगरातील चैतन्य अपार्टमेंट येथील महिलेच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ मे रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता श्रीकांत मंत्री (वय ५५) या ३ मे रोजी सकाळी १० वाजता कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी महिलेचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुपारी…

