Author: editor desk

जामनेर : प्रतिनिधी येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करत पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या १५ संशयितांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी ३०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रुटमार्चही काढला. छर्रे असलेल्या बंदुकीतून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यातील संशयित सुभाष उमाजी भिल ३५) याला गुरुवारी भुसावळात अटक करण्यात आली. या आरोपीला ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी जमाव आधीच जामनेर येथील पोलिस ठाण्याबाहेर थांबून होता. मात्र, आरोपी जळगावला असल्याचे कळताच जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिस ठाण्यावर…

Read More

मेष खर्च अधिक वाढणार असल्याने आज तुम्ही त्रस्त व्हाल. तुमच्या बजेटवर लक्ष द्या. पैशाचा वापर जपून करा. उधळपट्टी करू नका. घाईगडबडीत कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू नका. कुटुंब आणि मित्रांसोबत व्हॅकेशन्सचा प्लान करू शकता. काही लोकांना वारसा हक्काने चालत आलेल्या संपत्तीचा लाभ मिळेल. करिअरमध्ये मनाला वाटेल अशा गोष्टी घडतील. नव्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. पण तुमच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. रोज योग आणि मेडिटेशन करा. डायट हेल्दी ठेवा. वृषभ आज अत्यंत सावध राहावं लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लाइफमध्ये नव्या संधी मिळतील. अनेक आव्हाने पार पाडताना तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील आर्थिक वाद निवळेल. नवी मालमत्ता खरेदी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे महायुतीत बिघाडी झाली असून भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांची पक्षाकडून प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते आ.एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गत काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसे यांचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः त्यांच्या खांद्यावर भाजप एखादी मोठी जबाबदारी देईल अशी चर्चाही या प्रकरणी राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे तर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलिस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे ते म्हणाले. फडणवीस…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा झालेले नाही ते जमा करावे  असा आरोप करत शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी उद्या दि.२१ जून रोजी माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे. यात यावर्षी दुष्काळी घोषित असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही ते तत्काळ देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र अशी मागणी करणारे माजी खासदार – आमदार यांनीच लाखोचे अनुदान आपल्या खात्यात पाडून घेतल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. माजी खासदार उन्मेष पाटील हे आधी आमदार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागाने उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन ” म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने 21 जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. जळगांव जिल्हा प्रशासन च्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगांव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगांव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगांव,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बीड लोकसभा निवडणुकित मोठ्या चर्चेची ठरली आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभवाचा मोठा धक्का देणारा ठरलं असून आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचे कळते. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो. राज्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलगी घरात असतांना यशवंत अनिल अहिरे (वय २०, रा. आमलेश्वर नगर, अमळनेर, – ह. मु. मेस्कोमाता नगर) हा तरुण अल्पवयीन मुलीच्या घरात शिरला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला तु मेरी जिंदगी है असे म्हणत तिच्याकडे वाईट नजरेने बघून – तिचा विनयभंग केला. ही घटना दि. १९ जून रोजी – रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १७ जून रोजी ही मुलगी घरात एकटी असतांना मेस्को माता नगरातील यशवंत अनिल अहिरे हा तरुण त्या…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चहार्डी ते वेले रस्त्यावर गुरुवारी चोपडा-भाई ही बस दुपारी १२ वाजेच्या दरम्यान डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटली. या अपघातात दोन प्रवाशांसह चालक, वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-भाई ही बस (एमएच१४ / बीटी २०८३) भाई येथून चहार्डी मार्गे चोपडा येथे परत येत असताना चहार्डी ते वेले गावादरम्यान कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुरूमाने भरलेला डंपर पुढे जात असताना बसचालकाने डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात साईडपट्ट्यांवर मुरूम असल्याने मुरूम खचून बसची एक बाजू पूर्ण खोल भागात गेली व बस विरुद्ध दिशेला खड्यात गेली. डंपर चालकाने साईड न दिल्याने बस उलटली असल्याची…

Read More