जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळ ३०० रुपये न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संजय अकोलकर (वय २०, रा. मारुती मंदिरजवळ, शिवाजीनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी सकाळी १०:३० वाजता अक्षय अकोलकर हा रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळील नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर (रा. शिवाजीनगर) हा तिथे आला. त्याने अक्षयकडे ३०० रुपये मागितले.…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल (वय ३५) या आरोपीला गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीही जमाव शांत होत नव्हता, जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या.…
मेष राशी आजचा दिवस तुमच्या कुटुंबासाठी नवीन आनंद घेऊन येणार आहे. आज तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास कराल. तुमच्या मुलाचे यश तुम्हाला आनंदित करेल, लोक तुमचे अभिनंदन करण्यासाठी तुमच्या घरी येतील. आज तुम्ही घरामध्ये एक छोटी पार्टी आयोजित करू शकता, ज्यामुळे घरातील लोकांना चांगले मनोरंजन मिळेल. आज तुमचे नशीब चमकेल कारण व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांची शिस्त त्यांना लवकरच यश मिळवून देईल, अभ्यास आणि काम यात संतुलन राहील. आज तुमचा लोकांबद्दलचा चांगला दृष्टीकोन तुम्हाला त्यांचा आवडता बनवेल. वृषभ राशी आज तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप मेहनत कराल. तुमच्या…
अहमदनगर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघाची राज्यभर चर्चा सुरु असतांना नुकतेच नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार आहे असे विधान त्यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांचे आशीर्वादही घेणार असल्याचे म्हंटले आहे. याबाबत बोलतांना नीलेश लंके म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीमध्ये मी ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीला उभा होतो. त्यांच्यावर आता टीका टिपण्णी करणे योग्य नाही. कारण आता लोकसभेचा निकाल लागला आहे. झाले गेले सोडून द्यायचे हे मी नुकतेच म्हंटले होते. विखे कुटुंबिय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरिची येथे बुधवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. कन्नूकुट्टी (49) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे. त्यात मिथेनॉल मिसळले जाते. या घटनेबाबत सीएम एमके स्टॅलिन यांनी x वर लिहिले: कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्याने लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दुःख झाले. या प्रकरणी गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 18 जून…
जळगाव : प्रतिनिधी पैशांच्या कारणावरु न वाद होवून दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना दि. १७ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. यामध्ये दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरातील अक्षय रुपेश साळुंखे (वय २२) हा तरुण मजूरी करतो. दि. १७ जून रोजी त्याच परिसरातील नितीन आनंदा भोई, जितू आनंदा भोई, आनंदा भोई या तिघांनी अक्षय साळुंखे याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन गंभीर दुखापत केली. याप्रकरणी जखमी अक्षय याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तर…
चाळीसगाव : प्रतिनिधी प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीवर ब्लेडने वार करून तसेच डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे. ही थरारक घटना तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे पतीचा अपघाती मृत्यूच्या बनाव तिने केला आणि नंतर खुनाचा हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, बाळू सिताराम पवार (३५, रा. गवळीवाडा, न्यायडोगंरी ता. नादंगाव, जि. नाशिक) असे या मृत इसमाचे नाव आहे. तो पत्नी वंदना पवार (३०) हिच्यासह न्यायडोंगरी येथे राहत होता. वंदना हिस बाळू हा दारु पिवून शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यामुळे ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती. तसेच तिचे व…
जळगाव : प्रतिनिधी टेलिग्राम व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देऊन त्या बदल्यात नफ्याचे आमिष दाखवत विशाल रामराव सूर्यवंशी (२७, रा. चाळीसगाव) यांची १२ लाख ७९ हजार ३७५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १० मे ते १८ जून दरम्यान घडली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी नोकरी करणारे विशाल सूर्यवंशी यांना १० मे रोजी टेलिग्राम तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज करून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. यात विशाल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन रक्कम स्वीकारली. यात त्यांना एक लाख ५३ हजार ३२ रुपये परतावा दिला. त्यात विश्वास संपादन करून रक्कम स्वीकारतच राहिले. अशा प्रकारे एकूण १४…
वरणगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या एका गावातील २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीवर अॅट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला बकऱ्या चारण्यास गेली असता, संशयित आरोपी अजय कैलास पाटील (वय ४०, रा. पिंपळगाव खुर्द) याने १९ रोजी बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या महिलेला अश्लील बोलला. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह करीत आहेत. दरम्यान, आरोपीस लोकांनी जबर मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. त्यास जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव : प्रतिनिधी भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात जळगाव येथील तरुण ठार झाला. जळगाव येथून धुळ्याकडे येत असताना फागणे गावाजवळ बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील अन्य दोन तरुण गंभीर जखमी आहेत. मयत तरुणाचे जुनेर शेख (वय २५, रा. जळगाव) असे नाव आहे. जळगावमधील तांबापुरा भागात राहणारे जुनेर शेख, अरबाज खाटीक, सलमान खाटीक हे २० ते २५ वयोगटातील तरुण दुचाकीने जळगावहून धुळ्याकडे ट्रिपल सीट येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळे दुभाजकावर जाऊन धडकली. यात जुनेर शेख याचा मृत्यू झाला. तर अरबाज आणि सलमान हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती…

