Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगावच्या सराफा बाजाराची नोंद सुवर्ण नगरी म्हणून होत असते. याच सुवर्ण नगरीत सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी प्रत्येकी 1 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे प्रती तोळा भाव शुक्रवारी 72 हजार 100 रुपये तर चांदीचे प्रती किलोचे भाव 91 हजारांवरून 90 हजार रुपयांवर खाली आले. सोने-चांदीचे दर दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचतील असा अंदाज असताना शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात प्रत्येकी एक हजार रुपयांनी घसरण झाली. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सटोडियांची नफेखोरी कारणीभूत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करून परिणाम घडवणारे नफेखोरांमुळे सोने चांदीच्या दराच्या चढउतार होत असल्याचं सराफ व्यावसायिक यांच म्हणणं आहे. सोने-चांदीचे दर दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचतील असा अंदाज…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील ख्रिश्चन कब्रस्थान परिसरात काहीही कारण नसतांना एका तरूणाला फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत करून गळ्यातील सोन्याची चैन व दीड हजार रूपयांची रोकड जबरी काढून नेल्याची घटना शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी २२ जून रोजी रात्री साडेबारा वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट सुरेश बनसोडे (वय ३४) रा. स्नेह नगर, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता सम्राट बनसोडे हा तरूण भुसावळ शहरातील ख्रिश्चन कब्रस्थानजवळ उभा होता. त्यावेळी विवेक शेकळे व आतिश खरात दोन्ही रा. भुसावळ…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी भरधाव दुचाकीने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष अनिल कांबळे (४, धरणगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती अनिल कांबळे ही सासू कमळबाई कांबळे व व मुलगी हर्ष हिच्यासह धरणगावातील दादाजी नगर परिसरात वास्तव्यास होते. मजुरी काम करून कांबळे हे परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी दुपारी २ वाजता वाजता अमळनेर रस्त्यावर पांढरी विहीर परिसराजवळ अनिल कांबळे यांची पत्नी ज्योती या हर्पूसोबत पायी चालत जात होत्या. त्याचवेळी नितीन रमेश पाटील (सानेनगर, अमळनेर) हा दुचाकी (एमएच१९/सीसी ७८१०) वरून भरधाव वेगाने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव वडील बाहेर गेलेले असताना निशा मनोज परदेशी (१६, रा. तळेले कॉलनी) या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, २३ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम कंपनीत सुरक्षा रक्षक असलेले मनोज परदेशी हे पत्नी, दोन मुलींसह तळेले कॉलनीत राहतात, रविवारी सकाळी रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांसाठी ते चहा घेऊन गेले होते. त्या वेळी आई व लहान बहीण घरी असताना निशा परदेशी हिने घरात गळफास घेतला. मुलीने गळफास घेतल्याचे आईला दिसताच आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

Read More

पारोळा : प्रतिनिधी धरणगावकडे जाणाऱ्या बायपास रोडजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शनिवारी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. श्यामकांत एकनाथ पाटील (२६) आणि भिकन तुकाराम पाटील (२६, दोघे रा. पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावकडे जाणाऱ्या बायपास रोड चौफुलीवर शनिवारी रात्री दोन जण संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांनी अंगझाडती घेतली असता त्यांच्याजवळ १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील तीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल, १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असे एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोकॉ.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय असलेले रुख्मिणी फांउडेशन मिडटाऊन संस्था यांच्या तर्फे रविवार दि. 23 जुन रोजी दु 4 वा हा कार्यक्रम बालसुधार गृह, डॉमीनोज समोर येथे संपन्न झाला. प्रमुख अतिथी अँड.जि एम पाटील, उदयोजक श्री आशुतोष सेठी हयांचे शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी अत्यावश्यक मुला व मुलींना लागणारे अत्यावश्यक नवीन कपडे वाटप करण्यात आले या प्रसंगी अँड जि एम पाटील यांनी मुला मुलींना भविष्यात चांगले शिकुन मोठे व्हावे चांगली व्यत्ति व्हावे व असे सांगीतले व उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजीत केल्याचे सांगीतले श्री आशुतोष सेठी यांनी अजुन काहीही मदत लागल्यास देण्याची तैयारी दाखविली तसेच मुला मुलींना उज्वल भविष्या…

Read More

मेष राशी तुम्हाला एखादी अप्रिय बातमी ऐकावी लागू शकते. काही महत्त्वाच्या कामात विनाकारण व्यत्यय येऊ शकतो. कार्यक्षेत्रात जास्त कामामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आदर्श आणि निष्काळजीपणा टाळा. तुमच्या मनातील सकारात्मकता वाढवा. शारीरिक अपंगत्व दूर करा. तुमचे काम मनापासून करा. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. तुम्हाला राजकीय मोहिमेची कमान मिळू शकते. व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. एखादी मौल्यवान वस्तू हरवू शकते किंवा चोरीला जाऊ शकते. वृषभ राशी जे काम यशस्वी होण्याची किंचितही कल्पना नसेल ते काम क्षणार्धात पूर्ण होईल. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. नोकरदार वर्गाला सरकारी योजनांचा लाभ मिळेल. नोकरीचा शोध…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी जुन्या वादातून येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा गोळीबार करून निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्यात यापूर्वी 5 जणांना अटक केली आहे तर सहावा आरोपीला वरणगाव येथून अटक करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता जुन्या वादातून भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचे कारमधून जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणीच्या तपासामध्ये आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एका आरोपीकडून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शनिवार २२ जून रोजी दुपारी बाजारपेठ पोलीस…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या ज्वारी लागल्याचे दिसून येत आहे . विशिष्ट चाळीसगाव हे सत्ता केंद्र बनल्याने व आमदार मंगेश चव्हाण हेच या निवडणुकीतील हिरो ठरल्याने, महाविकास आघाडीच्या नेत्यांची पायाखालची वाळू सरकली आहे व विधानसभेचे त्यांना पराभव दिसू लागल्याने एका स्थानिक पुढाऱ्याने आमदारांना थेट गोळी घालण्याची भाषा केली आहे. या प्रकारामुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी गुंडागिरीची भाषा करणाऱ्या नेत्याला अटक करण्याची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे कळते. महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, मात्र हे धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात सध्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक चर्चेत येत असतांना जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात थेट व्हिडिओच शेअर केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोग कुठे आहे? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर यासंदर्भात महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्सला सभा झाली. या सभेनंतर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले”, असं सुषमा…

Read More