Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव विमानतळावरील ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी दुपारी दीड वाजता धावपट्टीवर उड्डाण घेत असताना विमानाचा पुढील बाजूचा लैंडिंग गियर निखळल्याने विमान धावपट्टीवर घसरून अपघात झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव विमानतळावर ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्सिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. बुधवार (दि. १९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्हीटी एलएवाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लैंडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळले. वीस ते तीस फूट अंतरापर्यंत…

Read More

मेष : जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. वृषभ : आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. तुमच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दौऱ्यावर असतांना ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घेतले, त्यांच्या या कृती “विरोधात जळगावात भाजपने ‘निषेध आंदोलन’ केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ केतकीताई पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखाताई वर्मा, डॉ.राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालानी, सरोजाताई पाठक, विजय वानखेडे, सागर पाटील, कैलास सोमानी, अजित राणे, रेखाताई कुलकर्णी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, आघाडी मोर्चाचे भारतीताई सोनवणे, महेश पाटील, नूर मोहम्मद, मिलिंद चौधरी, अरुण श्रीखंडे, पवन खंबायत, नीलाताई चौधरी, पंकज जैन, नगरसेविका दीपमालाताई काळे , मंडळ अध्यक्ष संजय…

Read More

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. लोकसभा निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आमदारांची जमावजमव सुरू केली आहे. त्यामुळे आमदारांच्या मतांच्या फाटाफुटीचा धोका सर्व पक्षांना असल्याने विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मंगळवारी निवडणूक जाहीर केली या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया २५ जूनला सुरू होणार आहे, तर २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ जुलै रोजी अर्जाची छानणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच विनोद चौहान यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांनाही तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ED) बुधवारी न्यायालयाला केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. कारण दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्याच्या तपासासाठी हे महत्त्वाचे आहे. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की विनोद चौहान यांनी गोव्यातील निवडणुकीसाठी अभिषेक बोईनपल्ली यांच्यामार्फत बीआरएस नेत्या के. कविता यांच्या स्वीय सहाय्यकाकडून (PA) २५ कोटी रुपये घेतले. तसेच या महिन्याच्या अखेरीस विनोद चौहान यांच्या…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु होते. आता त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहे. या दरम्यान जालना जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या आंदोलनाची धग देखील वाढत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला चढवला आहे. लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सराकर पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आापण…

Read More

यावल : प्रतिनिधी उच्च‍ शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअरने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील महाजन गल्लीत घडली आहे. आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय प्रमोद करांडे (वय २७, रा. महाजन गल्ली, यावल) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय प्रमोद करांडे या तरूणाने १७ जुन रोजी रात्री ८ ते ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या महाजन गल्लीतील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले असता अक्षय यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यास रात्री तात्काळ उपचारासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पराभतू झालेले भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची राज्यातील महायुती सरकारनं पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र काँग्रेसने निकम यांच्या नियुक्तीस तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारने तातडीनं या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ॲड. उज्वल निकम निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निकम यांना पराभूत केलंय. यांनतर आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते न्याय…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव असून त्यांचे वय 25 वर्षे आहे. ते आंबेडकर नगर येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज आला. सहकारी सुरक्षा कर्मचारी धावत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की जवानाला गोळी लागली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले. जवानाच्या मृत्यूने मंदिर परिसरात खळबळ उडाली. आयजी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची चौकशी केली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कर्जाला कंटाळून किसन मोरसिंग राठोड (४६, रा. खेडगाव, ता. एरंडोल) या शेतकऱ्याने राहत्या घरात विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. ही घटना १५ जून रोजी घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्री २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, किसन राठोड यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्ज वाढतच असल्याने कर्जाला कंटाळून त्यांनी १५ जून रोजी दुपारी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. नातेवाइकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवार, १७ जून रोजी मध्यरात्री…

Read More