Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस हवालदाराने घेतली ५० हजारांची लाच
    क्राईम

    पोलीस हवालदाराने घेतली ५० हजारांची लाच

    editor deskBy editor deskJuly 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वाळू वाहतुकीचा व्यवसाय करताना कारवाई न करण्यासाठी २ लाख ६० हजारांची मागणी करत तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच घेताना भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला जळगाव येथील लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. किरण रवींद्र पाटील वय-४१ रा. भडगाव असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भडगाव शहरातील रहिवाशी आहे. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. यापूर्वी तक्रारदारावर भडगाव पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत दोन गुन्हे दाखल आहे. दरम्यान तक्रार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे २ लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. शुक्रवारी २६ जुलै रोजी दुपारी २ वाजता सापळा रचला. त्यावेळी असून पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील याने तक्रारदाराकडे २ लाख ६० हजारांची मागणी केली. व यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोउपनि दिनेशसिंग पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.