Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पंपावर पेट्रोल भरले, पैसे मागितले अन केली वृद्धाला मारहाण
    क्राईम

    पंपावर पेट्रोल भरले, पैसे मागितले अन केली वृद्धाला मारहाण

    editor deskBy editor deskJuly 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शिव कॉलनीतील काद्री पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोल भरणाऱ्या वृद्धाला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना बुधवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलिसात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिव कॉलनी परिसरात काद्री पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर अय्यब शहा बबन शहा (वय-६७) रा. सलार नगर, जळगाव हे पेट्रोल भरण्याचे काम करतात. २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता अय्यब शहा हे पेट्रोल पंपावर असताना मिलिंद सोनावणे नामक व्यक्ती हा कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला. दरम्यान कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर अय्यब शहा यांनी पैसे मागितले. याचा राग आल्याने मिलिंद सोनवणे याने शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली. दरम्यान रात्री ९ वाजता याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार शिवीगाळ करणाऱ्या मिलिंद सोनवणे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास सहाय्यक फौजदार फौजदार संजय सपकाळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.