Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आकाशवाणी चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
    क्राईम

    आकाशवाणी चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    editor deskBy editor deskJuly 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १:३० वाजता घडली, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख रऊफ शेख अब्दुल्ला (वय ६९, रा. अक्सानगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शेख रऊफ हे जळगाव शहरात मक्तेदारीचा व्यवसाय करीत होते. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास महाबळकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कामानिमित्त जात होते. आकाशवाणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने, पुलावरून अजिंठा चौकाकडे जाणाऱ्या ट्रकसाठी महाबळकडून येणाऱ्या वाहनांना थांबविण्यात आले होते. पुन्हा ही वाहतूक सुरळीत केली जात असतानाच शेख रऊफ हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघायला लागत असतानाच, पुलाकडून आलेल्या ट्रक (आरजे ११ जीबी ७६४२) ने त्यांच्या दुचाकीला (एम.एच.१९, बीडी २७५२) धडक दिली. त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नंतर जीएमसीत उपचारांसाठी दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.