जळगाव : प्रतिनिधी देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भुसावळ येथे त्यांच्या पुतळ्यास मंत्री गिरीश महाजन, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ,माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तर्फे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. एक राष्ट्र,एक निशान,एक विधान यासाठी मरे पर्यंत आग्रही असलेले, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी भारतीय जनता पार्टीतर्फे दरवर्षी २३ जून रोजी बलिदान दिवस म्हणून मनविण्यात येतो. भुसावळ शहरातील मध्यवर्ती डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सदरील कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी,…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आमदार पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण तरुणीने उत्तम शिक्षण घेतल्यावर देखील नोकरी मिळत नाही, त्याच तरूणासाठी हि बातमी फार महत्वाची आहे. सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 400 हून अधिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे 10 पास असणाऱ्या उमेदवाराला देखील नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आली आहे. 400 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ही पदे स्वच्छता कर्मचारी किंवा उप कर्मचाऱ्यांची आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते नोंदणी लिंक उघडल्यानंतर अर्ज करू शकतात. हे करण्यासाठी त्यांना सेंट्रल…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील बीपीसी बैंक कॉलनीत महिलेला एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून एका अॅपच्या माध्यमातून एकूण २ लाख २९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना ९ जून रोजी दुपारी दीड वाजता घडली होती. भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बीपीसी बैंक कॉलनी शुभांगी सिद्धेश पाटील (५६) या ९ जून रोजी दुपारी दीड वाजता त्यांना एका मोबाइल नंबरवरून फोन आला. त्यावर त्यांनी सांगितले की, आपण एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत आहे, तुम्हाला तुमचे परत पैसे मिळण्यासाठी एक अँप पाठवत आहे, ते डाऊनलोड करून त्यात डिटेल भरा…
मेष राशी जवळच्या मित्राची भेट होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत बढतीचे योग येतील. राजकारणात उच्च पद मिळू शकते. काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. बौद्धिक कार्यात लोकांना उच्च यश आणि सन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात अधीनस्थांशी जवळीक वाढेल. हॉटेल व्यवसाय, कला, अभिनय इत्यादींशी संबंधित लोकांना काही महत्त्वाच्या कामात यश आणि सन्मान मिळेल. लांबचा प्रवास सर्वोत्तम नाही. कौटुंबिक कलहामुळे दुष्टचक्र निर्माण होऊ शकते. तुम्हाला मंगल उत्सवाला जाण्याचे आमंत्रण मिळेल. भौतिक सुखाचे साधन मिळेल. वृषभ राशी दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. विरोधकांपासून सावध राहा. संयमाने काम करा. तुमचे महत्त्वाचे काम सार्वजनिक करू नका. समाजात एकोपा असावा. तुमची गुप्त…
वडीगोद्री : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरु केले असून सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले होते. मागील दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, हे शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन्ही गटाकडून उपोषण सुरु आहे तर नुकतेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ यांनीच मराठा धनगर यांच्यातील वाद पेटवला. त्यांना आता सुट्टी नाही. त्यांचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलेन असे म्हटले आहे. ”छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला. आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहे. दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे. आम्ही…
सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा मतदार संघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत असतो, आता पुन्हा एकदा साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात बोलतांना दंड थोपटले. कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत असे त्यांनी म्हंटले आहे. ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली. ते म्हणाले, ”आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय?…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अवजड कंटेनरचा पुढील भाग खाली उतरून हा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना शिरसोली ते वावडदा दरम्यान गुरुवार, २० जून रोजी रात्री नऊ वाजता घडली. रात्री एक वाजता क्रेन आल्यावर कंटेनरला हटविण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथून एक कंटेनर (क्र. एमएच १९ झेड ४२०७) मुंबईकडे येथे जात होता. शिरसोली ते वावडदा दरम्यान हॉटेल फौजीजवळ चालकाला रस्त्यावरचा अंदाज आला नाही. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या खाली उतरला. पुढील चाक रस्त्याच्या खाली तर मागील भाग हा महामार्गावरच अडकला होता. त्यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार, दि. २२ जून रोजी सायंकाळी जळगाव शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत खान्देशातील शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री नाशिककडे विमानाने रवाना होतील. नाशिकमधील संस्था चालकांसोबत बैठक आटोपून ते दुपारी ४ वाजता अहमदनगर येथे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून ते सायंकाळी ५:५० वाजता एमआयडीसीतील आदित्य लॉन्स येथे येतील. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्था चालकांसोबतची बैठक आटोपून ते पावणे आठ वाजता विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

