Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी गतीरोधकावरुन दुचाकी उधळून दुभाजकावर आदळल्याने महेश रामभाऊ माळी (वय २५, रा. जाकीर हुसेन कॉलनी, ह. मु. एमआयडीसी) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुनसगाजवह घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जाकीर हुसेन कॉलनीत राहणारा महेश रमेश माळी हा आई, वडीलांसह काही वर्षांपुर्वी याठिकाणी वास्तव्यास होता. परंतु काही वर्षांपुर्वीच त्याने कुटुंबियांना एमआयडीसी परिसरात स्थलातंर केले होते. एमआयडीसी पसिरातील एका दाल मिल कंपनीत…

Read More

चोपडा : प्रतिनिधी यावल रस्त्यावर हरियालीजवळ दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले. यात कुलदीप अशोक पगारे (वय २१) हा जागीच ठार झाला. सविस्तर वृत्त असे कि, दि. ७ रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास यावल-चोपडा रस्त्यावर चोपडापासून ३ कि.मी. अंतरावर हरियालीजवळ चोपडाकडून माचला येथे जाणाऱ्या दुचाकीस्वारास मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. यात कुलदीप अशोक पगारे (२१, माचला, ता. चोपडा) या युवकाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरा सुखरूप बचावला. अपघात करणारा ट्रकचालक पसार झाला आहे. या युवकास माचला येथील नितीन निकम, शिक्षक सतीश बोरसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. मयताच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खंडेरावनगर परिसरामध्ये नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेला सहा वर्षीय बालक हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासांनी राष्ट्रीय महामार्गावरील पोदार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरामध्ये शनिवारी दुपारी १ ते ५ या वेळेमध्ये दमदार पाऊस पडला. खंडेरावनगरमधील नाल्याजवळ काही मुले खेळत असताना, त्यात सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठलनगर, जळगाव) हा चेंडू घेण्यासाठी गेला असता नाल्यात वाहून गेला होता. यावेळी पोलिसांनी स्थानिक तरुण व अग्निशमन दल, मनपा प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रेल्वेतून प्रवास करताना धावत्या रेल्वेतून पडून, वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परप्रांतीय तरुणाचा रविवारी सकाळी ६ वाजता माहेजी रेल्वेस्थानकाजवळ तर एका प्रौढाचा भुसावळ रेल्वे स्टेशन जवळील आउटरजवळ मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनांबाबत रेल्वे पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सोनाराम सोरेन (वय ४०, रा विष्णूवेडा, पोस्ट खुडीसर पितोड, जि. घिरडी, झारखंड) हा तरुण मुंबईत कामानिमित्त वास्तव्याला होता. दरम्यान, रविवारी सकाळी ६ वाजता सोनाराम हा त्याचा मित्र मुसुदन टुडू याच्यासोबत मुंबईहून झारखंडकडे जात असताना माहेजी रेल्वे स्टेशनजवळ तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मयत सोनाराम हा मुंबई येथील…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूरनजीक सोनाळा फाट्याजवळ रविवारी सकाळी ९:१५ वाजता जीपच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह ११ जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. जखमी प्रवासी हे बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ही जीप जामनेरहून पहूरकडे येत होती. सोनाळा फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह अकरा प्रवासी प्रवास करीत होते. घटनेची माहिती मिळताच जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पाटील यांच्यासह नागरिकांनी मदतकार्य केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप लोढा हे रस्त्याने असताना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व सोबतचे इरफान शेख यांनी जामनेरकडे जाणाऱ्या…

Read More

मेष सरकारी पदांवर असलेल्या लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. काहींच्या बदलीचा योग आहे. वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे वाडवडिलांची संपत्ती मिळण्यातील विघ्ने दूर होतील. मित्र आणि कुटुंबायांकडून कृषी कार्यात सहकार्य मिळेल. एखाद्या योजनेबाबतची खूश खबर मिळले. नव्या उद्योगात सफल व्हाल. राजकारणात असाल तर वर्चस्व वाढेल. क्रीडा क्षेत्रात नावलौकीक वाढेल. नोकरीत वरिष्ठांची मदत होईल. कायद्याशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश आणि सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल वाढेल. वृषभ नोकरीत पदोन्नती मिळेल. तसेच नोकरीत कारची सुविधाही मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती सुधारणार. कुटुंबासोबत पिकनिकस्थळी जाल. एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे यशाचा उत्साह वाढेल. राजकारणात वर्चस्व राहील. शिक्षकी पेशातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मीडियातील लोकांना आज खूप…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कालपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीला सुरुवात झाली असून या दरम्यान जरांगे पाटलांनी सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ हे सरकारचे मुकादम आहेत. हे मुकादम मराठा- ओबीसीत भांडणे लावतात येवल्याच्या मुकादमाने सरकारच्या सांगण्यावरूनच सर्वांत भांडणे लावली असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच मराठा समाजाला त्रास देणाऱ्या मराठा नेत्यांनाही पाडा असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला शनिवारी हिंगोलीतून सुरुवात झाली. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी प्रसार…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकालाच परीक्षेच्या बंदोबस्तसाठी जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले आहे. यामध्ये या पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र नन्नवरे असे त्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील नेकनूरच्या जवळ हा अपघात झाला आहे. नेकनूर पासून जवळच असलेल्या नन्नवरे वस्तीतून पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी नन्नवरे जात होते. मात्र नेकनूर – मांजरसुंबा रस्त्यावर नेकनूर पासून जवळच कालिका मंगल कार्यालयासमोर नेकनूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे समोरच्या दिशेने येत असलेल्या या गाडीने समोरून धडक दिल्याने नन्नवरे खाली पडले. तसेच कारही पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ समोर…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी झोपेची डुलकी लागल्याने ट्रकच्या कॅबिनमधून तोल गेल्याने क्लिनर गाडीतून पडल्यानंतर त्यास अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शहराजवळील दादाश्री पेट्रोलपंपानजीक शनिवारी सकाळी घडली. सविस्तर वृत्त असे कि, धुळे जिल्ह्यातील लोणखेडी येथील समाधान फकिरा वाघ (वय ४५) या क्लिनरला डुलकी लागल्याने त्याचा तोल गेल्याने ते कॅबीनमधून खाली पडले. या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाने वाघ यास चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची ही दुर्घटना एरंडोलपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील दादाश्री पेट्रोल पंपानजीक शनिवारी सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली. चंद्रपूर येथून ट्रक (एमएच-१८, बीजी-८९९२) कोळसा भरून धुळे येथे जात होता. एरंडोलपासून थोड्या अंतरावर ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला क्लिनर समाधान वाघ याला झोपेची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील प्रेम नगरात राहणाऱ्या व्यापाऱ्याने विषारी औषध घेऊन विनोद पूनमचंद जैन (चोरडिया) (वय ४४, रा. प्रेम नगर) यांनी आत्महत्या प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दि. ४ जुलै रोजी घडली होती. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असतांना शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रेम नगर परिसरात विनोद जैन हे व्यापारी आपल्या कुटुं‌बासह वास्तव्यास होते. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये त्यांचे दुकान दुकान असून व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवार दि. ४ जुलै रोजी सकाळी उठल्यावर विनोद यांनी साडेआठ वाजेच्या…

Read More