Author: editor desk

एरंडोल : प्रतिनिधी किरकोळ वादातून युवकाच्या पोटावर व हातावर वार केल्याने तो जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. जखमी युवकाने औषधोपचार घेऊन जवळपास महिनाभरानंतर शनिवारी एरंडोल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सविस्तर वृत्त असे कि, परागसिंग किशोरसिंग परदेशी, रणवीर मंगेश जयस्वाल, राजवीर मंगेश जयस्वाल यांची एरंडोल येथील हॉटेल केसरीमध्ये पार्टी होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता त्यांच्या मित्रांनी त्यांच्यातील वाद मिटविला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये परागसिंग परदेशी हा चहा पिण्यासाठी गेला असता रणवीर जयस्वाल व राजवीर जयस्वाल हे तेथे गेले. रणवीर याने त्याच्या हातातील चाकूने परदेशीच्या पोटावर व हातावर वार केला. राजवीर याने लाकडी दांड्याच्या साहाय्याने मारहाण केली. त्यात परदेशी जखमी झाला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एका वाहनाचा दरवाजा दुसऱ्या वाहनाच्या बॉडीत अडकल्याने झालेल्या नुकसानीच्या कारणावरून दिलीप अर्जुन चौधरी (वय ३१, रा. धरणगाव) या तरुणाला फळविक्रेत्याजवळील लोखंडी वजनमाप घेऊन डोक्यात घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दाणाबाजारात घडली. याप्रकरणी श्रीकांत प्रकाश मोरेकर (वय ३४, रा. हुडको, शिवाजी नगर) व वासुदेव पितांबर माळी (वय ५४, रा. धरणगाव) या दोघांविरुध्द शुक्रवारी सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप चौधरी व त्याचा भाऊ ४ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मालवाहू टेम्पो घेऊन दाणाबाजारातून बाहेर निघत असताना श्रीकांत मोरेकर याच्या मालवाहू वाहनाचा दरवाजा चौधरीच्या वाहनात अडकला. त्यात नुकसान झाल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पत्नी व तिच्या प्रियकराने पतीला बेदम मारहाण केली. ही मारहाण व पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याने जबर धक्का बसलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान ४ रोजी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येस कारणीभूत ठरलेली पत्नी व तिचा प्रियकर दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण १५ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता दुसऱ्या गावात राहत असलेल्या प्रेयसीच्या घरी गेला. तेथे या तरुणासह मृताची पत्नी यांनी मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या अनैतिक संबंधाची गावात चर्चा होऊन बदनामी झाली. या प्रकारातून तरुणाने विष प्राशन करून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खेळत असताना चेंडू नाल्यात गेल्याने तो काढायला गेलेला सचिन राहुल पवार (वय ६, रा. हरिविठ्ठलनगर, मूळ रा. कुसुंबा, ता. रावेर) हा मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली. पोहणारे तरुण, पोलिस व अग्निशमन विभागाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळून आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी चार वाजता सचिन त्याची १० वर्षांची बहीण परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेले होते. त्याठिकाणी ते चेंडू खेळायला लागले. खेळताना चेंडू जवळच्या नाल्यात पडला. तो घेण्यासाठी सचिन नाल्यात उतरला. मात्र, त्याच वेळी पाऊस आल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि तो वाहत्या पाण्यात वाहून गेला. यावेळी लहान…

Read More

मेष राशी आज कामाच्या ठिकाणी अशी काही घटना घडू शकते ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. सत्तेत असलेल्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. महत्त्वाच्या कामात हळूहळू प्रगती होईल. तुमच्या महत्वाकांक्षा जास्त वाढू देऊ नका. त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात दक्षता वाढेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात. वृषभ राशी आज राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना काही महत्त्वाचे पद मिळू शकते. सुरक्षेत गुंतलेल्या सुरक्षा जवानांचे धैर्य आणि पराक्रमामुळे प्रतिस्पर्धी किंवा शत्रूकडून यश मिळेल. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुम्ही संघर्ष करत असाल तर नशीब तुमच्या विरोधात गुप्तपणे सक्रिय होईल. सावधगिरी बाळगा. सामाजिक कार्यात रुची वाढेल. कार्यक्षेत्रात लाभ…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर, या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपुर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार आहे. वारकरी कुटुंबाचा वारसा असणारें आमदार मंगेश चव्हाण यांनी २०१९ पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी “भक्ती जेष्ठांची… वारी पंढरीची” हा अभिनव उपक्रम सुरु केला. परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अश्या भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडविले जाते,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे उद्या रविवार दि.७ जुलै रोजी वैश्यवाणी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समारंभाला राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत. वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे यंदा राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दि.७ जुलै रोजी सकाळी १० वाजता ब्राह्मण समाज सभागृह बळीराम पेठ याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाला बळ देत करिअरच्या पुढील वाटा सुकर होण्यासाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गुणगौरव सोहळ्याची संकल्पना वैश्यवाणी युवा फाऊंडेशनचे चेतन वाणी, भुषण वाणी, राकेश वाणी यांची असून नियोजन समितीचे योगेश शेटे, पुरुषोत्तम शेटे, संजय शेटे, योगेश…

Read More

इगतपुरी : वृत्तसंस्था राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईकडे जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी काही अंतरावर पुढे निघुन गेल्याची घटना कसारा जवळ घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडहुन मुंबईच्या दिशेने जाणारी पंचवटी एक्सप्रेसने शनिवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कसारा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर अचानक कपलिंग तुटली. यामुळे इंजिन व एक बोगी मुंबईच्या दिशेने निघुन गेली तर बाकी पंचवटी एक्सप्रेसच्या बोग्या मागे राहिल्या. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने इंचिन थांबवून पुन्हा इंजिन मागे आणून बाकी बोग्यांना जोडण्यात आले. यानंतर ही एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना…

Read More

जळगांव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातून बारा वर्षीय मुलीला रात्री झोपेत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जवळच तिची आई देखील झोपलेली होती, मुलीने त्याचवेळी आईच्या साडीचा पदर ओढल्याने आईला जाग आली. याप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यां सोबत झोपलेली होती. झोपेत असलेल्या बारा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयित आरोपी विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक मराठा समाजातील बांधवाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षापासून आक्रमक पवित्रा घेत असतांना नेहमीच दिसून येत आहे मात्र आजपासून पुन्हा रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. या रॅलीत काही जण अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, ”हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे..5 टप्यात ही जनजागृती रॅली वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आरक्षणासाठी मराठा बांधवानी आतां बाहेर…

Read More