बोदवड : प्रतिनिधी शहरातील जामनेर रस्त्यावरील जुन्या तहसील कार्यालयासमोर हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करत फिरणाऱ्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, संशयिताचे नाव वसंता अशोक सोनवणे (वय ३२, रा. वाल्मीकनगर, बोदवड) आहे. शहरात शनिवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान तो तलवार घेऊन फिरत असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी त्याच्यावरर भारतीय शस्त्र अधिनियमन १९५९ च्या कलम ४/२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद श्रीनाथ करत आहेत
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी घर घेण्यासाठी १० लाख मिळावे यासाठी छळ होत असल्याने येथून जवळच असलेल्या कुहा पानाचे येथील गजानन भिका वराडे यांची मुलगी जागृती (वय २४) हिने शुक्रवार दि. ५ रोजी मुंबईत आत्महत्या केली. आत्महत्येस सासू आणि नवरा जबाबदार असल्याचा संदेश जागृतीने मोबाइलवर टाकला आहे. याबाबत मानपाडा पोलिस ठाण्यात (डोंबिवली पूर्व) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने अग्निडाग देण्यास नकार दिल्याने भुसावळ तालुक्यातील कुन्हा पानाचे येथे ७ जुलै रोजी तिचा भाऊ विशाल वराडे याने अग्निडाग दिला. सविस्तर वृत्त असे कि, जागृती हिचा विवाह जळगाव मधील पिंप्राळा भागातील सागर रामलाल बारी (वय ३२) याच्याशी दोन महिन्यापूर्वी २० एप्रिल २०२४ रोजी भुसावळ…
भुसावळ : प्रतिनिधी ‘ओय, यहां पे अपन की चलती हैं… हम यहां के दादा हैं, हमे रोज सलाम कर’ असे म्हणत चौघांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शहरातील पापानगर भागात नुकतीच घडली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील काझी प्लॉट भागातील शेख कासीम शेख सलीम या तरुणाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादाच्या कारणातून ३० जून रोजी सकाळी साडेदहा वाजता पापानगर भागात शेख दानिशने फिर्यादीचा रस्ता अडवून शिवीगाळ करून मारहाण केली. जाता-येता तुला आम्हाला सलाम करावा लागेल, हम यहां के दादा हैं, असे म्हणत शेख अकिलने हातातील लोखंडी सळई…
मुंबई : वृत्तसंस्था व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेला शासन निर्णय (जीआर) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी जारी केला. पालकांचे उत्पन्न वार्षिक आठ लाख रुपयांपेक्षा अधिक असणार नाही अशी अट त्यात असेल. या निर्णयाची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासूनच करण्यात आली आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या आणि आधीपासून प्रवेश घेतलेल्या मुलींसाठीही हा निर्णय लागू असेल. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गतच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा त्यात समावेश असेल. आतापर्यंत या समाजघटकांतील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के…
मेष राशी कामात खूप बिझी रहाल. व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. कोणतेही काम पूर्ण करताना अडथळे येतील. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद होऊ शकतात. लांबच्या प्रवासाला जाण्याची किंवा परदेशी सहलीला जाण्याची शक्यता आहे. प्रवास करताना सावध व सावधगिरी बाळगा. काही मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात. प्रवास करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कोणतेही अन्न किंवा पेय घेऊ नका. तुमची फसवणूक होऊ शकते. न्यायालयीन खटल्यांमध्ये चांगला वकील शोधा, अन्यथा तुरुंगवास होऊ शकतो. वृषभ राशी नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळेल. राजकारणात मान-सन्मान वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायात प्रगतीसह लाभ होईल. व्यवसायात वडिलांचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या लोकांना बढती…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते कुसुंबा दरम्यान रात्रीच्या वेळी कामावरून घरी जात असताना रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश घनश्याम सोनार (वय २६) हा कुसुंबा गावात आई आणि बहिणीसोबत वास्तव्यास होता. तो जळगावात खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर काम करून मिळणाऱ्या पैशातून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी रात्री उशीर सर्व काम आटोपून गणेश हा रात्री दहाच्या सुमारास जळगाववरून कुसुंबा येथे घरी जाण्यासाठी निघाला. मात्र जळगाव- संभाजीनगर महामार्गावरील विमानतळाजवळ आला. दरम्यान रात्रीच्या अंधारात महामार्गावरून दुचाकी चालवीत असताना अचानक कुत्रा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी गेले आहे त्यातील रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसाने शेकडो पर्यटकांना तातडीने काल गडावरून खाली यावे लागले. शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशारा संदर्भात येत्या 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग तसेच रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने व रायगड प्राधिकरणचे प्रमुख यांच्यामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान आज (सोमवार) सकाळी पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी गडावर गेलेल्या 300 शिवभक्त पर्यटकांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात आल्याची माहिती रोपवे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये किल्ले…
बोदवड : प्रतिनिधी गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती आणि समाजातील एकोपा वाढवा यासाठी ही परंपरा सुरू केली. पावसाळा सुरू झाला की सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात परंतु गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मुर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार सात आठ महिने अगोदर पासुन मेहनत घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड येथील संतोष मंगळकर, विनोद मायकर, समाधान मंगळकर यांच्या गणेश मुर्ती घडविण्याच्या कारखान्याला भेट दिली आणि मुर्तिकारांशी संवाद साधुन त्यांच्या कले विषयी आणि या व्यवसायातील समस्यां विषयी जाणून घेतले. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, गणेश मुर्तिकारांची रोजी-रोटी या व्यवसायावरच अवलंबून आहे. वर्षातले सहा-सात महिने…
वरणगाव : प्रतिनिधी शिरसाळा मारोती मंदिर येथे नवस फेडण्यासाठी जाणारे चारचाकी माल वाहतुक वाहन हतनूर ते फॅक्टरी मार्गावर पलटी झाल्याने नऊ जण जखमी झाल्याची घटना आज रविवार दि. ७ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील आडगाव येथील सुर्यवशी कुंटूबातील मनोज ज्ञानेश्वर सुर्यवंशी याचा एक वर्षीय बालकाचा नवस फेडण्यासाठी शिरसाळा मारोती मंदिर येथे जात होते. आडगाव येथून बोलेरो पीकअप वाहतूक वाहन क्रमाक एम एच १५ एफ व्ही २९०२ मध्ये कुटूंबासह वाहनात नवसाचे साहित्य घेऊन सकाळी ८ वाजेच्या सुमारास निघाले मात्र प्रवासा दरम्यान हतनूर फाटा ते वरणगाव फॅक्टरी मार्गावर एका चहळ उतारा ठिकाणी चालक राजेंद्र पाटील…
जळगाव : प्रतिनिधी पतीच्या विवाह बाह्य संबंधाला विरोध केल्याचा राग आल्याने पतीकडून पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नीच्या डोक्याला टाके पडले असून उजवा हात फॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना दि. ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अयोध्या नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोकलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अयोध्या नगरात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून याबाबत विवाहितेला माहीत झाले. विवाहितेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला असता, त्याचा राग आल्याने दि. ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित पतीने पत्नीला शिवीगाळ करीत…

