मुक्ताईनगर : प्रतिनिधी निमखेडी खुर्द येथील प्रसाद गजानन काळे (वय १९) हा आयटीआय झाल्यानंतर झारखंडमधील बिलासपूर येथे रेल्वेत अप्रेंटिसशिप (शिकावू) पदावर काम करीत असताना वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ९ जुलै रोजी घडली. सविस्तर वृत्त असे कि, प्रसाद गजानन काळे हा बिलासपूर (झारखंड) येथे रेल्वेत नुकताच शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला होता. मंगळवारी त्याला वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी रेल्वेचे फिल्टर बदलण्याची जबाबदारी दिली. याप्रसंगी वरिष्ठ तंत्रज्ञ व सहायक यांची उपस्थिती आवश्यक असताना वरिष्ठ तंत्रज्ञ तेथून दुसरीकडे गेला असता, प्रसाद याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. प्रसाद याला वाचवताना एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा तस्करी आणि विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या रमेश जेठानंद तेजवाणी (५८) व दीपक रमेश तेजवाणी (२४ दोघे रा. सिंधी कॉलनी) या दोघा पिता-पूत्राला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे आदेश दिले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी रमेश तेजवाणी व दीपक तेजवाणी हे अनेक वर्षापासून गुटख्याच्या व्यवसायात सक्रिय होते. रमेश तेजवाणी विरुद्ध चार तर मुलगा दीपक तेजवाणी याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, युनूस शेख, सचिन पाटल, योगेश…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात आज दि.१० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हे धक्के जाणवले आहेत. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात हे धक्के जाणवले.या धक्क्याची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल एवढी होती. यासह…
मेष राशी प्रेम संबंधात तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. समन्वय निर्माण करण्याची गरज असेल. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूलभूत भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कल्पना लादण्याचा प्रयत्न करू नका. पालकांचे वर्तन सहकार्याचे राहील. आरोग्याची काळजी घ्या इ. तुम्ही तुमच्या वागण्याने इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्हाला सामान्यतः कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य वाढेल. घरगुती समस्या सुटतील. वृषभ राशी कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा. पती-पत्नीमध्ये सामान्य समन्वय राहील. प्रेमसंबंधात वाद होतील. तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात, इतरांशी विचारपूर्वक आणि संयमाने वागा. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांची वागणूक प्रेमळ राहील. समाजात मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. अत्यंत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसेनंतर आता वसंत मोरे यांनी वंचितलाही रामराम केले आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासह पुण्यातील मनसेचे तब्बल 23 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेसाठी मोठा धक्का असणार आहे. यावेळी बोलतांना हा माझा पक्षप्रवेश नसून मी स्वगृही परतलो आहे अशी प्रतिक्रिया मोरेंनी दिली. यावेळी बोलतांना वसंत मोरे म्हणाले, ”1993 यामध्ये पहिल्यांदा शाखाप्रमुख झालो. बारावी पास झाल्यानंतर मी शाखाप्रमुख होतो. 16 व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो. माझा हा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेत…
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे आहे. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावा यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व ,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे करिता तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र ,योगोउपचार केंद्र इत्यादी…
जळगाव : प्रतिनिधी सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असून दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झाल्यावर भविष्याचा कल ओळखून आणि आपल्याला असलेली आवड लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी पुढील वाट निवडणे आवश्यक आहे. इतरांकडे बघून भरकटत न जाता विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन ध्येयाचा पाठलाग करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला. वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे रविवार दि.७ जुलै रोजी बळीराम पेठेतील ब्राह्मण समाज हॉलमध्ये आयोजित वैश्यवाणी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर माजी जि.प.प्रशासन अधिकारी संतोष शेटे, माजी सैनिक शिवदास शेटे, उद्योजक निंबा वाणी, हिरालाल वाणी,…
चाळीसगाव : प्रतिनिधी माझ्यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेची वयोमर्यादा ६० वरून ६५, उत्पन्न दाखल्याला रेशनकार्ड तसेच डोमीसाईल ला मतदानकार्ड / जन्मदाखल्याचा पर्याय देण्यात आल्यामुळे आता बहिणींना कमीत कमी कागदपत्रे लागणार आहेत. तरीदेखील बऱ्याच बहिणींची नावे रेशनकार्ड मध्ये नसल्याने या शिबिराच्या माध्यमातून ती अडचण देखील दूर केली जाईल तसेच योजना संदर्भातील ईतर अडचणी देखील सोडविल्या जातील चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देईपर्यंत शिबीर तसेच आमदार कार्यालयाच्या माध्यमातून हे नोंदणी अभियान सुरू राहील असे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते चाळीसगाव तालुक्यातील माता भगिनींच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित “मुख्यमंत्री…
जळगाव : प्रतिनिधी अश्लिल हातवारे करीत शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडीलांवर संशयिताने कटरने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना रविवार दि. ७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी रविवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, मिहिर प्रल्हाद भिडे (वय २५) हा तरुण अल्पवयी मुलीच्या घरासमोरुन ४ ते ५ वेळा फेऱ्या मारत होता. तसेच त्याने मुलीला अश्लिल हातवारे देखील केले. त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील त्या…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील जिराळी येथे दि. ८ रोजी दुपारी मजूरांना पिण्याचे पाणी देण्यासाठी गेला असता इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागून एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राकेश रामचंद्र पाटील (वय २१) हा तरुण मजूरांसाठी पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेला असतांना विजेचा धक्का त्यास लागला. रात्री पारोळा कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिराळी येथील गुलाब अवचित पाटील यांचा राकेश हा नातु होता

