जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालत तिचा हात पकडून विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बुधवार दि. ५ जून रोजी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सन २०२१ पासून गावात राहणारा निलेश हिरामण मराठे हा पिडीत मुलीला लग्नाची मागणी केली. त्यावर पिडीत मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने मुलीचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना दि. ११ एप्रिल २०२४ रोजी घडली. त्यानंतर पिडीत तरूणीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलीने जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निलेश हिरामण मराठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनंत अहिरे हे करीत आहे.



