जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाळ नारायण सपकाळे (वय-३०) रा. किनोद ता.जि. जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, गोपाल सपकाळे हा आई पत्नी दोन मुलांसह विनोद गावात वास्तव्याला होता. शेती व मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवारी २ जुलै रोजी त्याने दुपारी शेतात असताना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, फुलपाट येथील तरुण दत्तू प्रकाश पाटील (वय ३५) हे आपली दुचाकी (एमएच – १९, बीटी – १०१५) ने दुपारी ५ वाजेचा सुमारास काम आटोपून घरी चालले होते. याच वेळी महामार्गावरून भरधाव वेगाने डंपर (एमएच १९, झेड-३७५१) हा जळगावकडे जात असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून डोक्याला गंभीर इजा व मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार…
भडगाव : प्रतिनिधी कजगाव चाळीसगाव मार्गावरील वळण रस्त्यावर दि. ४ च्या रात्री १० वाजता चारचाकी कारचा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यानेच हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते चांदवड हा महामार्ग गेल्या चार वर्षांपासून नव्याने बनला आहे.मात्र या महामार्गावर अडथळे कायम आहेत. कजगाव-चाळीसगाव मार्गावर पाटील नगर जवळ मोठे वळण आहे. या वळणावर दिशादर्शक फलक व रात्रीचे इंडिकेटर लावणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने या वळणावर गेल्या चार वर्षात अनेक अपघात झाले आहेत. याच वळणावर चालकाने समयसूचकता दाखवल्याने दि.४ रोजी मोठा अपघात टळला. भाजप शहर अध्यक्ष रवींद्र…
जळगाव : प्रतिनिधी त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर जिल्हा परिषद निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी व नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी सहाय्यक अनुदाने स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्याचा विषय शासन स्तरावर तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाकडुन वेतन अनुदान मिळणेसाठी हातपंप विजपंप राज्य संघटनेने १९८८ ते २०२४ या कालावधीतील शासनाकडे पाठपुरावा केला होता. तथापी ४६ वर्ष लढा देवुनही या कर्मचा-याना शासनाकडुन न्याय मिळालेला नव्हता. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गांभीर्य पूर्वक ऐतिहासिक निर्णय घेवून राज्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील हातपंप/विजपंप दुरुस्तीसाठी विविध संवर्गातील १०७४ कर्मचाऱ्यांच्या वेतन/निवृत्तीवेतनाचा…
धरणगाव : प्रतिनिधी गुलाबरावजी पाटील साहेब फाउंडेशन यांच्या सहकार्याने धरणगाव शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम धरणगाव शहरात दिनांक : ५ जुलै २०२४ शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरातील बालकवी ठोंबरे विद्यालय इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय आदर्श विद्यालय परा विद्यालय या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे युवा नेते माजी जि.प.सदस्य श्री.प्रतापराव पाटील यांनी सांगितले की मंत्री महोदयांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदार संघात अनेक वर्षापासून मोफत वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना विठुरायांचे दर्शन घेण्याकरिता बसेस मधून त्यांना…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिद्धिविनायक नगरातील खासगी व्यवसाय करणाऱ्या एका ३० वर्षीय मुलाची ऑनलाइन टास्कच्या नावावर तब्बल ८ लाख ७६ हजार ३६३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना १ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमोल दिलीप बिरारी (वय ३०, रा. सिद्धिविनायकनगर, जळगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. अमोल हा खासगी व्यवसाय करतो, २२ जून ते १ जुलै यादरम्यान या युवकाची फसवणूक करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करून निमीशा रघुराम असे नाव सांगणाऱ्या महिलेने तिच्या टेलिग्राम खात्यावरून अमोलच्या टेलिग्राम खात्यावर संपर्क साधला तसेच पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दिले. तसेच रैंक अॅप…
मेष राशी कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय काळजीपूर्वक घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. तुमच्या नोकरीतील महत्त्वाच्या पदावरून तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते. काही सहकाऱ्यांशी वाद घालणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे या दिशेने विचारपूर्वक काम करा. संयम आणि संयमाने काम करा. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. व्यवसाय योजना यशस्वी होईल. कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने तुमचे मनोबल वाढेल. वृषभ राशी आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. घरगुती जीवन सुखकर राहील. मेकअपमध्ये अधिक रस असेल. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. राजकारणात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात निर्माण झालेले मतभेद मिटतील. दूरच्या देशातून प्रिय…
भुसावळ : प्रतिनिधी एका साडेतीन वर्षीय चिमुकलीसोबत एका शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि.१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास भुसावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ४ जुलै रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुकयातील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चिमुकली ही भुसावळ शहरातील एका शाळेत असतांना १ जुलै रोजी स्कूल व्हॅननचा चालक प्रसाद हिरासिंग चौधरी याने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चिमुकली व्हॅनमध्ये बसलेली असतांना त्याने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावून दुखापत करत तिचा विनयभंग केला. हा…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पाळसदळ येथील शास्त्री इन्स्टीट्यूट येथून पाईप चोरी करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात चार जणांना ताब्यात घेतले असून चोरीला गेलेले पाईप हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पाडसदड येथील शास्त्री इन्स्टिट्यूट परिसरातून ५७ लोखंडी पाईप चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील चोरटा हा एरंडोल शहरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सापळा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनीपेठ परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गेल्या आठ महिन्यापासून व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अनैसर्गिक अत्याचार करण्यात येत होता. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पश्चिम बंगाल येथील तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ भागातील एका 14 वर्षेीय अल्पवयीन मुलाचे फोटो व व्हिडिओ संशयित सायत असित पांडा राहणार पश्चिम बंगाल याने घेतले होते. फोटो सोशल मीडियार व्हायरल करेल अशी धमकी देत त्या अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर पिडीत मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे बनावट अकांऊट तयार करुन व्हायरल केले. २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर…

