चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सांगवी येथील ऊसतोड मुकादम महादू राठोड यांना संत मुक्ताई शुगर फॅक्टरी घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) यांच्याकडील उचलचे पैसे देणे-घेणे असल्याच्या कारणावरून पाच जणांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर संत मुक्ताई शुगर फॅक्टरीत एका खोलीत डांबून ठेवले. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा १६ रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे. यात कारखान्याचे शेतकी अधिकारी, कृषी सहाय्यक, ऊस पुरवठा अधिकारी, गेट सुपरवायझर व वाहन चालकांचा समावेश आहे. ही घटना २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकी अधिकारी मुकेश भामरे, कृषी सहाय्यक विठ्ठल तिवटे, ऊस पुरवठा अधिकारी संदीप कोळी, गेट सुपरवायझर नरेंद्र पाटील आणि चालक प्रमोद…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरातील मंगलपुरी भागात घरासमोर गप्पा करीत असलेल्या पाच महिलांसह दोन चिमुरड्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या घटनेत शोभा रमेश पाटील (वय ६०, रा. साईप्रसादनगर) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला असून, चार महिलांसह दोन चिमुरडे जखमी झाले आहेत. पवन कैलास पाटील (वय २५, रा.सप्तशृंगी नगर) असे संशयिताचे नाव असून त्याने ब्रेकऐवजी अॅक्सिलेटरवर पाय ठेवल्याने ही घटना घडल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान, या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुरड्यासदेखील दुखापत झाली आहे. सुदैवाने चिमुरड्यांचे…
अमळनेर : प्रतिनिधी कर्जबाजारी झाल्याने सुनील मधुकर पाटील (माळी) (४०) या इसमाने मध्यरात्रीच्या बुधवारी सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. येथील जिल्हा बँक शाखेच्या स्वच्छतागृहात गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. मोठा भाऊ रवींद्र आणि वयोवृद्ध आईवडील हे तीनही कुटुंब विभक्त राहत होते. परेश व निखिल या शाळकरी या दोन मुलांसह सुनील हा आठ दिवसांपूर्वीच बँकेशेजारच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला होता. बुधवारी रात्री आषाढी एकादशीनिमित्त गावात रात्री पालखी मिरवणूक होती. सुनील याने रात्री उशिरा शेजारीच असलेल्या स्वच्छतागृहात दोरीने गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी मुलांना जाग आल्यावर त्यांनी शोधाशोध…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक लाभाचा आणि शांतीचा दिवस असेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात सामान्य चढ-उतार होतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारा. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा आणि प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात नवीन उत्पन्नाच्या स्त्रोताचा फायदा होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात सावध राहा. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ राशी व्यवसायातील योजना गुप्तपणे पार पाडा. अन्यथा, कोणत्याही विशिष्ट शत्रूला माहिती मिळाल्यास, तो विघ्न आणू शकतो. नोकरदार किंवा व्यवसायात काम करणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवा. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला उच्च यश आणि सन्मान मिळेल. राजकारणात तुम्हाला काही महत्त्वाच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्याचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. संबंधित घटनेचा तपशील अपडेट होत आहे.
पुणे : वृत्तसंस्था अनेक अल्पवयीन मुल मुली चुकीचे पाऊल उचलत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात, नुकतेच पुणे शहरातील हडपसर भागातील अमानोरा टाउनशिप परिसरात बुधवारी दुपारी आई रागावल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी, तिची आई, आठ वर्षांचा मुलगा, मावस भाऊ बुधवारी दुपारी घरी होते. दुपारी अडीचच्या सुमारास आईने मुलीला अभ्यासाला जा, असे सांगितले. या कारणावरून मुलीला राग आला. त्यानंतर मुलीने १३ व्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून उडी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर अनेक आमदार नाराज होतील, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आचारसंहिता लागण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असतानाही मंत्रिपदासाठी आमदार इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन अडीच महिन्यांत जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र निवडणूक आचारसंहिता लागायला काही दिवस शिल्लक असताना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचीही राजकीय वर्तुळात…
बारामती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुई लीमटेक या मार्गावर मंगळवारी दुपारी कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की संपूर्ण गाडीचा चक्काचूर झाला. आदित्य निंबाळकर (वय २३) असे मृत तरूणाचे नाव असून तो इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आहे. या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य निंबाळकर हा काटेवाडीहून रुई मार्गे बारामतीकडे निघाला होता. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रूईपाटी जवळ आल्यानंतर…
बीड : वृत्तसंस्था पंढरपूरवरून कन्नड तालुक्यातील दहिगाव येथे जात असलेल्या वारकऱ्यांच्या पिकअप वाहनाचे टायर बीडनजिक फुटले. या अपघातात पंचवीस वारकरी जखमी झाले असून यातील तीन महिला गंभीर आहेत. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री नऊच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील वारकरी परत गावी जात होते. त्यांना घेऊन जाणारे पिकअप गाडीचे सोलापूर -धुळे महामार्गावरून जात असताना रामनगरनजीक एक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून पिकप डिव्हायडरला धडकले. यावेळी दुसरेही टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. यात २५ वारकरी जखमी झाले असून तीन महिला गंभीर जखमी आहेत. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालेगाव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच मुंबई – आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाट्यावर पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले. बुधवारी (दि. १७) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेली माहितीनुसार, माजी नगरसेवक तथा शिक्षण मंडळाचे माजी सभापती शेख निसार शेख अकबर उर्फ राशनवाले (५५) व त्यांचा मुलगा शेख अबरार शेख निसार (२०) हे पिता-पुत्र नमाज पठणानंतर दुचाकीने सवंदगाव फाट्यावररून जात होते. त्यांना पाठीमागून भरधाव पिकअपने (एमएच ४८ सीबी ८६६३) धडक दिली. निसार यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी अबरारने वडिलांचा मोबाइल घेऊन कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अबरारला खासगी…

