अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एकलहरे येथे किरकोळ वादातून एकाला लोखंडी रॉड आणि कुन्हाडीने मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद मारवड पोलिसांत देण्यात आली आहे. याबाबत ४० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ रोजी ही महिला आणि कुटुंबीय घरी असताना दुर्गेश भानुदास पाटील आणि दत्तात्रय भानुदास पाटील हे दोघे आले. त्यांच्या हातातील लोखंडी रॉड आणि उलट्या कुऱ्हाडीने महिलेच्या पतीला मारल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या मुलीलाही मारहाण केली. त्यावरून मारवड पोलिसांत विनयभंग व अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, हेकॉ. शरीफखान पठाण हे तपास करीत आहेत.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जेवण करून घरी परतत असताना रविवारी (१४ जुलै) कारचा अपघात होऊन जखमी झालेले योगेश भालचंद्र रेंभोटकर (५३, रा. निवृत्तीनगर) यांचा बुधवारी (१७ जुलै) संध्याकाळी ६:३० वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अंत्ययात्रा गुरुवारी (१८ जुलै) दुपारी १ वाजता राहत्या घरून निघणार आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, वहिनी, दोन बहिणी, असा परिवार आहे. ते जैन इरिगेशनमधील प्रवीण रेंभोटकर यांचे बंध होत
जळगाव : प्रतिनिधी मोबाइल चोरीच्या घटना सुरूच असून, दोन वेगवेगळ्या ठिकाणी पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या हातातून दुचाकीस्वारांनी मोबाइल हिसकावून नेले. ही घटना ७ जुलै रोजी आराधना कॉलनी व प्रभात कॉलनी भागात घडली, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, आराधना कॉलनीतील रहिवासी सोनाली प्रवीण वाणी (२५) या आराधना कॉलनीतून पायी जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी वाणी यांच्या हातातील मोबाइल हिसकावला व पसार झाले. सोनाली वाणी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध १६ जुलै रोजी बीएनएस कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.…
रावेर : प्रतिनिधी तांदलवाडी येथील मूळ रहिवासी आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले विठ्ठल नारायण पाटील यांचा २६ वर्षीय मुलगा सिद्धांत विठ्ठल पाटील हा अमेरिकेत कॅलिफोर्नियातील कॅडेन्स डिझाईन सिस्टीम या कंपनीत नोकरी करीत होता. तो मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये बेपत्ता झाला आहे. ही घटना दि.४ जुलै रोजी घडली. सिद्धांत हा अमेरिकेतील मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्क मध्ये गेला होता. दि. ६ जुलै शनिवारी पहाडावर ट्रेकिंग करीत असतांना त्याचा दगडावरून पाय निसटला. आणि तो नदीच्या प्रवाहात पडला आणि खाडी मध्ये दिसेनासा होण्याआधी दोन वेळेस दिसला, असे त्याच्या प्रत्यक्षदर्शी मित्रांनी सांगितले. तो २०२० साली कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलीसमधून एमएस करण्यासाठी अमेरिकेत…
मेष आजचा तुमचा दिवस अत्यंत सकारात्मक राहणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. विरोधक तुमच्यासोबत स्पर्धा करायला बघतील, अशावेळी विचलीत होऊ नका. काही लोकांना बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात उच्चपदावर जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण घाईत निर्णय घेऊ नका. वृषभ जुन्या मित्राची भेट होईल. कार्यक्षेत्रात तुमचं बौद्धिक कौशल्या पाहून सर्वच थक्क होतील. व्यापारात फायदा होईल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या महत्त्वकांक्षी योजनेत बदल करावा लागणार आहे. आईवडिलांसोबत वेळ घालवाल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस बरा नाही. प्रिय व्यक्तीची प्रकृती…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवेसेंदिवस वाढत असतांना नुकतेच पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील येरवडा जेलमध्ये पुर्ववैमनस्यातून एका आरोपीची हत्या करण्यात आलेली आहे. हा आरोपी सराईत गुंड असल्याचे सांगण्यात येत आहे. जेलमधील तिघांनी त्याची एका धारधार हत्याराने हत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि किरण रामचंद्र आचार्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गवसचे आरोपी कुटुंबासोबत पुर्वीपासून वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. मंगळवारी जुन्या वादातून…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाचा वाद मोठा होत असतांना दिसत असतांना नुकतेच राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची अचानक घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. मात्र, आज शरद पवार यांनी त्या भेटीमागील उद्देश देखील सांगितला. आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधक का सहभागी झाला नाही. विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला, रणनीती कुठे चुकली व बारामती लोकसभेतील लोक सुप्रिया सुळेंच्या पाठिशी कसे उभे राहिले यावर पवारांनी स्पष्ट भाष्य केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ घरी आले, ते मला भेटले, त्यांनी…
सोलापूर : वृत्तसंस्था लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी स्टायपंड देण्याच्या योजनेची घोषणा केली. बारावी झालेल्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, पदवी (डिग्री) झालेल्या तरुणांना महिन्याला १० हजार रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज बुधवारी (दि.१७) पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने बोलताना जाहीर केले. तो वर्षभर कारखान्यात अप्रेंटशिप करेल आणि त्याला तिथे नोकरी लागले. यामुळे कौशल्यपूर्ण असे मनुष्यबळ उद्योजकांना मिळेल. पण अप्रेंटशिपचे पैसे सरकार भरेल, असे शिंदे यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा केली. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत…
सोलापूर : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी मागितले. आषाढी सोहळा आज बुधवारी (दि. १७) भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे.…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावातून चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा (क्र. एमएच १९, एपी ५०७६) शोध घेत असताना ते रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याने चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पोउनि राहुल तायडे, गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांनी मंगळवारी (१६ जुलै) रमेश सोनवणे याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे.

